जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा एक फोटो ट्विट करून त्यांच्यावर अवघ्या देशाचे वाटोळे केल्याचा आरोप केला. तसेच टोपी घातली म्हणून कुणी गांधी होत नाही, असा टोलाही त्यांनी हजारेंना लगावला. यावर अण्णा हजार म्हणाले की, "माझ्यामुळे देशातील नागरिकांचा भले झाले. मात्र, त्यांच्या काही कार्यकर्त्यांना सत्तेपासून दूर व्हावे लागले, याची खंत त्यांच्या मनामध्ये असावी म्हणून त्यांनी असे ट्विट केले. याबाबत वकीलांशी चर्चा करून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
अहो अण्णा
कोविडच्या दुःखद कालखंडानंतर भारतीय जनता पक्षाने उध्दव ठाकरे सरकारला पाडले हे सर्वश्रुत आहे .साक्षात.बाळासाहेब ठाकरेंच्या .तालमीत तयार झालेले शिलेदार.फुटले. भाला बर्ची आणि उरले सुरले धनुष्य बाण घेऊन बाहेर पडले. सत्ताज्वराने पछाडलेल्या या मंडळींना इलाज करण्यासाठी .सुरतेस नेण्यात आले. पण तिथे यांना त्या वैद्यांची मात्रा लागू पडली नाही .अखेरीस सत्ता मदालसलेने ग्रासलेल्या व पछाडलेल्या.लोभीजणांस गुवाहाटीची ग्रामदेवता कामाख्या मायेच्या चरणी नतमस्तक झाले . त्यांना इथला मंत्र मात्रा लागू पडली आणि.....थेट मुंबई गाठली. तो सत्तेत वाटेकरी होऊनच. आघाडीचे सरकार पाडून कर हा कमलाकर धरीला .पण वर्ष सरते.न सरते.तोच पाठशिवणीचा खेळ सुरू झाला.आणि घड्याळ फुटल .... कुरघोडीचे राजकारण सुरू झाले . गाद्दारी. ..फंड फितुरी वाल्यांची पाचावर धारण बसली आहे . धकातल्या राजकारणात मंत्री जाण्याची भीती .त्यामुळे बाहुबलीच्या खेळात.रंगत आली आहे इतके महाभारत होऊन ही आणा यांचा कुंभकर्णी डोळा काही केल्या उघडेणा .
आज आम्हा सर्वांना तुमची गरज आहे . आतातरी डोळे उघडा.. बघा.नीट.काय दशा झाली आहे .तुमच्या.आंदोलनाची. खरे तर. अण्णा हजारे यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी झाडे आणि त्यांचं महत्व.लक्षात घेऊन हिरवी वनराई ही संकल्पना महाराष्ट्रात राबवली. वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे संत.तुकाराम महाराजांच्या अभंगाचे महत्व लोकांमध्ये बिंबवले झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचा समतोल राखला .तर. पाऊसही चांगला पडेल दुष्काळापासून.वसुंधरेचे रक्षण होईल असा जागतिक संदेश देणारे अण्णा पुढे राजकीय व शासकीय भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन सुरू केले . आण्णांनी भ्रष्टाचार विरोधी तुतारी फुंकली त्याचा प्रतिध्वनी चांगला आला. आणि अण्णा हजारे यांचे हरेक आंदोलन जनंआंदोलन बनले .हे जरी कटु सत्य असेल तरी प्रत्यक्षात मात्र त्यांचा बोलविता धनी कोण ? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
अण्णा हजारे यांनी जी आंदोलने केली ती विशेषतः ओबीसी आणि मागास प्रवर्गातील नेत्यांच्या.विरुद्ध.आण्णांनी भटा बामनाच्या अथवा मराठा .नेत्यांच्या विरोधात.कधीही आंदोलन पुकारले नाही. त्यांच्या.रोषाचे धनी होण्याचे अण्णानी काळजीपूर्वक टाळले . हे त्रिकालाबाधित सत्य कोणीही नाकारू शकत नाही. आण्णांनी केलेल्या आंदोलनाचा आलेख तपासून पाहा..शिवसेना भाजप युती सत्तेत असताना आण्णांनी पाहिले रणशिंग.फुंकले ते बबनराव घोलप यांच्या विरुद्ध त्या पाठोपाठ छगन भुजबळ, गावित, गणेश नाईक.अशी अनेक उदाहरणे देता येतील. अण्णा हजारे.हे भारतातील.एक भारदस्त व्यक्तिमत्व आहे.त्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत प्रेम व आदर आहे अभिमान आहे.पण त्यांनी.वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेमुळे संशयाचे धुके दाटले आहे असे वाटते.
माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी दिल्लीत रामलीला मैदानावर जिवाचं रान केलं ते अधिकार कायदा अमलात आणण्यासाठी माहिती अधिकार कायदा २००५ अमलात आला खरा ,पण या आंदोलनाचा खर्च कोणी केला. शिवाय यामागे कोणाचे .काय.राजकीय सामाजिक आर्थिक.हित संबंध गुंतलेत आणि काय साध्य झाले आहेत. हे हेही अद्याप गुलदात्याच आहे असो. त्याचा इथे काही संबंध नाही. मुद्दा इतकाच आहे की .सध्या महाराष्ट्रात आणि.देशातही अनेक सामाजिक व राजकीय घडामोडी वेगात घडताहेत पण तिकडे लक्ष कोण देतो? राज्यातले राजकारण पार रसातळाला .गेले आहे .महाराष्ट्राला.तुमची.गरज.आहे अण्णा विजनवास सोडा ,मौन तोडा हीच वेळ आहे पुन्हा एका.नव्या आंदोलनाची ...
जॉन मेढे 88285 76508
0 टिप्पण्या