परदेशी फंडींगचा आरोप करीत दिल्ली पोलिसांनी न्यूजलिंक या वृत्तसंस्थेच्या पत्रकारांच्या घरांवर, कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली. हा प्रकार पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, अशी टीका करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाण्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. न्यूजक्लिक या वृत्तसंस्थेशी संबंधित असलेल्या पत्रकारांच्या घरी दिल्ली पोलिसांनी छापेमारी केली आहे. मंगळवारी सकाळपासूनच पत्रकारांच्या घरी छापेमारी करण्यास सुरुवात करण्यात आलीये. ३० हून अधिक पत्रकारांच्या घरी छापेमारी झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या पत्रकारांवर यूएपीए कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. पत्रकारोंके सन्मान मे, राष्ट्रवादी मैदाँमे; पत्रकारांची गळचेपी सहन करणार नाही; लोकशाहीचा खून करू नका; वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य अबाधित राहिलेच पाहिजे, अशा संदेशांचे फलक कार्यकर्त्यानी हातात धरून हे आंदोलन केले. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा अर्थात UAPA कायद्यांतर्गत न्यूजक्लीक या न्यूज पोर्टलशी संबंधित 9 पत्रकारांवर दिल्ली पोलिसांनी छापेमारी केली. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्या घरीही पोलिसांनी छापेमारी केली असून यामध्ये मुंबई पोलिसांचाही समावेश आहे. यासंदर्बात १७ ऑगस्ट रोजी भादंवि UAPA (बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा) आणि १५३ अ (दोन गटातील द्वेषाला प्रोत्साहन देणं) तसेच १२० ब (गुन्हेगारी कट) या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरिष्ठ पत्रकार अभिसार शर्मा, उर्मिलेश, एनडीटीव्हीचे माजी एमडी अवनिंदो चक्रवर्ती आणि इतर सहा पत्रकारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विविध ३० ठिकाणी छापेमारी टाकून दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.. हे सर्वजण न्यूज क्लीक या न्यूज पोर्टलशी संबंध असलेले पत्रकार आहेत. या प्रकरणात यापूर्वी ईडीनं पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रिपब्लिक टिव्हीनं याबाबत माहिती दिली आहे. न्यूजक्लीक 2021 पासून कथीत बेकायदेशीर परदेशी फंडिंग मिळवल्याबद्दल पोलिसांच्या रडावर होतं. यावेळी पत्रकार अभिसार शर्मा या पोर्टलसाठी काम करत होते. सामाजिक कार्यकर्ते तीस्ता सेटलवाड आणि गौतम नवलखा यांच्यावरही चीनकडून न्यूजक्लीकद्वारे मिळालेला फंड घेतल्याचा आरोप आहे.
काल सकाळपासूनच विशिष्ट पत्रकारांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. यूएपीएसारखे खतरनाक गुन्हे त्यांच्यावर लावण्यात आले आहेत. त्यांचे लॅपटॉप, मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की आणखी पन्नास पत्रकारांना अटक करण्यात येणार असून त्यामध्ये काही महिला सुद्धा आहेत. न्यूजक्लिक या वृत्तसंस्थेवर त्यांचे आक्षेप आहेत; आधी वायर आणि बीबीसीवरही त्यांनी अशीच कारवाई केलेली आहे. त्यांच्या मनात जे आहे, ते छापले नाहीत तर तुम्ही त्यांचे विरोधक ! सत्ताधाऱ्यांना जे छापू नये असे वाटते. ते छापणे म्हणजे पत्रकारिता; बाकी सर्व जनसंपर्क! , असे जाॅर्ज आर्वेल यांनी म्हटले आहे. त्यामुळे समाजाला सत्य समजले पाहिजे, हीच पत्रकारिता आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना आवाहन करतो की, आज ते जात्यात आहेत. तुम्ही जात्याच्या बाहेर आहात. त्यांच्यावर झालेली कारवाई तुम्हाला दिलेला इशारा आहे. महाराष्ट्रातील पत्रकार जांभेकर, आगरकर, प्रबोधनकार यांच्या पावलांवर पाऊल टाकून उघडपणे सरकारविरोधात बोलत होते आणि आजही बोलत आहेत. पण, आता सरकारविरोधात बोलायचेच नाही, असे एक नवीन धोरण तयार होत आहे. ज्यांचा संविधानावर विश्वास आहे; ज्या संविधानाने व्यक्त होण्याचा अधिकार दिला आहे. हे स्वातंत्र्य जर कोणी हिसकावून घेत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस ते हिसकावून देणार नाही. ज्यांचे स्वातंत्र्य हिसकावून घेतले जात आहे. त्यांच्या बाजूने राष्ट्रवादी उभे राहिल, - आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाडहे पण वाचा..... # हे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर
0 टिप्पण्या