ठाण्यात कॅडबरी जंक्शनला चेतन चिटणीस यांनी चुकीच्या पद्धतीने वाहने उचलणाऱ्या आणि लुटालुट करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांबरोबर खडाजंगी करून सगळ्या गाड्या सोडायला लावल्या. गाड्या उचलून नेणाऱ्या व्हॅनच्या ड्रायव्हरकडे लायसन्स नव्हतं. गाड्या उचलण्याची कारवाई करण्याची परवानगी असल्याची कागदपत्रे नव्हती. योग्य पात्रतेचा अधिकारी गाडीमध्ये उपलब्ध नव्हता. गाड्या उचलण्याचं काम करणाऱ्या मुलांकडे कुठलीही पद्धतीचे अधिकृत ओळखपत्र नव्हती. तरीही हे लोक गाड्या उचलून पाच पाचशे, सात सातशे रुपये वसूल करतात. उघड उघड चाललेल्या लुटालुटी विरोधात घेतलेल्या भुमिके बद्ल चिटणीस यांच ठाण्यात सर्वत्र कौतुक होत होते. मात्र आता त्यांच्याच विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शिरसाठ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रस्त्याच्याकडेला बेकायदा उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे सांगत वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर पोलिस टोईंग वाहनाद्वारे कारवाई केली जाते. चेतन चिटणीस आणि रुतू टेलर यांनी शासकीय कामात अडथळा आणला. तसेच टोईंग वाहनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फटके मारण्याची धमकी देत चिथावणी दिली. टोईंग वाहनावरील चालकाने वाहन परवान्याची छायांकित प्रत दाखवली, असे असतानाही चिटणीस आणि टेलर यांनी टोईंग वाहनावरील वाहने सोडण्याची जबरदस्ती केली. त्यानंतर टोईंग वाहन जाऊ दिले, असे तक्रारीत म्हटले आहे.
उपवन येथे टोईंग वाहन चालकाकडे परवान्याची प्रत नसल्याचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाले होते. यामध्ये चेतन चिटणीस यांनी टोईंग वाहन चालकाकडे वाहन परवान्याची तसेच टोईंग वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी संबंधित चालकाकडे वाहन परवाना नसल्याचे चित्रीकरणामध्ये दिसत होते. हे चित्रीकरण सोमवारी दिवसभर ट्विटर, फेसबुक, इन्टाग्राम या समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. या प्रकरणात ठाणे पोलिसांनी चिटणीस आणि टेलर या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
या आधीही सामाजिक कार्यकर्ते अजेय जया यांनी याबाबत आवाज उठवला होता. पोलीस वाहतूक शाखा व खाजगी टोईंग एजन्सीजच्या संगनमताने राजरोस चाललेल्या करोडो रुपयांचा आर्थिक महाघोटाळ्याचा पर्दाफाश धर्मराज्य पक्षाचे संघटक 'अजय जया यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना माहिती उघड केली होती. माहिती अधिकाराच्या सहाय्याने ठाणे शहरातील पोलीस वाहतूक शाखा व खाजगी टोईंग एजन्सीजच्या संगनमताने शासकिय तिजोरीत पुरेपूर भरणा न होताच, परस्पर प्रशासनाच्या सहाय्याने आर्थिक लुट होत असून याबाबत पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी जाणिवपूर्वक डोळोझाक करीत आहेत. याबाबत माहिती मागितली असता उलट आरोप करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न माझ्यासारख्यांना केला जात असल्याचा आरोपही अजय यांनी केला होता.
0 टिप्पण्या