Top Post Ad

व्यापारी वर्गाच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने ठाणे कडकडीत बंद

 


   मराठा आरक्षण प्रश्नी उपोषण आंदोलन दरम्यान जालन्यात झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजातर्फे आज ठाणे बंद पुकारण्यात आला. या बंदला सर्वपक्षीय नेत्यांनी आपला पाठिंबा दर्शवला.  ठाण्यातील व्यापारी वर्गाने या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र पहायला मिळाले. शहरातील मुख्य बाजारपेठ, टेंभीनाका कोपरी, वागळे इस्टेट भागातील दुकाने बंद होती. अनेर दुकानदारांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला. 

टीएमटीची वाहतूक सुरळीत होती. तर रिक्षांची संख्या दररोजच्या तुलनेत कमी असल्याने नोकरदार आणि कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. बंदमुळे शाळा सुरू आहेत की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. शाळा महाविद्यालय प्रशासनाने ज्यांना शाळेत यायचं आहे त्यांनी आपल्या जबाबदारीवर यावे असे सांगितल्याने विद्यार्थी वर्गाने शाळेत हजेरी लावली.

 


 बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी ठाणे पोलिसांकडून शहरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुमारे दोन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहरात तैनात होते.  वाहतूक व्यवस्थेवर कोणताही परिणाम झाला.  अत्यावश्यक सेवा बंद करत नसल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आल्याने शांततेत बंद पाळला जात असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळाले.

मराठा आरक्षणासंदर्भात सुरु असणारे आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. जालन्यातील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे पडसाद समाजातील अनेक स्तरांवर उमटतांना दिसत आहेत. असे असतानाच मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजातर्फे सोमवारी ठाणे बंदची हाक देण्यात आली होती. या संदर्भात शनिवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात झालेल्या  बैठकीला सकल मराठा समाजाचे ठाणे जिल्हाध्यक्ष व भाजपचे शहर पदाधिकारी रमेश आंब्रे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दत्ता चव्हाण, ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मनसेचे नेते अविनाश जाधव, राष्ट्रवादी(शरद पवार गट)  ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई, भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष प्रदीप शिंदे आणि पदाधिकारी राजेंद्र महाडिक यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते. हा बंद शांततेच्या मार्गाने करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. तर, कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी भूमिका मांडत काँग्रेस पक्षाने ठाणे बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com