राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने "बाप्पाची आरास स्पर्धा २०२३" चे आयोजन ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विरु वाघमारे व कार्याध्यक्ष संदेश पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी, दि. ११ ऑक्टोबर २०२३ रोजी, मिनी थिएटर, डाॅ.काशिनाथ घाणेकर समागृह, हिरानंदानी मेडोस, ठाणे (पश्चिम) येथे संपन्न झाला.
ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे अवघ्या चार दिवसात पहिल्यांदाच ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धेचे, "बाप्पाची आरास स्पर्धा २०२३" चे आयोजन करण्यात आले होते. यामुळे स्पर्धेत काही त्रुटी, कमी असू शकतात पण याही स्थितीत 'बाप्पा आरास स्पर्धे'त ठाणे शहरातुन ५० हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला.
'बाप्पा आरास स्पर्धा' पारितोषिक विजेते मंडळ : संपूर्ण ठाणे शहर- प्रथम विजेते - एकविरा मित्र मंडळ-महागिरी (रुपये ५१, ००० हजार रोख व आकर्षक चषक), ठाणे विधानसभा क्षेत्र - प्रथम- विजेते गोपाळ गणेश मित्र मंडळ-कॅसल मिल (रुपये २१, ००० /- व आकर्षक चषक) द्वितीय- सिद्धेश्वर तलाव साई सेवा मित्र मंडळ ( रुपये ११, ०००/-व आकर्षक चषक), कोपरी पांचपाखाडी विधानसभा क्षेत्र- प्रथम- प्रादेशिक मनोरुग्णालय सार्वजनिक मित्र मंडळ (रुपये २१, ००० /- व आकर्षक चषक), द्वितीय -नवयुग मित्र मंडळ- पारशीवाडी (रुपये ११, ००० /-व आकर्षक चषक ), कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्र प्रथम- युवा जल्लोश मित्र मंडळ- खारीगाव (रुपये २१, ००० /- व आकर्षक चषक), द्वितीय -सेंटर रेल्वे काॅलनी उत्सव मंडळ-कळवा (रुपये ११, ००० /-व आकर्षक चषक).
एकविरा मित्र मंडळ,महागिरी कोळीवाडा,ठाणे यांना "बाप्पाची आरास" स्पर्धेमध्ये 'ठाणे',"कोपरी-पाचपखाडी","कळवा-मुंब्रा", "ओवळा - माजिवडा" विधान सभा क्षेत्रामधून ठाण्याचा बाप्पा म्हणून "सन्मानचिन्ह व रोख रक्कम रु.५१०००/- पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले..
0 टिप्पण्या