..... तर मुसलमान गद्दार आहेत, या स्टेटमेंटवर माझा पुरा भरोसा असल्याने मला नेहमी वाटायचे कि, आपल्या देशाची गोपनीय माहिती फक्त “मुसलमान लोकांकडे” एकत्रित करून संस्कारित करण्यासाठी मशिदीत ठेवत असतील. ती माहिती सांभाळण्याची जबाबादारी मशिदीतल्या मुल्ला-मौलविवर सोपवली जात असेल. त्यामुळे ते मुस्लीम लोकं आपल्याकडची माहिती डिटेल मधी चीन किंवा पाकिस्तानला देत असतील. त्याबरहुकूम चीन-पाकिस्तान आपली भारताबाबतचे परराष्ट्र संबंध आणि सुरक्षा कार्यप्रणाली ठरवीत असतील. पण माझा हा समज अलीकडच्या काही घटणांमुळे फटाकडीवाणी ठोय होवून फटकन फुटला, जेंव्हा मला समजलं कि आम्ही दंगलीत गद्दार म्हणून मुसलमानाची घरं पेटवून देतो. त्यांच्या लेकी-बाळीची इज्जत लुटतो. त्यांचे उद्योग आणि दुकानं जाळून राख-रांगोळी करतो. मात्र इकड गद्दार तर ‘दक्षणा घेणारे गुरुजी’ असतात. ‘दक्षणा घेणारे गुरुजी’ आमच्याकडून सत्यनारायण महापूजेची दक्षणा घेतात आणि पाकिस्तानकडून सुद्धा भारताशी देशद्रोह करून दक्षणा घेतात.
“तर सोवळे-ओवळे ‘दक्षणा घेणारे काही देशाची गुप्त माहिती दुश्मन देश पाकीस्ताला पैशावर विकीत नाहीत. मात्र दुश्मन देश पाकिस्तानकडून पैसे घेवून गुप्त माहिती विकणारी व्यक्ती सोवळे-ओवळे ‘दक्षणा घेणारेच’ का असतात...?”
️️️️️️
१.
रक्षा अनुसंधान आणि विकास संगठन (डीआरडीओ) चे वैज्ञानिक डॉक्टर प्रदीप मोरेश्वर कुरुलकर पाकिस्तानला गोपनीय माहिती विकण्याच्या आरोपाखाली या दिवसात महाराष्ट्र एटीएस च्या कस्टडीत आहेत. डॉक्टर कुरुलकर डीआरडीओ पुणे सेंटर मधे कार्यरत होते. डीआरडीओचे आपल्या देशात अनेक ठिकाणी सेंटर्स आहेत. डॉक्टर कुरुलकर यांना ३ मे २०२३ रोजी अटक करण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे जबाबदार, सच्चे आणि समर्पित कार्यकर्ते कुरुलकर यांच्यावर आरोप आहे कि त्यांनी व्हाट्सएप कॉल्स, व्हाईस मेसेजेस आणि विडियो कॉल्स च्या माध्यामाने पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेच्या महिला एजेंटस सोबत नियमित चर्चा करीत. या दरम्यान त्यांनी भारताच्या सुरक्षे संदर्भात महत्वपूर्ण असलेली खूप सारे कागदपत्रे पाकिस्तानला विकली, ज्यामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षिततेला प्रचंड मोठा धोका निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे जबाबदार, सच्चे आणि समर्पित कार्यकर्ते कुरुलकर पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेच्या एका महिला एजंटच्या प्रेमात पडले आहेत. त्या मुस्लीम महिलेस तिच्या मुहब्बतच्या आणि कित्येक डॉलरच्याबदल्यात (अर्थात त्या मुस्लीम युवतीच्या प्रेमात अक्षरशः बुडून गेल्याने ) भारताच्या सुरक्षे संदर्भात महत्वपूर्ण असलेली गोपनीय कागदपत्रे कुरुलकर यांनी पाकिस्तानला विकली. हा देशद्रोह तसेच लव्ह-जिहादचा सुद्धा मामला आहे.
त्यांनी या पदावर असतांना कित्येक परदेशी दौरे केलेत. या दौऱ्या दरम्यान त्यांना या महिला पाकीस्तानी गुप्तहेर भेटत, असे बोलले जाते.
प्यार के साथ पाकीस्तानी गुप्तहेर असलेल्या महिलेने डॉक्टर प्रदीप मोरेश्वर कुरुलकर यांना भरपूर पैसा दिला. आणि आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे जबाबदार, सच्चे आणि समर्पित कार्यकर्ते डॉक्टर प्रदीप मोरेश्वर कुरुलकर यांनी प्यार के साथ भारताच्या सुरक्षे संदर्भात महत्वपूर्ण असलेली गोपनीय कागदपत्रे दिली. हिसाब बराबर केला.
भारताच्या सुरक्षे संदर्भात महत्वपूर्ण असलेली खूप सारी कागदपत्रे पाकिस्तानला विकणारे भारताच्या रक्षा अनुसंधान आणि विकास संगठन (डीआरडीओ) चे वैज्ञानिक डॉक्टर प्रदीप मोरेश्वर कुरुलकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे जबाबदार, सच्चे आणि समर्पित कार्यकर्ते आहेत.
त्यांचेविषयी त्यांचे मित्र श्रीरंग चितळे, (२०२१ ) लिहितात....
“संस्कारभारती ह्या संस्थेचा प्रदीप कुरुलकर १२ वर्षं संघटन मंत्री होता. लोकांमध्ये जाऊन काम करण्याची त्याची जी वृत्ती आहे त्याच्या जडणघडणीत मोतीबागेचा आणि संघ शाखेतील संस्कारांचा खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं. तिथे त्याला एक प्रकारचं बाळकडू मिळालं, जीवनातले अनेक आदर्श तिथेच त्याने बघितले आणि त्यातून प्रेरणा घेतली आहे. सश्रद्ध असलेल्या प्रदीपला भारतीय संस्कृती, परंपरा, इतिहास ह्याचा प्रचंड अभिमान आहे.
प्रदीपला वाद्य संगीताचं उत्तम ज्ञान आहे. त्याने सामंत गुरुजींकडे तबला शिकला आहे.संघाच्या घोषपथकात प्रदीप १४ वर्षं Saxophone वाजवत असे. तो बासरी (Flute) उत्तम वाजवतो.”
️️️️️️
२
पाकिस्तानच्या आयएसआयचा अधिकारी “जमशेद” यांच्यासोबत भारताच्या माजी राजनयिक अधिकारी माधुरी गुप्ता यांचे प्रेमसंबंध जुळले होते. माधुरी गुप्ता परराष्ट्र सेवेमध्ये असताना पाकिस्तानच्या भारतीय दूतावासामध्ये बसून पाकसाठी काम करीत होत्या. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला महत्त्वाची आणि गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवण्यात आलं. माधुरी गुप्ता यांना शनिवारी १९ मे २०१८ रोजी दिल्लीच्या एका न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली. २२ मार्च २०१२ पासून माधुरी यांच्याविरोधात हा खटला सुरू होता.
२२ एप्रिल २०१० रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. माधुरी गुप्ता १९८३ साली परराष्ट्र सेवेत रुजू झाल्या, तेव्हा त्यांची पहिली नेमणूक क्वालालंपूर येथे झाली होती. त्यानंतर त्या बगदादमध्ये होत्या.
️️️️️️
३
सप्टेंबर २०१८
देशाच्या सुरक्षेबाबतची महत्त्वाची माहिती पाकिस्तानच्या इंटर सव्र्हिसेस इंटेलिजन्स म्हणजे आयएसआय या संस्थेला दिल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका अधिकाऱ्यास नोईडात अटक केली आहे. “अच्युतानंद मिश्रा” हा मध्य प्रदेशच्या रेवा जिल्ह्य़ातील असून तो हनीट्रॅपमध्ये अडकला व त्याने महत्त्वाची माहिती आयएसआयला दिली होती. संरक्षणविषयक वार्ताहर असल्याचा बहाणा करून एक महिला आली असता तिला त्याने पोलीस अकादमी, प्रशिक्षण केंद्र याबाबतची माहिती दिली. मिश्रा हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत.
त्याला २००६ मध्ये सीमा सुरक्षा दलात भरती करण्यात आले होते व तो मागील चार वर्षापासून पासून त्या पाकिस्तानी गुप्तहेर महिलेशी संपर्कात होता. कालांतराने त्याने तिला सगळी माहिती दिली होती.
️️️️️️
४
११ एप्रिल २०१८
हनी ट्रैपचे शिकार होऊन ISI के एजेंटसला गुप्त माहिती देण्याच्या कारणावरून इंडियन एअर फोर्स चे ग्रुप कैप्टन “अरुण मारवाह” यांच्या विरोधात चार्जशीट दाखिल करण्यात आली.
त्यांनी एअर फोर्सच्या संदर्भातली १२ महत्वपूर्ण अत्यंत गोपनीय कागदपत्रे दोन महिला आय एस आय एजंट सोबत शेअर केली होती. मारवाह “जॉइंट डायरेक्टर ऑपरेशन” या पदावर कार्यरत होते. पाकिस्तान च्या महिला आईएसआई एजेंटस सोबत ते हुकअप एप्लीकेशनच्या माध्यमाने बोलणी करीत असत. हे एक सुरक्षित एप्लीकेशन आहे. यात लॉग आउट केल्यानंतर सारी बातचीत आपोआप डिलीट होवून जाते.
️️️️️️
...तर अशा या गुरुजनांच्या गद्दारीच्या अगणित सत्य कथा आहेत. या चार घटना मासल्या दाखल येथे दिल्या आहेत. बाकीच्या कथा आपणास शोधून काढता येतील. पण देशाचे गद्दार शेख, सय्यद, काद्री, कांबळे, गायकवाड, माळी, सुतार, बार्नाबस नसून सोवळे-ओवळे ‘दक्षणा घेणारे गुरुजी’ आहेत.
“शुद्ध सोवळे-ओवळे ‘दक्षणा घेणारे गुरुजी” पाकिस्तानी मुस्लीम महिलांसोबत लव्ह करतात. देशाची गुप्त माहिती विकतात. लव्ह जिहादचा नारा त्यांना आडवीत नाही. त्यांचे लव्ह धर्म-देश-देशभक्तीच्या सर्व सीमा ओलांडून ओसंडून वहाते, आणि आमच्या देशाच्या सुरक्षेचे गोपनीय कागदपत्रे सीमापार वहात जातात. ते आपल्या लव्हवर धर्म आणि देश नौछांवर करून देतात. किती हाय लेव्हलचे प्रेम म्हणायचे हे...!
आमचे स्वयंघोषित धर्म रक्षक देशभक्त कार्यकर्ते १४ फेब्रुवारीला बागेत बसलेल्या तरण्या पोरा-पोरींना धोपटीत बसतात. त्यांना बेइज्जत करून सोडतात. त्यांच्याकडे देशाची कोणतीच गोपनीय कागदपत्रे नसतात. अरे स्वयंघोषित धर्म रक्षक देशभक्त कार्यकर्त्यांनो या अंतर राष्ट्रीय लव्ह जिहाद कडे कोण लक्ष देणार....!!!!!
आता हे पुढील “शुद्ध सोवळे-ओवळे ‘दक्षणा घेणारे गुरुजनांची” नावेच पहा ना....
१ अच्युतानंद मिश्रा / २ निशांत अगरवाल / ३ निर्मल रे / ४ सोमवीर सिंग / ५ माधुरी गुप्ता / ६ ध्रुव सक्सेना / ७ सज्जन तिवारी / ८ संदिप शर्मा / ९ अरुण मारवाह / १० पंकज शर्मा / ११ श्रीवास्तव / १२ प्रदिप कुरुलकर
ही सगळी चीन-पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याचा आरोप असलेले सोवळी देशभक्त मंडळी आहेत...
0 टिप्पण्या