डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे 'दी प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हे पुस्तक प्रकाशित झाले 1923 साली लंडनमध्ये. शंभर वर्षांपूर्वी लिहलेल्या बाबासाहेबांच्या ‘प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या ग्रंथातील अक्षरे जरी जुनी असली तरी पुस्तकातील सिद्धांत अतिशय ताजा आहे. त्यांच्या आयुष्यातली पहिली डॉक्टरेट ते 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' मधून मिळवत होते. त्यावेळचा हा त्यांचा हा प्रबंध होता. पण या प्रबंधाने भारतीय अर्थविश्वात आणि त्याची सगळी सूत्रे हाती असलेल्या ब्रिटिश अर्थविश्वात एक निर्णायक भूमिका बजावली. त्यातून उभ्या राहिलेल्या चर्चेने आणि घेतल्या गेलेल्या निर्णयाने आज भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणारी संस्था उभी राहिली…. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. अत्यंत महत्वाच्या अशा या प्रॉब्लेम ऑफ रुपी’ ग्रंथाला तब्बल शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्त नॅशनलिस्ट नेटिव्ह फेडरेशन / बुद्धिस्ट रिसर्च सेंटर ठाणे यांच्या विद्यमाने या ऐतिहासिक ग्रंथाचा शताब्दी समारोह शनिवार २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता ठाण्यातील पाचपाखाडी येथील महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांतर्गत पहिले सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दि प्रॉब्लेम ऑफ दी रुपी या ग्रंथाचे - आजच्या परिस्थितीत महत्व या विषयावर मा. डॉ. गौरव सोमवंशी. IIM Lucknow (भारतीय अर्थव्यवस्थेचे विश्लेषक) मा. राजेश कांबळे. IIT Bom. (Cornall Business School) प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपले विचार मांडणार आहेत तर यावेळी प्रमुख अथिती म्हणून मा. संजय खंडागळे. (Global Conveyor Ambedkarite Int. Mission) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सुनिल भालेराव M. B.A, Phd ( Safety management) हे असणार आहेत कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ६ ते ८ परिसंवाद (चर्चा सत्र) होणार असून यामध्ये 'दि प्रॉब्लेम ऑफ दी रूपी' या ग्रंथाच्या विविध पैलूंचे अभ्यासपूर्ण विश्लेषण उपस्थित मान्यवर आणि श्रोतेगणांच्या प्रश्नांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेंच्या वतीने प्रदिप सावंत, सुशांत गायकवाड, प्रा. विजय मोहिते सर, संतोष खांबे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या