गृह सचिवांचे चौकशीचे आश्वासन
- मुंबई महापालिका जी / उत्तर विभाग यांच्या हद्दीतील धारावी विभागात मोठया प्रमाणात दोन, तीन, चार माळयाच्या वाढीव अनधिकृत बांधकामांना संरक्षण देऊन बांधकामावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर स्वामी यांनी आज आझाद मैदानात आंदोलन केले
धारावी परिसरात मोठ्या प्रमाणात वाढीव अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. गेल्या २५ वर्षापासून धारावीचे पुनर्वसन रखडले आहे. आता मात्र धारावी विकासाचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना काही समाजघातक वृत्ती कंत्राटदार , राजकीय माफीया, मिळून धारावीच्या विकासात अडथळा आणण्याचे प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात मोठया प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरु केले आहे .मात्र धारावीचा विकास व्हावा ही आमची प्रामाणिक पणे इच्छा असून काही विघ्न संतोषी लोकांकडून या कामात अडथळा निर्माण केला जात आहे. गेल्या १२ वर्षा पासून विश्वात्मक सामाजिक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही अनधिकृत बांधकामा संदर्भात जनजागृती करत आहोत मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांचे राजकीय नेत्यांसोबत असलेल्या सबंधामुळे अशा बांधकामावर कारवाई होत नाही .
अशा अनधिकृत बांधकामांना संरक्षण देऊन बांधकामावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आपण आझाद मैदानात आंदोलन केले तसेच या आंदोलनाची दाखल घेत उपसचिव गृह विभागाची भेट घेऊन त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती स्वामी यांनी दिली .
0 टिप्पण्या