:
मुंबई- मुंबई पोलीस दलाची तुलना ही स्कॉटलंड पोलीस दलाशी केली जाते. कारण स्कॉटलंड पोलीस दल हे सुसज्ज यंत्रणेने सज्ज असते. त्याच तुलनेमध्ये मुंबई पोलीस दल असूनही या पोलीस ठाण्याचे बहुतांश दूरध्वनी ( लॅन्डलाईन फोन) हे मृतवत झालेले आढळून येतील, अशी माहिती मिळते आहे. एकंदरीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, अधिक्षक यांनी या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी अशी ही लोकांची अपेक्षा आहे.
:मुंबई पोलीस दलातील पोलीस ठाण्याचे बहुतांश दूरध्वनी हे खराब झालेले आहेत. काही पोलीस ठाण्याचे दूरध्वनीचे बिल थकीत असल्याने त्या पोलीस ठाण्याचे दूरध्वनी सेवा खंडीत केले असल्याची माहिती एमटीएनएल विभागाने केली असल्याचे समजते आहे. याशिवाय मुंबई पोलीस दलाच्या पोलीस ठाण्याचे अत्यंत महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक असलेले १००,१०३ वगैरे क्रमांक तात्काळ उचलेले जात नाही, तात्काळ संपर्क साधला जात नाही. याउलट १ क्रमांक दाबा वा २ क्रमांक दाबा यामध्येच वेळ वाया जात असल्याचे समजते. तरी ही यंत्रणा अधिकाधिक अद्यावत करण्यात यावी अशी अपेक्षा सर्व सामान्य लोकांची आहे.
: Suresh Gaikwad:
सुरेश गायकवाड, ९२२४२५०८७३
0 टिप्पण्या