Top Post Ad

अग्निशमन विभागाकडून कोणताही परवाना नसतानाही ठाण्यातील अनेक हॉटेल्स आणि बार सुरूच


 मागील अनेक वर्षापासून वारंवार नोटीसा देऊनही आपल्या हॉटेलमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना न करणाऱ्या हॉटेलमालकांच्या विरोधात ठाणे महानगर पालिका कोणतीही कारवाई करीत नसल्याचे नुकतेच माहिती अधिकारात निदर्शनास आले आहे. एखाद्या हॉटेलला आग लागली किंवा एखादी आगीची घटना घडली तर महापालिका झोपेतून जागी होते आणि सर्व हॉटेल मालकांना केवळ नोटीस देऊन मोकळी होते. मात्र या हॉटेलमधून विशेष करून बार आणि रेस्टोरंट मालकांकडून सर्रासपणे या नोटीसीला केराची टोपली दाखवली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. 

  ठाण्यातील कॅफे भायंदरपाडा नागला बंदर (पिंक बाबा कॅफे), सम्राट लॉजिंग बोर्डींग नवसीबाई कंपाऊंड, बरफपाडा, चितळसर मानपाडा, घोडबंदर रोडवरील हायवे रेस्ट्रो अशा काही रेस्टोरंटबाबत माहिती मागवली असता या  हॉटेलमधून कोणत्याही प्रकारची आग प्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत माहितीच्या अधिकारात अग्निशमन विभागाकडूनही या आस्थापनांना कोणताही परवाना देण्यात आला नसल्याचे उघड झाले आहे. तरीही अशा तऱ्हेने ठाणे महानगर पालिका क्षेत्रात खुलेआम हॉटेल्स आणि बार रेस्टॉरंट सहा.आयुक्तांच्या अर्थपूर्ण आशिर्वादाने सुरु असल्याने करदात्या ठाणेकरांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. ठाणेकरांच्या करातून गडगंज पगार घेणाऱ्या या अधिकाऱ्यांना येथूून किती मलिदा मिळतो असा प्रश्न आता ठाणेकर विचारत आहेत. 

आग प्रतिबंधक उपाययोजना न केल्याने अग्निशमन दलाने ठाणे शहरातील सुमारे  ४००हून अधिक हॉटेल्स, बार रेस्टॉरंट  यांना ना हरकत दाखला दिलेला नाही. त्यांना या आधीही  सप्टेंबर २०१७ पासून फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ठाणे अग्निशमन दलाच्या वतीने त्यांची पूर्तता करण्यासाठी वारंवार नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र, अनधिकृत इमारतींमध्ये असूनही अनेकांनी आग प्रतिबंधक उपाययोजनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, अशा हॉटेल्स, बार, लाऊंज सील करण्याचे आदेश तत्कालिन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. मात्र या आदेशालाही बार मालकांनी केराची टोपली दाखवली होती. त्यामुळे तत्कालिन आयुक्तांनी काही हॉटेल्स व बार यांच्यावर कारवाई देखील केली होती. परंतु त्यानंतर पुन्हा ती नियमित सुरु झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. 

आजही ही हॉटेल्स व बार रेस्टॉरंट अग्निशमन दलाचा कोणताही परवाना न घेता खुलेआम सुरु आहेत. याबाबत बारमालक म्हणतात हमारा सेटींग उपरतक है. नुकतीच ५ मे २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास ठाण्यातील उपवनच्या गेटजवळ असलेल्या कृष्णा टॉवरच्या तळमजल्यावर असलेले सूर संगीत हॉटेल आणि बारला आग लागली होती. तरीही ठाणे महानगर पालिका अद्यापही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ठाणेकरांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com