गावात कोणत्याही प्रकारचा जातीयवाद नाही, कायदेशीररीत्या अतिक्रमण असलेले बांधकाम पाडण्यात आले, पण गावची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न बाहेरच्या व्यक्तींकडून सुरू असल्याचा आरोप आता बेडग येथील गावकऱी करत आहेत. तसेच या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींच्या विरोधात कारवाई करावी, अन्यथा गाव बेमुदत बंद ठेवण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. यामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याच्या मार्गावर आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडगमधील स्वागत कमान ग्रामपंचायतीकडून पाडण्यात आल्यानंतर गावातील आंबेडकरी समाजाने गाव सोडून लाँग मार्च सुरू केला. यानंतर राज्य सरकारकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची आदेश दिले आहेत. त्यानुसार सरपंच, उपसरपंचासह तिघांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच प्रशासनाकडून कमान पुन्हा उभारण्यात येणार असल्याने येथील ग्रामस्थ संतप्त झाले असल्याची चर्चा आंदोलकांमध्ये केल्या जात आहे. त्यामुळेच गाव बेमुदत बंद ठेवण्याची भाषा येथील ग्रामस्थ करीत असल्याचेही आंदोलकांचे म्हणणे आहे.
बेडगमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारली जात असलेल्या स्वागत कमानीचे खांब ग्रामपंचायतने पाडल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर गाव सोडून मुंबईकडे प्रस्थान केलेल्या आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली होती. सरकारी खर्चातून कमान बांधून देऊ तसेच याप्रकरणी दोषी असणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना दिले. त्यानुसार सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत.
बेडग गावातील स्वागत कमान संदर्भात समाज माध्यमांवर कोणत्याही अफवा पसरवू नका. बेडगच्या ग्रामस्थांनी गावात सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण करावा, या घटनेमुळे गावात कोणताही भेदभाव होऊ नये, याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यावी. सर्वांनी गावाच्या विकासासाठी पुन्हा एकत्र येणे अपेक्षित असून त्यासाठी सर्वांनी आपापसात सुसंवाद ठेवून कृती करावी. प्रशासनामार्फत सर्वांना सहकार्य केले जाईल, बेडग गावातील स्वागत कमानीच्या अनुषंगाने समाज माध्यमावर कोणताही चुकीचा संदेश जाऊ नये. तसेच, दोन समाज बांधवांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, याची खबरदारी गावकऱ्यांनी घ्यावी. या संदर्भात समाज माध्यमातून चुकीचे संदेश देणाऱ्यांवर आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
.............
बेडग प्रकरणी FIR च्या अनुषंगाने काही महत्वाची निरीक्षणे
बेडग-स्वागत कमानीच्या पायाभरणी नंतर मुख्य काम सुरू असताना जातीय द्वेषभवणेतून सरपंचांनी हिणकस वृत्तीने कमानीच्या कामाला बेकायदेशीर ठरवून पाडले.
"आम्ही महार समाजाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामानीखालून जायचे का ? असे वक्तव्य करणाऱ्या-सरपंच उमेश पाटील यांच्या विरोधात IPC 295 अट्रोसिटी ऍक्ट 3(1)r,s,t नुसार गुन्हा नोंद करण्यात आली आहे.
बेडग-येथील फिर्यादी डॉ महेशकुमार कंबळे उच्चशिक्षित आहे परंतु अजूनही हिंदू महारच आहे. फिर्याद देताना अट्रोसिटी विषयातील कायदेतज्ज्ञ चा सल्ला घ्यायला हवा होता.जवाब कमकुवत असल्याने जामीन होईल. परंतु यापुढे योग्य कायदेशीर सल्ल्यानुसार कोर्टात मॅजिस्ट्रेट समोर जवाब देताना परिपूर्ण आणि आरोपींना शिक्षेपर्यंत घेऊन जाणारा हवा .त्यासाठी समाजातील अनेक तज्ञमंडळी आहेत त्यांची मदत घ्यावी .
बेडग ते मंत्रालय मार्च काढून आपण विरोध केला आणि स्वाभिमानाने गाव सोडले हे अभिमानास्पद आहे परंतु एवढ्याने आरोपींना सजा नाही होणार त्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत सक्षमपणे उभे राहिले पाहिजे .न टिकणारी FIR मुळे आरोपीं सहज जामिनावर सुटतात आणि त्यांचा विश्वास अजूनच दृढ होतो की बिनधास्त अन्याय करा काही होत नाही. हे होऊ दयायचे नसेल तर कायदेशीर बाबी हाताळताना अनुभवी आणि योग्य (मॅनेज ना होणाऱ्या) व्यक्तीच्या सल्ल्याने आणि अट्रोसिटी ऍक्ट मध्ये सातत्याने काम करणाऱ्या तज्ञ वकिलाची मदत घ्या .आपण लढाई नक्कीच जिंकून बेडग च्या आंबेडकरी समाजाला न्याय देऊ. - अॅड.दादाराव नांगरे +91 7977043372
0 टिप्पण्या