मुंबई- चेंबूर उपनगरातील डायमंड गार्डन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथे मणिपूर मधील महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात निदर्शने व संभाजी भिडे यांनी देशविरोधी वक्तव्य केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणेसाठी, महापुरुषांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी अाको्श रॅलीचे आणि तीव्र निदर्शने करण्यात आली.या आक्रोश रॅलीमध्ये भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गंगावणे यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करून संभाजी भिडे वर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. तसेच मणिपूर राज्यातील महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात निदर्शने व्यक्त करून तेथील सरकारचाही निषेध करण्यात आला. आणि दोषींवर तात्काळ करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
तसेच भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी देखील भारत सरकार सहित राज्य सरकारचा निषेध केला आहे. आणि १५ अॉगस्ट स्वातंत्र्य दिनी जेथे खांब दिसेल तेथे तिरंगा ध्वज फडकविला जाणार आहे. यापुढे भीम आर्मीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अविनाश गरूड यांनी देखील सरकारचा निषेध केला. यावेळेस भीम आर्मीच्या महिला उपाध्यक्ष सुशिला कापूरे,सुनिल थोरात, सुनील गायकवाड, समिंदर,राजेश लोंढे आदी विविध पदाधिकारी यांनी मणिपूर मधील घटनेचा निषेध व्यक्त करून संभाजी भिडेला अटक करण्याची मागणी करण्यात आली. या, आक्रोश रॅलीमध्ये विविध सामाजिक संस्था, संघटनांनी सहभाग घेतला होता.
0 टिप्पण्या