Top Post Ad

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत टाळाटाळ... मात्र जेवणावळीवर ६० लाख रुपयांची उधळण


   पुणे येथील स्थित पेरणे गावातील, भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ आहे. त्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी ३१ डिसेंबर व १ जानेवारी यादिवशी लाखो अनुयायी येत असतात. मिळालेल्या प्राप्त माहिती नुसार barti या संस्थेच्या वतीने अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थांना शैक्षणिक मदत व्हावी या हेतूने संस्थेला शासनाकडून विशेष निधी उपलब्ध होतो... त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी याच संस्थेमधील शेकडो विद्यार्थ्यांना मुंबई येथे आजाद मैदानात barti संस्था व महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध आंदोलने करावी लागली...कारण त्यांना बार्टी संस्थेकडून शिष्यवृत्ती योजना देण्यास नाकारत होती. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता असताना सुद्धा आपल्या कडून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यात आले होते. 

१ जानेवारी २०२४ यादिवशी आपल्या संस्थे कडून ५०,००० हजार लोकांसाठी ६० लाख रुपयांचे जेवणाचे वाटप करण्यात येणार आहे. संस्थेने एवढे लाखो रुपयांची उधळण का करावी? तसेच विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती कमी पडते याचा विचार संस्था का करत नाही? ज्या कारणांसाठी निधी आहे तो त्याच कारणांसाठी वापरला गेला पाहिजे. इतर ठिकाणी वापरणे हे विद्यार्थ्यांवर आर्थिक सामाजिक शैक्षणिक अन्याय केल्या सारखे होईल. तरी सदरील निवेदनाद्वारे  सूचित करण्यात येत आहे की, तातडीने सदरील जाहिरात, व संस्थेकडून होणाऱ्या ६० लाख रुपयांची उधळण थांबवावी असे जाहीर आवाहन ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते ॲड प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य,  सचिव समाजकल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांना पत्राद्वारे केले आहे. 


चार वर्ष मागे लागून स्कॉलरशिप मिळत नाही आणि न मागता जेवण देत आहे.
भीमा कोरेगावचा कार्यक्रम सांस्कृतिक विभागाचा आहे
शिक्षणाचा पैसा शिक्षणा साठीच खर्च व्हावा
कोरेगाव भीमाला येणारे लाखो भीम सैनिक संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना,विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात तुमच्या सरकारी भाकरी मोडण्यासाठी नाही !
त्यांची चिंता करू नका.
भीमा कोरेगाव युद्धभूमी आहे तिला कुरणभूमी बनवू नका - अरुण कांबळे


भाकरी की मेंदू ?
या दोहोपैकी एका गोष्टीची निवड करायला मला कुणी सांगितले, तर माझे प्राधान्य कायम मेंदुलाच राहील!
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
६० लाख रुपयांत बार्टी #barti किती विद्यार्थ्यांना रखडलेली फेलोशिप देऊ शकेल?
केवढा हा विरोधाभास...
एकीकडे उपोषण, दुसरीकडे जेवणावळ!
दिवाकर शेजवळ.. ज्येष्ठ पत्रकार


 भीम आर्मी सह विविध पक्ष संघटनांच्या दणक्यानंतर बार्टीकडून भीमा कोरेगाव येथील भोजन ठेका रद्द.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com