Top Post Ad

लोकशाहीची बदलणारी मिथ्यकऺ


  "I AM THE STATE", ही लोकशाही-विरोधी स्वरुपाची 'राजेशाही-मानसिकता'... नव्या संसद-भवनाच्या उद्घाटन-सोहळ्यानिमित्ताने प्रकर्षाने जगासमोर आलीय, हे ही नसे थोडके !!!

गेल्या ९० वर्षात कधि बिघडली नाही, पुढील ९० वर्षात कधि बिघडू शकणार नाही; एवढी राज्यकारभाराची घडी गेल्या ९ वर्षात बिघडलीय... तिची, 'लोकशाही व प्रजासत्ताक' अशी दोन्ही मूल्ये, एकाचवेळेस जपणारी 'लोककल्याणकारी वीण' पार विस्कटून गेलीय... ज्यांच्या मुखी 'वंदे मातरम्'चा दांभिक जयघोष आणि गळ्यात 'हिंदुत्वा'च्या माळा होत्या व आहेत, त्यांनीच सर्व वैधानिक-गैर वैधानिक संस्थांमध्ये कुटीलनीतिने, षडयंत्र रचत... आपल्या सडक्या-नासक्या वर्णवर्चस्ववादी-शोषक, जातधर्म-विद्वेषी विचारांची अत्यंत हलक्या, क्षुद्र वृत्तीची माणसं पेरत आपल्या हाती 'केंद्रिय-सत्ता' येताच, हा उत्पात घडवलाय. देशात स्वातंत्र्याचा 'अमृतमहोत्सव' सुरु असतानाच, भारतमातेचं भरजरी वस्त्र साफ विशविशीत व्हावं, हा दैवदुर्विलास होय!

...हे राष्ट्र, केवळ 'लोकशाहीवादी'च नव्हे; तर, 'प्रजासत्ताकवादी' सुद्धा आहे आणि म्हणूनच बहुमताची दादागिरी, हडेलहप्पी येथे चालणार नाही... कारण, राष्ट्राच्या कारभाराला अभेद्य अशी विशिष्ट 'संविधानिक-चौकट' आहे (२४ एप्रिल-१९७३ च्या 'केशवानंद भारती' खटल्याच्या निकालाद्वारे प्रस्थापित झालेली) आणि त्या चौकटीत चपखल बसणारे 'नागरिकांचे मूलभूत घटनात्मक अधिकार' आहेत... सर्वधर्मसमभाव, हा देशाचा पंचप्राण आहे आणि 'संसद-विधिमंडळ, न्याययंत्रणा आणि सरकार' या त्रिसूत्रीत सुसंवाद राखतानाच आपापल्या अधिकार क्षेत्रात, ते प्रत्येकी 'स्वायत्त' असूनही कुणालाही स्वतःला घटनाबाह्य निरंकुश व बेदरकार कारभार वा इतरांच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करण्याची मुभा नाही; तसेच, 'सर्वोच्च न्यायालय', हे 'राज्यघटनेचे रक्षक' आहे.

एवढं सारं असूनही 'त्यांना', घटनाबाह्य 'हिंदुराष्ट्र' हवंय; म्हणजे नेमकं काय हवंय? तर, वर्णवर्चस्ववादी-शोषक स्वरुपाची विशिष्ट वर्गाची हुकूमशाही, एकतांत्रिक सत्ता (लोकतांत्रिक नव्हे), एखाद्या राजासारखी निरंकुश सत्ता हवीय... म्हणूनच, अंबानी-अदानीसारख्या शे-दिडशे बड्या भांडवलदारांना हाताशी धरुन मूठभरांची बुलडोझरी-सत्ता, जाणिवपूर्वक देशात झपाट्याने निर्माण केली जात आहे. अशा व्यवस्थेत त्यांना कोणी प्रश्न विचारलेले चालणार नाहीत... म्हणूनच गेल्या ९ वर्षात पंतप्रधानांची एकही पत्रकार परिषद नाही. याचा दुसरा अर्थ, ते कुणालाही जबाबदार नाहीत. आजच्या घडीला जेमतेम, निवडणुकीला तरी ते सामोरे जाताना दिसतायत... 

उद्या दुर्दैवाने, वर्ष-२०२४ ची निवडणूक EVMच्या हिकमतीने किंवा देशभर जातधर्मीय दंगली पेटवून अथवा बालाकोट-स्ट्राईकसारखा पाकिस्तानवर हल्ला (अर्थात, त्या गदारोळात २०१९ ची लोकसभा-निवडणूक जिंकली असली; तरी तशी ती वारंवार जिंकता येणे नाहीच) घडवून, भाजप व संघाने जिंकलीच; तर, मग हा देश पुन्हा हजार वर्षे मागे रेटला जाईल आणि साक्षात राज्यघटनाच गुंडाळून ठेवली जाऊन निव्वळ निवडणुकांचा 'फार्स' अत्यंत सुनियोजित पद्धतीने उरकला जाईल... देश, 'अस्पृश्यते'सारख्या सामाजिक-विषमतेच्या व अमानुष स्वरुपाच्या आर्थिक-विषमतेच्या  अंधारयुगात ढकलला जाईल... त्याचीच, 'रंगीत-तालिम' सध्या देशात सुरु आहे.

"म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, पण काळ सोकावतो", या उक्तिनुसार राष्ट्राध्यक्षा द्रौपदी मुर्मू यांचा, उद्या नव्या संसद-भवनाच्या उद्घाटनप्रसंगी होऊ घातलेला घोर अपमान, आपण जागरुक नागरिकांनी सहन करताच कामा नये व त्याविरुद्ध यथाशक्ति आवाज उठवलाच पाहीजे. शक्य आहे की, प्रचंड दबावाखाली अथवा राजशिष्टाचार पाळायचा म्हणून, उद्या प्रत्यक्षात महामहिम द्रौपदी मुर्मू, उद्घाटन-सोहळ्यानिमित्त पंतप्रधानांचं अभिनंदन जरी करत्या झाल्या; तरी, आपला आवाज अमृतकाळी 'तिरंग्या'सारखा फडकत राहीलाच पाहीजे. राष्ट्राध्यक्षांच्या जाहीर अवमानाचं पापकर्म, अमृतकाळात घडावं... ही गोष्ट तर, सुसंस्कृत भारतीय जनमानसाला फारच अस्वस्थ करुन सोडणारी! 

तेव्हा, आपली बाजू सावरण्यासाठी, भाजपा अथवा त्यांच्या आयटी-सेलकडून अनेक अफवा पसरवल्या जातील वा 'असत्या'हूनही कैकपटीने घातक असलेलं 'अर्धसत्य', 'गोदी-मिडीया'तून धुमधडाक्यात प्रस्तुत केलं जाईल (उदा. इंदिरा गांधी व राजीव गांधींनीही असंच लोकार्पण वगैरे केलं होतं किंवा 'सेंगोल'ची म्हणजेच, 'राजदंडा'ची खास दाक्षिणात्य शैलीची शैवपंथीय लोणकढी थाप मारली जाईल... त्याचा मूळात जाऊन शोध घेतला; तर, हे रेटून खोटं बोलणारे 'भाजपाई थापाडे' साफ तोंडघशी पडतीलच)... त्या बनावट 'कोलाज'मध्ये आपला निषेधाचा तेजस्वी स्वर, अमृतकाळात 'तारस्वर' बनत भारतीय जनतेच्या हृदयापर्यंत पोहोचू दे, थेट जनतेच्या अंतरात्म्याशी गुंजन करु दे... धन्यवाद !!!

...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

(ता. क. : आश्चर्याची बाब म्हणजे, वर्ष-२००० ते वर्ष-२००९पर्यंत सरसंघचालक असलेले के. एस. सुदर्शन एकदा म्हणाले होते की, "आम्ही तिरंगा न फडकवण्याचा प्रमुख कारण म्हणजे, तीन रंगांमधला ३ चा आकडा, हिंदुधर्मात 'अशुभ' मानला जातो म्हणूनच"... पृथ्वीगोलाप्रमाणे अशा मूलभूत स्वरुपाच्या गोलाकारात असलेली आपली संसद-भवनाची अतिसुंदर वास्तू सोडून 'सेंट्रल व्हिस्टा'अंतर्गत नव्याने बांधली गेलेली संसद-भवनाची इमारत 'त्रिकोणी' आहे... म्हणजेच, तीन बाजुंनी बनलेली आहे, मग इथे ३ चा आकडा, अंधश्रद्धाळू - लोकांना 'अशुभ' वगैरे वाटू नये?)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com