Top Post Ad

मात्र सर्वसामान्य भाविकांना श्रीराममंदीराच्या गाभाऱ्यात प्रवेश बंदी


 राममंदिर सर्व सामान्यासाठी खुले झाल्यानंतर रामाच्या मूर्तीला हात लावता येणार नाही. अयोध्येमध्ये राममंदिरात श्रीराम दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश करता येणार नाही. तर भाविकांना मंदिराच्या अंदाजे 35 फूट अंतरावरून दर्शन घेता येणार आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात फक्त राजा आणि पुजाऱ्यांचा असतो, अशी मान्यता हिन्दू धर्मात आहे. या परंपरेनुसार, देशाचे पंतप्रधान आणि पुजारीच गाभाऱ्यात जाऊ शकतो, असा निर्णय  राममंदीराची ट्रस्टीने  सांगितला आहे.  तसेच राम मंदिरात पुजारी आणि कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा दिल्या जातील, अशी माहिती रामजन्मभूमीचे मुख्य आर्किटेक्ट आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली आहे. तसेच पुजाऱ्यांच्या निवासाची आणि वैद्यकीय सुविधांबरोबरच निवास भत्ताही पुजारी आणि कर्मचार्यांना दिला जाणार आहे.
 राममंदीर जमिन घोटाळा, दहा मिनिटात जमिनीच्या भावात सुमारे १६ कोटीची वाढ

जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अयोध्येतील राम मंदिरात गर्भगृह उभारणीचे काम सुरू झाले. राममंदिराच्या गर्भगृहाचा आकार 20 फूट रुंद आणि 20 फूट लांब असेल.  हिंदू मंदिरांमध्ये अनेक भाग असतात, त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे गर्भगृह. हा तो भाग आहे जिथे देवतेची मूर्ती स्थापन केली जाते. तिचा आकार, प्रकार आणि मूर्ती ठेवण्याचे ठिकाण ठरवले जातेच पण ती शास्त्रोक्त पद्धतीने केली जाते. जिथे देवतांच्या मूर्ती ठेवल्या जातात, त्या खोलीला गर्भगृह म्हणतात. साधारणपणे गर्भगृह ही खिडकीविरहित आणि अंधुक प्रकाश असलेली खोली असते,  देवतेची मूर्ती मध्यभागी ठेवली जाते. काही प्राचीन मंदिरांमध्ये गर्भगृह मंदिराच्या मुख्य मजल्यावरच्या तळघरात आहे. बहुतेक गर्भगृह मंदिराच्या मध्यभागी आहे, गर्भगृहाच्या एका बाजूला मंदिराचा दरवाजा आणि तीन बाजूंना भिंती असतात.  देवाची वेदी खुल्या सभामंडपात बांधू नये. मोठ्या सभामंडपात एक छोटी खोली असते, ज्यामध्ये वेदी बनवली जाते.  पवित्र वस्त्रे परिधान करून गर्भगृहात प्रवेश केला जातो. अपवित्र वस्त्रात असेल तर सभामंडपातून दर्शन घ्यावे असे शास्त्रात सांगितले आहे. 

मानवमुक्तीचा लढा अधिक गतिमान करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच कोल्हापुरातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात स्त्रीमुक्तीच्या लढय़ाचे पहिले पाऊल पडले. वस्तुत: याचे रनशिन्ग म.न,से. आमदार  .राम कदम यानी फुन्कले होते, पण इथेही भा.ज .पा. ने राजकरण करत भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करून देवीच्या पहिल्या गाभाऱ्यात प्रवेश केला  कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी हि गेली अनेक वर्षे चालु होते. अपवाद फक्त राज घराण्यातिल/ आणि Celebrity स्त्रिया यांचा होता. मुळात मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी का? याचे समाधानकारक उत्तर तेथिल ब्राम्हण पुजारि का देउ शकत नाहित. तथापि अलीकडच्या काळात हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि महिलांनी आंदोलन करीत सत्याग्रहाने एक नवे पाऊल पुढे टाकले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com