आय आय टी बॉम्बे येथील १९ वर्षीय अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी दर्शन सोलकी पाने १२ फेब्रुवारी २०१३ रोजी दर्देवी आत्महत्या केली. त्याचा मृत्यू खूप वेदनादायी आहे. परंतु काही संघटनांनी याचे निमित्त करून समाजात जातीय तेढ आणि प्रक्षोभ निर्माण करण्याचे उद्योग सुरु केले. त्याच्या आत्महत्येला संस्थात्मक खून (Institutional Murder) म्हणत
दरम्यान या घटनेचा तपास करण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाला (SIT) दर्शनची सुसाईड नोट सापडली आणि पुढील तपासात सत्य समोर आले. दर्शनाच्या वर्गातील अरमान खत्री नामक विद्यार्थ्यास पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने अरमानला १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अरमान आणि दर्शन मध्ये नेमका काय वाद झाला आणि नेमके असे काय झाले ज्यामूळे दर्शने - Arman has killed me" असे लिहून आत्महत्या केली याचा सखोल तपास करून पिडीताला न्याय मिळाला पाहिजे, दर्शनाच्या कुटुंबाने पोलिसांना चांगले सहकार्य केले आहे.
मात्र सत्य समोर येण्याआधीच ज्या प्रकारे माजी राज्यसभा खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, गुजरात येथील काँग्रेस पक्षाचे
आमदार जिग्नेश मेवाणी, तसेच आय आय टी बॉम्बे येथील काही डाव्या आणि फुटीरतावादी गटांनी या प्रकरणात
समाजाची दिशाभूल करण्यासाठी खोटा प्रचार केला, याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
'आय आय टी बॉम्बे मध्ये झालेल्या एका सभेत तर एका युवकाने त्याच्या भाषणात अतिशय द्वेष निर्माण करणारे विधान केले की " आपको मानना पड़ेगा कि जब तक आप जय श्रीराम बोलेंगे, आपको जय क्षत्रिय जय ब्राह्मण जय वैश्य बोलना पड़ेगा और थू शुद्र कहना पड़ेगा, दलितवर्ग को नीचा दिखाना पड़ेगा ।", असे त्याचे विधान होते. या विरोधात आय आय टी मधील एक संशोधक विद्यार्थ्यांने पवई पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे.
• अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्थांच्या मध्ये आवश्यक सोयी, सुविधांनी युक्त निरोगी व सकारात्मक वातावरण असायला हवे, जातीय भेदभाव होता कामा नये, कोणत्याही कारणांनी अत्याचार होत असेल तर त्याविरोधात आवाज उठवणे, सुधारणावादी भूमिका मांडणे, संविधानिक चौकटीत आंदोलन उभारणे, सर्व काही गरजेचेच आहे. दोष दूर करण्यासाठी पर्याय सुचवला पाहिजे, समस्येवर काम केले पाहिजे. पण फुटिरतावाद्यांना फक्त आरोप करणे •व व्यवस्था कशी दलित विरोधी आहे हे सिद्ध करण्याची घाई असते. कोणतेही पुरावे हाती नसताना केवळ स्वतःचा समाजात फूट पाडण्याचा अजेंडा रेटण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर ते सहन केले जाणार नाही.
देशात विविध शिक्षण संस्थांमध्ये घडणाऱ्या विद्यार्थी आत्महत्या हा गंभीर आणि संवेदनशील विषय आहे. आत्महत्या करणारे विद्यार्थी विविध समाजाचे आहेत. या आत्महत्यांची कारणेही विविध प्रकारची आहेत. शिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभाव कसा चालतो? त्यावर उपाय काय ? या संस्थांमध्ये ग्रामीण भागातून व वंचित घटकामधून आलेल्या विद्यार्थ्यांना पुरेशा सोयी सुविधा मिळतात का ? अभ्यासाचा तणाव कमी करून विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ रहावे यासाठी प्रभावी उपाययोजना आहेत का ? रॅगिंग विरोधात सक्षम यंत्रणा आहे का ? असे विविध प्रश्नांचा सर्वकष अभ्यास करून विद्यार्थी आत्महत्या थांबण्यासाठी सरकार, प्रशासन, शिक्षक आणि समाज सर्व स्तरात काम होणे आवश्यक आहे.
आपले
अमर साबळे
माजी राज्यसभा खासदार (भाजप)
राम सातपुते
विधानसभा सदस्य (भाजप) संपर्क -9803331212
e/C/
0 टिप्पण्या