Top Post Ad

सर्व काही EVM वरून लक्ष विचलित करण्यासाठी


सध्या देशातील अनेक राज्यात , सत्ताधाऱ्यांकडून हेतुपुरस्सरपणे लोकांना संभ्रमित करणाऱ्या घटनांना खतपाणी घातले जात
आहे, सत्ताधाऱ्यांना संविधान आणि आरक्षण दोघांना संपविण्याचा कार्यक्रम नाही, परंतु असे दाखविले जात आहे की संविधान आणि आरक्षण या दोन्हीना सत्ताधाऱ्यांकडून धोका आहे. ब्राह्मण समाज सोडून सर्व समाज या षडयंत्रास बळी पडला आहे. ब्राह्मण आणि बनिया हे दोन्ही समाज अल्पसंख्याक असून त्याना समोरासमोर बहुसंख्य लोकांचा सामना करणे परवडणारे नाही, बहुसंख्य लोकांची मुस्कटदाबी करण्यासाठी आज हे दोन्ही समाज संविधानिक संस्थाचा वापर करत आहेत. अदानी, अंबानी, टाटा,बिर्ला इत्यादी उद्योगपतींना भारत असुरक्षित झालेला परवडणार नाही, या भांडवल दारांची प्रसार माध्यमे नेहमीच सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून लुटत आहेत, ही लूट करण्यासाठी त्याना संविधानाची खूप मदत होते, कारण भारतात नेहमी बोलले जाते की "संविधान सर्वांची काळजी घेते" आणि ते खरे ही आहे.

पुण्यात आणि वाराणसीत ब्राह्मण समाज आरक्षणासाठी मोर्चे काढतात आणि दुसरीकडे तोच ब्राह्मण समाज दिल्लीत जंतरमंतर वर संविधान जाळून आरक्षणा विरोधात घोषणा देतो. यावरून आपण एक खात्री करून घेतली पाहिजे की देश शांत राहणे ब्राह्मण समाजाला धोकादायक असते, आज ब्राह्मण समाजाचे कवचकुंडले असणारा मराठा समाज किंवा क्षत्रिय राजपूत समाज हे ब्राह्मणांपासून दूर चालले आहेत, ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे, पण हीच बाब ब्राह्मण समाजाच्या पचनी पडत नाही, त्यातूनच देशात मोर्चे आंदोलने कसे सुरू होतील या साठी जीवाचा आटापिटा केला जात आहे. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, इत्यादी सारखे देशांतर्गत देशद्रोही निर्माण केले जात आहे, जेणे देशातील परिस्थिती सतत असंवेदनशील ठेवली जाईल. काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी दोन्ही राजकीय पक्षांनी EVM चा वापर करून सत्ता भोगल्या आहेत, जेव्हा काँग्रेसला कळले की देशातील जनता आपल्याला वीटली आहे, ती आपल्याला सत्तेपासून दूर करेल, या भीतीपोटी काँग्रेसने सत्तेची सूत्रे स्वमर्जीने EVM च्या साहाय्याने भाजपाकडे दिली, आणि असे वातावरण निर्माण केली की नरेंद्र मोदींने मेहनत केली, आणि सत्तांतर झाले, सर्वात महत्वाचे म्हणजे EVM नसते तर आज देशाची सूत्रे येथील बहुसंख्य लोकसंखेतील व्यक्ती कडे असती, काँग्रेस ला तिसरा लक्ष देशात सत्तेवर यावे असे कधीच वाटत नव्हते, आज सर्वात मोठे आव्हान आहे जनतेकडे की त देशातून EVM इतर परदेशी देशांसारखे हद्दपार कसे होईल, जेव्हा जेव्हा गैरकाँग्रेसी पक्ष सत्तेवर यायची परिस्थिती निर्माण व्हायची तेव्हा देशांतर्गत वातावरण दूषित केले जाते.

आज संपूर्ण देशाने एक होऊन EVM विरोध करून EVM च्या हद्दपारी साठी प्रयत्न करावा. आज संविधान आणि आरक्षण या दोन्ही बाबींची अल्पसंख्याक ब्राह्मण समाजाला खूप गरज आहे, संविधान आणि आरक्षण या दोन्ही बाबींना ब्राह्मण समाज कधीच बदलणार नाही अथवा बंद करणार नाही, स्वतः ब्राह्मण समाज आरक्षण आणि घटना यांची सुरक्षा केल्याशिवाय राहणार नाही. एकदा का संविधान रद्द केले तर ब्राह्मण समाजाला खात्री आहे भिमाकोरेगावच्या विजयाची पुनरावृत्ती होऊ शकते. भीमा कोरेगावची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संविधान असणे खूप गरजेचे आहे.
त्यामुळे निषेध, आंदोलने आणि मोर्चे काढतात कोणत्या गोष्टींसाठी काढतो याचा विचार करून पावले उचलावीत. कारण भूतकाळात चार्वाक, महामोगलायन, शंकराचार्य, संत रोहिदास, संत तुकाराम, संत चोखामेळा, बसवेश्वर, चक्रधर, संत ज्ञानेश्वर आणि भावंडे, कान्होपात्रा, मीराबाई, विवेकानंद त्यांच्या हत्या झाल्या, या हत्त्यामुळे ब्राह्मण समाज पडला नाही, कारण त्याने तीन भयानक पावले शस्र बंदी, मालमत्ता बंदी आणि शिक्षण बंदी करून उचलली होती,या तीन पावलामुळे येथील समाज बहुसंख्य असूनही पंगू आणि अपंग झाला होता, ती बंडाची भाषा बोलत नव्हता,

पण आज ड्रा. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामूळे देशातील हा बहुसंख्य समाज जागा झाला आहे, त्याला आपले भले कशात आहे हे उमगले आहे, त्याने आता बंडाचा झेंडा उभारला हे बंड फक्त आपण संविधानामुळे थंड करू शकतो याची ब्राह्मणाना खात्री आहे. आपण हुररे हुरर पंढरपूर असे न करता प्रतिक्रियावादी पणा सोडून दिला पाहिजे.आपण नेहमी प्रतिक्रिया देण्यात आपले रक्त आटवले आहे आणि त्यांचीही ही इच्छा असते तुम्ही सतत आंदोलने, मोर्चे करत रस्त्यावर रहावे, प्रगतीकडे दुर्लक्ष करावे.
हे सर्व करत असतात मुख्य रोगावर म्हणजेच EVM वर इलाज करण्याचा विसर पडनार , याची बहुसंख्य लोकांनी काळजी घ्यावी.

....दिनकर सोनकांबळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com