प्रत्येक अनधिकृत बांधकामावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे. अनधिकृत बांधकामांना पाणी, वीज यांची नवीन जोडणी मिळणार नाही याची खबरदारी घेतली जावी. अशा बांधकामांना नवीन पाणी जोडणी मिळाली तर कार्यकारी अभियंता यांना निलंबित केले जाईल, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी काही महिन्यापूर्वीच दिले आहेत. तसेच प्रत्येक अनधिकृत बांधकामावर तातडीने फलक लावण्यात यावा. हे बांधकाम अनधिकृत असून इथे कोणी घर घेवू नये, असा पक्क्या स्वरुपाचा फलक लावावा. तात्पुरत्या स्वरुपाचा फ्लेक्स लावू नये. फलकाचा खर्च अनधिकृत बांधकामाच्या मालमत्ता करास जोडून वसूल करावा. असे स्पष्ट निर्देश उप आयुक्तांना दिले असतानाही ठाणे.नौपाडा प्रभाग समिती हद्दीत सहा आयुक्त सोपान भाईक यांच्या अधिपत्याखाली नौपाडा ब्रीज चा बाजूला तसेच महात्मा फुले मार्केट मध्ये अनधिकृत वाणिज्य गाळे चे बांधकाम जोरात सुरु आहे. विशेष म्हणजे याबाबत तक्रार अर्ज देऊनही याकडे सहा.आयुक्त कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे.
तसेच, अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी हे बांधकाम अनधिकृत आहे असा फलक लावणे. हा फलक कोणी काढल्यास त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा. या बांधकांमाबाबत कोणताही फलक लावण्यात आलेला नाही असे असताना यावर कारवाई का होत नाही.
ठाणे.नौपाडा प्रभाग समिती हद्दीत नौपाडा ब्रीजच्या बाजूला हे अनाधिकृत बांधकाम चालू आहे. नौपाडा अधिकारी मात्र यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत.
नौपाडा महात्मा फुले मार्केटमध्ये अनधिकृत वाणिज्य गाळेचे बांधकाम सुरू असून वारंवार तक्रार दाखल करूनही कारवाई होत नाही. सहा आयुक्त सोपान भाईक कारवाई का करत नाहीत.
0 टिप्पण्या