Top Post Ad

खाजगी टोईंग एजन्सीजच्या करोडो रुपयांचा आर्थिक महाघोटाळा


 पोलीस वाहतूक शाखा व खाजगी टोईंग एजन्सीजच्या संगनमताने राजरोस चाललेल्या करोडो रुपयांचा आर्थिक महाघोटाळ्याचा पर्दाफाश धर्मराज्य पक्षाचे संघटक 'अजय जया यांनी केला. आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती उघड केली.

माहिती अधिकाराच्या सहाय्याने ठाणे शहरातील पोलीस वाहतूक शाखा व खाजगी टोईंग एजन्सीजच्या संगनमताने शासकिय तिजोरीत पुरेपूर भरणा न होताच, परस्पर प्रशासनाच्या सहाय्याने आर्थिक लुट होत असून याबाबत पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी जाणिवपूर्वक डोळोझाक करीत आहेत. याबाबत माहिती मागितली असता उलट आरोप करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न माझ्यासारख्यांना केला जात असल्याचा आरोपही अजय यांनी केला 

 ठाणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी म्हणून ठाणे शहरात टोईंग व्हॅनचा सर्रास वापर गेली काही वर्षे करण्यात येत असून, यासाठी खाजगी 'टोईंग व्हॅनवाल्यांना पोलीस प्रशासनाकडून (पोलिस उपायुक्त... DCP) यांनी प्रत्येक गाडी 'टो' करण्यासाठी प्रति गाडी रु २०० घेण्याची परवानगी दिलेली आहे. यात टोईंगवाल्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार, डिझेल, गाडीचा हा आणि मेंटेनन्स इत्यादी सर्व खर्च भागवायचा असे ठरलेले आहे. 

 वाहतूक पोलिसांच्या वागळे पोलीस ठाण्यात ४ टोविंग व्हॅन आहेत. या गाड्यांनी १ मार्च  १० एप्रिल या चाळीस दिवसात अवघ्या १९६ केसेस म्हणजेच दिवसाला अवघ्या २० केसेस केल्या आहेत. या २० केसेसमुळे टोविंग व्हॅन मालकांना दिवसाला अवघे ४००० रूपये मिळाले असून प्रत्येक व्हॅनला फक्त १ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एका व्हॅनवर साधारणपणे ५ कामगार काम करीत असतात. त्यांचे वेतन, इंधन खर्च, गाडीची दुरूस्ती आणि गाडीचे भाडे पाहता १ हजार रूपयात हा खर्च कसा काय भागवला जातो, असा सवाल जेया यांनी उपस्थित केला आहे. 

जो प्रकार वागळेच्या बाबतीत आहे. तसाच प्रकार इतर पोलीस ठाण्यातही आहे. कापूरबावडी वाहतूक पोलिसांकडे ३ टोविंग व्हॅन आहेत. या तीन व्हॅनने ४० दिवसात 1820 कारवाया केल्या असून त्यातून दिवसाला ९ हजार १०० रूपये; कोपरी वाहतूक पोलिसांकडे २ टोविंग व्हॅन आहेत. त्यांनी  654 कारवायांमधून 3 हजार 270 रूपये; नौपाडा वाहतूक पोलिसांकडे 2 टोविंग व्हॅन आहेत. त्यामाध्यमातून 871 कारवायांमधून दिवसाला  4355 रूपये; कासारवडवली वाहतूक पोलिसांकडे 2 टोविंग व्हॅन आहेत. त्यांनी 2709 कारवायांमधून दिवसाला  11 हजार 395 रूपये; ठाणे नगर वाहतूक पोलिसांकडे 2 टोविंग व्हॅन आहेत. त्यामाध्यमातून 1600 कारवाया करून  दिवसाला 8 हजार 420 रूपये; राबोडी वाहतूक पोलिसांकडे 1 टोविंग व्हॅन आहे. त्या माध्यमातून 277 कारवायांमधून दिवसाला  1385 रूपये; मुंब्रा वाहतूक पोलिसांकडे 1 टोविंग व्हॅन असून त्यांनी दिवसाला 1109 कारवायांमधून दिवसाला 5 हजार 545 रूपये तर कळवा वाहतूक पोलिसांकडे 1 टोविंग व्हॅन वापरून 619 दुचाकीवर कारवाई करून दिवसाला 3095 रूपयांचे उत्पन्न मिळवले आहेत. 

वास्तविक पाहता, एका टोविंग व्हॅनवर किमान 5 कामगार काम करीत असतात. या कामगारांचे वेतन, गाड्यांचा इंधन खर्च, मेंटेनन्स, गाडीचे भाडे यासाठी दिवसाला किमान 6 ते 7 हजार रूपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र, एका टोविंग व्हॅनला दिवसाला सरासरी एक ते दीड हजार रूपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे टोविंग मालक पोलिसांच्या मदतीने मोठा आर्थिक घोटाळा करीत असून त्याचा मोठा वाटा पोलिसांनाही दिला जात आहे. दिवसाला शेकडो वाहनांवर कारवाई करून त्याचे पैसे शासनदरबारी जमाच केले जात नाहीत. त्यामुळेच टोविंग व्हॅन मालकांना आपला खर्च चालविणे शक्य होत आहे, हे पोलिसांनीच दिलेल्या माहितीमधून स्पष्ट होत असल्याचा आरोप जेया यांनी केला. 

दरम्यान, 9 पोलीस ठाण्यांकडे 198 जॅमर आहेत. तर 400 ई चलन यंत्रे आहेत. या जॅमरचाही समावेश टोविंग व्हॅनद्वारे होणाऱ्या उत्पन्नात दाखविण्यात आला आहे. हा सर्व प्रकार कुंपणानेच शेत खाण्यासारखा आहे. प्रत्यक्षात अनेक वाहनांवर कारवाया करायच्या आणि कागदोपत्री कमी आकडे दाखवायचे, असे प्रकार केले जात आहेत. अनेक गाड्यांच्या दंडाच्या पैशाचा शासकिय तिजोरीत भरणाच केला जात नसून मधल्या मध्येच हे पैसे पोलीस व टोईंग व्हॅनवाल्यांकडून लंपास केले जात असावेत, अशी अतिशय धक्कादायक बाब व रास्त शंका याप्रकरणी अजय जया यांनी उपस्थित केली आहे.  पोलीस प्रशासनाकडून ठाणे शहरातील नागरिकांची होणारी ही आर्थिक लूट / फसवणूक  'धर्मराज्य पक्षाच्या माध्यमातून भविष्यात सार्वजनिक करण्यात येईल. तसेच वेळ प्रसंगी याबाबत न्यायालयाचे दरवाजेही ठोठावण्यात येतील. या संबंधात जाणकार ठाणेकरांनीही उघडपणे मतप्रदर्शन करून आपला हक्क बजवावा असे आवाहन जया यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com