शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला. त्यासाठी शिवरायांनी वापरलेली वाघनखे भारतात आणत असल्याचा दावा अनेक दिवस राज्य सरकार आणि सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार करत आहेत. पण लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तूसंग्रहालयाची माहिती घेतल्यानंतर ही वाघनखे शिवाजी महाराजांनी वापरलेली नाहीत, असा उल्लेख असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्याला इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनीही दुजोरा दिला आहे. एवढेच नाही तर साताराचे प्रतापसिंह महाराज यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिणाऱ्या ग्रँड डफ यांना जी वाघनखे भेट दिली ती महाराष्ट्र सरकार तीन वर्षांसाठी परत आणणार आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने देखील ही वाघनखे तीन वर्षांसाठी आणणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कोणतेही वस्तू कायमस्वरुपी न देण्याचे लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तूसंग्रहालयाचे धोरण आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेली वाघनखे ते तीन वर्षांसाठी भारताकडे देणार आहेत. पण ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली नसल्याचा दावा केला जातोय. त्याबाबत सरकारने अजून कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. लंडनचे पंतप्रधान सुनक यांना भेटण्यासाठी वेळ मागितला असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली. अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला होता. त्यावेळी वाघनखाच्या सहायाने महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. तिच वाघनखे भारतात आणून येथील जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यावेळेस कुष्णाजी भास्कर कुळकर्णी यानेही महाराजांवर वार केला होता. मात्र महाराजांनी ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा ठेवतो म्हणत त्याचे मुंडके छाटले असल्याचा इतिहास आहे. या क्षणाचा ऐतिहासिक सोहळा ही वाघनखे भारतात आल्यावर रंगणार आहे. नोव्हेंबर महिन्यात वाघनखे आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील सोबत राहतील.
----------------------------------------------
भाजपचा खोटारडेपणा उघड...!
वाघनखे भारतात येणार नाहीच!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतांचा जोगवा मागण्याचे भाजपचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. लंडन मधून वाघनखे आणून शिवप्रेमींना भावनिक फसवून आम्ही महाराजांना किती मानतो हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपचा होता. पण, नियतीने व्हिक्टोरिया अँण्ड अल्बर्ट म्युझियमच्या आडून भाजपच्या खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडून वाघनखे देण्यास नकार दिल्याने राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हात हलवत लंडनमधून परत येणार आहेत. त्यामुळे पक्षाची आणि राज्याची मानहानी झाली असून याला जबाबदार कोण म्हणून शिंदे, पवार आणि फडणवीस यांच्यामध्येच वादावादी झाल्याचे ऐकिवात आहे. आता कोणत्या तोंडाने शिवप्रेमींसमोर जाणार हा प्रश्न सरकारसमोर उपस्थित झाला आहे.
खरेतर लंडनच्या म्युझियमने एक महिन्याच्या भाड्याच्या अटीवर ३ कोटी रुपये भाडा आकारुन महाराजांची वाघनखे देण्यास मंजुरी दिली होती. मात्र, भाजपने मोठेपणा दाखविण्यासाठी ३ महिन्यासाठी वाघनखे आणतो असे शिवप्रेमींना सांगितल्यामुळे लंडनचे म्युझियम प्रशासन संतापले आणि तुम्ही खोटे का सांगितले म्हणून वाघनखे देण्यास नकार दिला. शिवाय भारतात या वाघनखांच्या ऐतिहासिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून त्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे म्युझियमने म्हटले आहे. तसेच ही वाघनखे एका जागी न ठेवता तुम्ही ती अनेक ठिकाणी फिरवणार असल्याने तो कराराचा भंग आहे. त्यामुळे आधी या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन त्याच्या सुरक्षेची खात्री पटत नाही तोपर्यत वाघनखे देता येणार नाही असा पवित्रा म्युझियम प्रशासनाने घेतल्याने सुधीर मुनगंटीवार आता हात हलवत भारतात परत येणार आहे. मात्र, मोठा गाजावाजा करुन लंडनला रवाना होऊन खाली हात परत जाण्याने सरकारचे आणि भाजपचे नाव खराब होणार असल्याने आता पुढे काय करायचे असा प्रश्न सरकारला पडला आहे.
या वाघनखांच्या बळावर शिवप्रेमींना आकर्षित करुन त्यांची सहानुभूती मिळविण्याचा भाजपचा डाव फसला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. मात्र, वाघनखे आणण्याचा निर्णय सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतःच घेतला होता, त्यात माझी भूमिका काहीच नाही असे बोलून फडणवीस यांनी हात झटकले आहे. त्यामुळे आता सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार चक्रव्यूहात फसले असून वाघनखे न आणताच भारतात परत आल्यानंतर त्यांनाच उत्तरे द्यावे लागणार आहे. आता ते कोणती खोटी उत्तरे देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या अपयशामुळे महाराष्ट्र सरकार आणि भाजपा बॅकफुटवर आल्याचे पहायला मिळत आहे.
- महेंद्र कुंभारे,
- कामगार नेते, भिवंडी. मो.नं. 8888182324.
- रविवार दि. ८ आँक्टोबर २०२३.
------------------------------------------------
ही वाघनखे शिवछत्रपतींनी वापरलेली नसून सरकार धादांत खोटे बोलत आहे, . अफजल खानाच्या वधाच्या वेळेला जी वाघनखे नावाचं शस्त्र छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलं ते शस्त्र कुठलं आहे आणि कुठे आहे याविषयीची स्पष्टता इ.स. 1919 पर्यंत होती. हे शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होतं. त्याविषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत. मात्र आता जे व्हिक्टोरिया अण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखे सरकार भारतात परत आणत आहेत ती अफजल खानाचा वध केलेली वाघनखे नाहीत, हे स्पष्ट आहे. इ.स. 1818 मध्ये इंग्रजांनी दुसरा बाजीराव यांच्या पराभवानंतर सातारा छत्रपतींच्या गादीवर प्रतापसिंह महाराज यांना बसवलं होत. त्या महाराजांनी जेम्स कनिंगहॅम ग्रॅण्ट डफ नावाच्या इतिहासकाराला, ज्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला आणि जो साताऱ्याचा रेसिडेंट सुद्धा होता. प्रतापसिंह महाराजांची त्यांच्याशी चांगली मैत्री होती. त्यांना भेट म्हणून वाघनखे देण्यात आली होती. ती वाघनखे व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये ही ग्रॅण्ट डफ यांचा वंशज अंड्रियन ग्रॅण्ट डफ यांनी तेथे दिले असून, तशी स्पष्ट नोंद म्युझियमच्या कॅटलॉगमध्ये उपलब्ध आहेत. त्या वाघनखाच्या लेबलवर देखील उल्लेख असून, संग्रहालयाच्या कॅटलॉगमध्ये देखील ती वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल वाघ नखे असल्याची अशी कोणतीही नोंद नाही,
जर अफजल खानाच्या वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे ही जर इ.स.1919 पर्यंत साताऱ्यात असलेल्याच्या नोंदी आणि छायाचित्र आहेत. तर मग तर मग इ.स 1919 च्या अगोदरच म्हणजे विक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियम जमा झालेलं वाघनखे ही शिवछत्रपतींचे असू शकत नाही, सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेलली वाघनखे आम्ही परत आणतोय ही जी काय कथा रचली जात आहे. ती पुर्णपणे खोट असून हे इतिहासाच्या आणि इतिहास लेखन शास्त्राच्या कसोटीवर टिकत नाही. आमच्यासारख्या संशोधकांनी आम्ही त्याच्या विषयीचा रिसर्च करून शोध निबंध लिहिले आहेत. मात्र शासन नवीनच कुठला तर शोध लावतेय आणि शिवछत्रपतींची नसणारी गोष्ट शिवछत्रपतींची आहे असं सांगत आहे. ही जनतेची दिशाभूल करायची गोष्ट आहे. ती शासनाने थांबावी आणि जर त्यांच्याकडे या संदर्भातले पुरावे असतील तर शासनाने जनतेसमोर आणावेत”, एवढेच नाही तर ही वाघनखे तीन वर्षांसाठी आणली जाणार आहेत. त्यामुळे शिवरायांनी वापरलेली वाघनखे भारतात आणत आहोत, असा दावा सरकारने करू नये,
- इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत
----------------------------------------------
हा निवडणूक स्टंट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढला, हे सत्य आहे. हा दिग्विजय असल्याचे आम्ही मानतो. इतिहासाला कलाटणी देणारे ते अचाट असे साहस छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात अनेक हत्यारांचा वापर केला. भवानी तलवार, अफझलखानाला मारले ती वाघ नखे आणि लालमहालात शाहिस्तेखानाची बोटे छाटली त्या तलवारीचा आपण उल्लेख करतो. पण आमचे सरकार कधीपासून इतिहास संशोधक झाले आहे?
स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना वाघनखांबाबत संशय आहे आणि तुम्ही संग्रहालयातील वाघनखे घेऊन ती शिवाजी महाराजांची असल्याचे दाखवत आहात. ही फसवणूक आहे. त्याला कोणताही आधार नाही, पुरावा नाही. अर्थात ती शिवकालीन असू शकतात, आम्हाला त्याबद्दल आदर आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो. पण इतिहास त्यांनी वाचला पाहिजे. 2014 पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली भावनिक राजकारण सुरू आहे. तेव्हा मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असल्याचे होर्डिंग लावले होते. समुद्रातील शिवस्मारकही अद्याप अपूर्ण राहिले असून हे भावनिक राजकारण आता वाघनखांपर्यंत पोहोचले आहे. निवडणुका आल्या की भावनिक मुद्दे आणायचे, असे म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
देशात जातिनिहाय जनगणनेची मागणी होत आहे. हा मोठा मुद्दा असून भाजप यापासून पळ काढत आहे.”इंडिया’ आघाडीच्या बैठकीमध्ये आम्ही हा मुद्दा मांडला होता आणि आघाडीतील सर्व घटक पक्षांनी याला समर्थन दिले. याची सुरुवात बिहारपासून झाली असून राजस्थानमध्ये जातिनिहाय जनगणना सुरू आहे. महाराष्ट्रातही मागणी जोर धरत आहे. हळूहळू संपूर्ण देशात जातिनिहाय जनगणनेचा विषय मार्गी लागेल. ही गरज आहे आणि याच्या समर्थनार्थ सर्व पक्ष समोर येत आहेत. हा निवडणुकीचा मुद्दा नाही, - संजय राऊत
0 टिप्पण्या