■ *कुणबी- मराठा समाजासाठीची 'सारथी' आणि ओबीसींसाठीची म्हाज्योति' संशोधकांना सरसकट फेलोशिप देऊ शकते. मग दलितांच्या 'बार्टी' लाच २०० विद्यार्थ्यांची मर्यादा कशासाठी*? ■ *शिंदे- फडणवीस सरकारने हा आपपरभाव - दुजाभाव येत्या १४ एप्रिलआधी दूर करावा...अनुसूचित जातींच्या संशोधकांनाही सरसकट फेलोशिप' द्यावी.* ■ *अनावश्यक उपक्रमांवर बार्टी करत असलेल्या उधळपट्टीला लगाम घालावा.* ■ *दलित संशोधकांना बदनाम करण्याऐवजी स्वतःच्या कुटुंब कल्याणासाठी कुठल्या अधिकाऱ्यांनी बार्टीच्या निधीवर हात मारला, याचा राज्य सरकारने आधी तपास करावा!* ■ *. २०१०-११ ते २०२१-२२ या १२ वर्षांत एकट्या गोंदिया जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या ९७० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि शिकवणीची १ कोटी, ५० लाख,६१ हजार,२९३ इतकी रक्कम आजही प्रलंबित आहे, असे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांचे 'रेकॉर्ड' सांगत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा विचार करता ही प्रातिनिधिक परिस्थिती आहे.* ■ * मागील १२ वर्षांत शिष्यवृत्ती आणि शिकवणीच्या रकमेपासून वंचित ठेवल्या गेलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचे पुढे काय झाले? ते आता कुठे असतील आणि काय करत असतील? * ■ * प्रलंबित शिष्यवृत्ती आणि शिकवणीची रक्कम नेमकी गेली कुठे? * ■ * याचा शोध घेऊन सामाजिक न्याय खाते स्वतः सांभाळणारे पहिले मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे त्याची माहिती महाराष्ट्राला देतील काय?
-----------
■ दिवाकर शेजवळ ... ज्येष्ठ पत्रकार ----------------------------------------
------------------ मंत्र्यांना डॉ आंबेडकर जयंती महोत्सवात 'प्रवेश बंदी' करा! =============== विविध विद्यापीठे आणि बार्टीने पात्र ठरवलेल्या अनुसूचित जातीच्या ८६१ संशोधकांना सरसकट फेलोशिप येत्या १४ एप्रिलआधी देण्यात यावी. अन्यथा या अन्यायाविरोधात आवाज न उठवणारे राखीव मतदारसंघातील सर्वपक्षीय आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवात 'प्रवेश बंदी' करावी, अशी हाक संविधान समर्थक दलातर्फे राज्यातील दलित जनतेला देण्यात आली आहे. राखीव मतदारसंघातील अनुसूचित जाती- जमातींचे एकूण ४७ आमदार राज्य सरकारच्या मंत्र्यांवर बहिष्कार टाकण्याचे हे आवाहन प्राचार्य रमेश जाधव, प्रा एकनाथ जाधव आणि सतीश डोंगरे यांनी संविधान समर्थक दलाच्या एका पत्रकाद्वारे आज केले. संशोधक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे मातेरे करणाऱ्या मंत्र्याचें जयंती महोत्सवात स्वागत निलाजरेपणाचे ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. 'सारथी' आणि ' म्हाज्योति' प्रमाणे बार्टीनेसुद्धा २०१८ सालात अनुसूचित जातीच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४०८ आणि २०२०- २१ मध्ये ५१७ संशोधकांना फेलोशिप यापूर्वी दिलेली आहे. असे असतानाही यावेळी केवळ २०० संशोधकांनाच फेलोशिप देण्याची आणि ६०० च्यावर संशोधकांना फेलोशिप नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका अन्यायकारक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएचडीसाठी २०२१ या वर्षात नोंदणी झालेल्या ८६१ संशोधकांना बार्टी या संस्थेने पात्र ठरवले आहे. मात्र सरकार निधीच्या कमतरतेचे कारण पुढे करुन अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना 'ठेंगा' दाखवला आहे. 'आमच्याकडे फक्त २०० विध्यार्थ्यांपुरताच निधी आहे, असे राज्य सरकार सांगत आहे. या अन्यायाविरोधात शेकडो संशोधक विद्यार्थी आपले संशोधन आणि अभ्यास केंद्रे सोडून आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत . पोलीस संध्याकाळी रोज त्या विद्यार्थ्यांना हुसकावून लावत आहेत. बुद्ध विहारांमध्ये आश्रय घेत गेला महिनाभर त्यांचे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली ------------------ फेलोशिपसाठी उपाशी तपाशी संघर्ष करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावत चालली असून काही जणांना रुग्णालयाची वाट धरावी लागली आहे, असे सांगून प्राचार्य रमेश जाधव म्हणाले की, एखाद्या विद्यार्थ्याचे काही बरे वाईट झाले तर परिस्थिती चिघळू शकते.
- प्राचार्य रमेश जाधव - अध्यक्ष मो: 8669246897
- प्रा. एकनाथ जाधव - उपाध्यक्ष मो: 9920070679
- सतीश डोंगरे - चिटणीस मो: 7303356091
0 टिप्पण्या