Top Post Ad

फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०२४' मुंबई ऐवजी गुजरातला

 


 महाराष्ट्रातील बहुतांश उद्योगनगरी हळू हळू गुजरातला गेली.  गेल्यानंतर आता चित्रपटसृष्टीही गुजरातला जाण्याची चिन्हे दिसत आहे. सिनेसृष्टीत मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे  'फिल्मफेअर'.  १९५४ साली फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची सुरुवात झाली. या सोहळ्याची मराठी तसेच हिंदी कलाकारांमध्ये कमालीची उत्सुकता असते. मात्र यंदा हा पुरस्कार सोहळा मुंबई ऐवजी गुजरातमध्ये पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

चित्रपटसृष्टीमधील अतिशय जुना आणि ग्लॅमरस पुरस्कार सोहळा म्हणून फिल्म फेअर ओळखला जातो. यंदा ६९वा हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सोहळ्यात कोणत्या कलाकारांना गौरवण्यात येणार? कोणत्या चित्रपटांना हा पुरस्कार मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी पुरस्कार सोहळ्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. त्यामुळे कलाकारांमध्ये उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे 'फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०२४' पार पडणार आहे. २८ जानेवारी २०२४ रोजी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचान कोण करणार हे अद्याप समोर आलेले नाही. अनेक कालाकार या पुरस्कार सोहळ्यात नृत्य सादर करुन मजामस्ती करताना दिसतात.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com