Top Post Ad

धारावीतील अनधिकृत बांधकामांविरोधात आंदोलन

 आशिया खंडातील धारावी झोपडपट्टी कुणाला माहीत नाही असे नाही. अशा झोपडपट्टीमध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव सुटले आहे.  या अनधिकृत बांधकामाविषयी कुणी समाजसेवक, पञकार, कार्यकत् आवाज उठवितात. त्यांचा आवाज दाबण्याचा, तो आवाज चिरडण्याचा डाव खेळला जातोय. असाच काहीसा प्रकार धारावीतील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर स्वामी आणि सहकाऱ्यांसोबत घडला आहे. ज्यामुळे त्यांच्या जीविताचे केव्हा ही बरेवाईट होऊ शकते. मात्र शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे अधिकारी थातूरमातूर कारवाई करून कारवाईच्या मागणीला भीक घालीत नाहीत. या विरोधात २ अॉगस्ट २०२३ रोजी धरणे आंदोलन, आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वामी यांनी दिली.

यापुढे जाऊन त्यांनी म्हटले आहे की, सरकारने आमच्या या मागणीचा विचार न केल्यास लवकरच २ अॉक्टोबर २०२३ रोजी आझाद मैदान याठिकाणी धरणे आंदोलन करणार असून धारावीच्या विकासाला बाधा ठरणाया् ठाकरे गटाचे शिवसेना गटाचे माजी नगरसेवक टी.एम. जगदीश, वॉड् अॉफिसर, डिमोलेशनचे अधिकारी, तसेच पोलीस अधिकारी, ठेकेदार ही मंडळी जबाबदार आहेत. आमच्या या धरणे आंदोलनाला विभागातील विविध सामाजिक संस्था, संघटना यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागेल.कारण सरकारच्या विकासाला हातभार
कसा लागेल आणि धारावीचा विकास कसा होईल हयाच् ध्येयाने आमची वाटचाल सुरू आहे. गेली १२ वर्षे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासंबंधी पञव्यवहार सुरू आहे. परंतु ठोस कारवाई न केल्याने ठेकेदार ही माजले आहेत. त्यांना कसलीच कायदयाची भीती वाटत नाही. याउलट नगरसेवक, मनपा अधिकारी, पोलीस अधिकारी खिशात आहेत. ज्यांच्या आशिवादा्मुळे ३/ ३,४/ ४,५/ ५ माळयाच्या अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. आणि केली जाते आहे.

हया अनधिकृत बांधकामावर मनपाचे अधिकारी कारवाई करीत नाही म्हणून न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा मनसुबा आहे. परंतु मनपा विभागाचे अधिकारी, पोलीस ठाण्याचे अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेणार आहे का हा ही खरा प्रश्न आहे. कारण न्यायालयात न्याय मिळतो. पण वेळ अधिक जातो. पण लवकरच ती ही तयारी करून ठेवली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या विभागातील ६ प्रभागामध्ये पावसाळा आहे म्हणून १०/ १०, २०/ २० अनधिकृत बांधकामे केली जाते आहे. आणि इतर दिवशी ३०/ ३०,४०/ ४० अनधिकृत बांधकामे केली जाते आहे. मग त्या अनधिकृत बांधकामांना आळा केव्हा बसणार? का? बेहरामपाडयाची वाट पाहणार हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. का? आमची आहुती, बळी घेतल्याशिवाय कारवाई होणार नाही? हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे.

सुरेश गायकवाड, पञकार ९२२४२५०८७३


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com