कल्याण दुय्यम उपनिबंधक कार्यालयाला बेकायदेशीर संगणक ऑपरेटर आणि दलालांचा विळखा

Top Post Ad

 


महाराष्ट्र शासनाने कोणतीही अधिकृत संगणक ऑपरेटर पोस्ट भरलेली नसताना  कल्याण चिकनघर येथील दुय्यम निबंधक-२ कार्यालयात अनधिकृत बेकायदेशीर संगणक कर्मचारी म्हणून सौ संजना उर्फ सुषमा संजय शिरसाट या गेले सहा सात वर्षापासून दुय्यम निबंधकाच्या आशीर्वादाने कार्य करीत आहेत. दुय्यम निबंधक व वरिष्ठ अधिकारी जिल्हा निबंधक मुद्रांक ठाणे यांच्या मेहरबानीने असे अनेक कर्मचारी भरती करून कार्यरत आहेत. हे लोक काम करताना संपूर्ण कार्यालयाचा ताबा घेतात.या अनधिकृत कर्मचाऱ्यांच्या ताब्यात हे कार्यालय असल्याने त्यांची मनमानी असल्याचा आरोप अॅड. जमिर हसन आर. अहमद शेख यांनी त्यांनी लेखी तक्रारीद्वारे केला आहे.

 भ्रष्टाचारावर व गैरवर्तनाबाबत पक्षकार दस्त नोंदणी धारक, वकील यांनी आक्षेप घेतलेले असतानाही अनधिकृत संगणक ऑपरेटर म्हणून संजना उर्फ सुषमा शिरसाट सहा सात वर्षे कार्यरत आहेत.त्यांच्यावर निबंधक/जिल्हा निबंधक मुद्रांक यांचे आशीर्वाद आहेत. असे बाहेरील अनेक कर्मचारी या ठिकाणी काम करतात. असेही अहमद शेख यांनी त्यांनी लेखी तक्रारीत नमूद केले आहे.

 कल्याण कार्यालयात दलाल, अनधिकृत स्टॅम्पवेंडर,बॉण्ड रायटर यांचा दिवसभर वेढा पडलेला असतो. या कार्यालयात दलालांशिवाय व स्थानिक स्टॅम्प वेंडर, बॉण्ड रायटर यांच्या शिवाय कोणतेही काम केले जात नाही. दलाल पाहिजे तेव्हा  शिरसाट यांच्याकडून टोकन घेतात आणि नोंदणी पूर्व गोषवारा त्यांना त्वरित करून देतात. दस्त नोंदणीची पावती फाडून देतात. बेकायदेशीर दस्त नोंदण्या करून देतात.  मात्र या कार्यालयात येणारे पक्षकार आणि वकील यांची कामे मात्र बाजूला ठेवली जातात. यांच्याशी शिरसाट या शिष्टाचाराने न वागता गैरवर्तन करतात, अर्वाच्य भाषा वापरतात तसेच त्यांच्या कामाकडे मुद्दाम जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून विलंब करतात.याबाबत पक्षकार आणि वकिलांनी दुय्यम निबंधक यांच्याकडे तोंडी तक्रार केली असता तेही वेळोवेळी मुद्दाम दुर्लक्ष करतात. कारण त्यांच्यावर स्थानिक स्टॅम्पवेंडर व दलाल यांचा दबाव असतो.

 महसूल मंत्री,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच नोंदणी महानिरीक्षक पुणे, जिल्हा निबंध मुद्रांक जिल्हाधिकारी, कल्याण बार कॉन्सिल सर्वांकडे याबाबत तक्रार दाखल दाखल केलेली आहे. या कार्यालयाबाबत त्वरित कारवाई करून अनधिकृत व गैरमार्गाने भरलेले जेवढे कर्मचारी आहेत त्यांना व सौ शिरसाट यांना तात्काळ बाहेर काढण्याची मागणी करून त्यांनी स्टॅम्प वेण्डर व दलाल बॉण्ड रायटर यांच्याबाबत लेखी तक्रार केलेली आहे.याबाबत कारवाई होणार की नाही असा प्रश्न येथे येणाऱ्या नागरिकांना पडला आहे.  

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या