जोशी-बेडेकर महाविद्यालय विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरण
संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची युवा सेनेची मागणी
ठाण्यातील जोशी-बेडेकर, बांदोडकर महाविद्यालयाच्या आवारामध्ये एन सी सी च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाला असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ठाणे युवा - युवतीसेनेचे पदाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेऊन महाविद्यालयाच्या प्राचार्य सुचित्रा नाईक आणि पोलिस उपायुक्त परिमंडळ १ चे गणेश गावडे यांना पत्राद्वारे संबंधितावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची दखल घेऊन मुंबई युवासेना कोर कमिटी यांनी सेंट्रल मैदान येथील पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयात भेट घेऊन थेट प्राचार्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन देण्यात आले आहे.
त्यावेळी युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, पवन जाधव, सिद्धेश धाऊस्कर, माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, मिलिंद साटम, डॉ.सुप्रिया करंडे, शितल शेठ देवरुखकर, युवसेना अधिकारी ठाणे किरण जाधव, जयदीप जाधव, ठाणे शहर विधानसभा उप समन्वयक सौरभ निकम, विधानसभा अधिकारी ओवळा माजिवडा पूजा भोसले, जिल्हा समन्वयक युवतीसेना आरती खळे, राज वर्मा, आकाश कदम, रीतेश देशमुख, रुपेश जाधव, शार्दुल म्हाडगुत, चेतन थोरात तसेच इतर युवासेना, युवतीसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
याप्रकरणी एनसीसीने निवदेन जारी केलं आहे. एनसीसीने याबाबत म्हटलं आहे की, नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एनसीसी ट्रेनिंगदरम्यान विद्यार्थ्यांवर अमानुष कारवाई करण्यात आली आहे. ही कृती अत्यंत निंदनीय आहे. हा कोणत्याही एनसीसी प्रशिक्षणाचा भाग नाही. संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्याला महाविद्यालयाने निलंबित केलं आहे. गुन्हेगार कॅडेट किंवा माजी कॅडेटच्या या कृतीमुळे एनसीसी व्यथित झाली आहे. एनसीसीमध्ये आम्ही आमच्या कॅडेट्समध्ये सामाजिक मूल्ये आणि लष्करी नैतिकता बिंबवतो, परंतु, या कृतीला त्यात काहीही स्थान नाही.
0 टिप्पण्या