निवडणूक प्रचारादरम्यान पोलिसांनी तेलंगणामधील रंगारेड्डी येथील गचीबोवली येथे एका कारमधून ५ कोटी रुपयांची रोकड गुरुवारी जप्त केली. तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यापूर्वी ही कारवाई केली आहे. ५ कोटींच्या रोख रकमेबाबत कारमधील चालकाला विचारले असता, त्यांने याबाबत काहीच सांगितले नाही. तसेच, कारममध्ये असलेल्या इतर व्यक्तींनी सुद्धा या रोख रखमेचा कोणता हिशोब दिला नाही. त्यामुळे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन तपासणीदरम्यान एका कारमध्ये दोन सुटकेस आढळून आल्या. त्या उघडून पाहिल्यावर पोलिसांना धक्काच बसला. जप्त करण्यात आलेली रोकड आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली. अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
तेलंगणा राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या वाहन चेकपोस्टवर ही घटना घडली. चिरेक इंटरनॅशनल स्कूलजवळील बोटॅनिकल गार्डन येथे पोलिसांनी मारुती ब्रेझा कार अडवली होती. त्यावेळी तपासणी केली असता 5 कोटी रुपये रोख सापडले. पोलिसांनी याप्रकरणी तीनजणांना अटक केली. दुग्याला संतोष राव, मुत्याला नरेश आणि चीती संपत राव अशी अटक केलेल्यांची नावे असून हे तिघेही व्यावसायिक आहेत. तिघेही योग्य कागदपत्रांशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कमेची वाहतूक करत होते. गचिबोवली परिसरात कारमधून ५ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली.तसेच हैदराबादमधील हयातनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात गुरुवारी नाकाबंदीच्या तपासणी दरम्यान पोलिसांनी एका कारमधून २ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात केली.
मध्यप्रदेश, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थान या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्यापासून जवळपास १७६० कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. असे निवडणूक आयोगाने सांगितले होते. दरम्यान, २०१८ मध्ये या पाच राज्यांमधून मिळालेल्या रोख रकमेपेक्षा हे प्रमाण ७ पट अधिक आहे. २०१८ मध्ये या राज्यांमधून २३९.१५ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. यापूर्वी निवडणूक आयोगाने गुजरात, हिमाचल, नागालँड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटकमध्ये १४०० कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली होती. गेल्या निवडणुकीत जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेच्या ११ पट हे प्रमाण आहे. निवडणूक आयोग राज्य आणि केंद्रीय एजन्सींच्या सहकार्याने अशा प्रकारच्या कारवाया केल्या जातात. मात्र या रकमेचे आणि संबंधित व्यक्तींचे नंतर काय होते याबाबत मात्र कोणतीही माहिती मिळत नसल्याचे येथील सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
0 टिप्पण्या