दरवर्षी आपण १ जानेवारी ला शौर्य दिन पूर्वाश्रमीच्या महारांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी भारताच्या काना कोपऱ्यातून आंबेडकरी जनता लाखोंच्या संख्येने पुणे भीम कोरेगाव येथे विजयस्तंभाजवळ उपस्थित राहते. २०१८ पासून तर देश विदेशातील मीडिया ने पण या कार्यक्रमाची दखल घ्यायला सुरुवात केली आहे हे विशेष कारण २०१८ पूर्वी याकडे भारतातील प्रस्थापित मीडियाने या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केले होते.
२०१८ नंतर या भीमा कोरेगाव ची लढाई व महारांच्या शौर्यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर माहितीचे आदान प्रदान झाले आहे व नवसंशोधक अजून ह्यावर संशोधन करत आहे यातून आणखी नवी माहिती महारांच्या लष्करी सेवे संदर्भात उजेडात येईल व हा दैदीप्यमान इतिहास उजेडात आल्याशिवाय राहणार नाही हयाची मला खात्री आहे. आता आपण या लढाई कडे चळवळीचे प्रेरणास्थान म्हणून पाहिले पाहिजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या वेळेस आपल्या भाषणात या विजयस्तंभाचा व भीमा कोरेगाव लढाईचा उल्लेख करून तुम्ही मेष राशीचे नसून सिंह राशीचे आहात हे सांगितले व आपली चळवळ धारधार बनविली या महार समाजाच्या सोबतीने व सामाजिक समतेच्या चळवळीचा बिगुल वाजविला व यशस्वी करून दाखविला व त्याची फळे आज आपण खात आहोत
आज आपण या भीमा कोरेगाव लढाई ला आपले प्रेरणस्थान आपल्या आजच्या प्रश्नासंदर्भात देखील मानले पाहिजे व आपल्या चळवळीची बांधणी केली पाहिजे.महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याच्या करिता बार्टी ही संस्था स्थापन केली गेली आहे या संस्थेचे उद्देश हा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना संशोधनात आर्थिक मदत फेलोशिपच्या माध्यमातून करणे परंतु या संस्थेच्या वतीने मागच्या अनेक वर्षापासून विद्याथ्र्याच्या हक्काचा पैसा हा विविध कार्यक्रमांवर खर्च करण्याचा सपाटा लावला आहे व ह्या मधे भ्रष्टाचार होत असल्याचा संशय देखील व्यक्त होत आहे काही दिवसांपूर्वी बार्टी ने 1 जाने ला उपस्थित राहणाऱ्या आंबेडकरी जनतेच्यासाठी भोजनाची सोय व्हावी म्हणून ६० लाख रुपयांचे टेंडर ५० हजार लोकांसाठी काढण्यात आले याची खरच गरज होती का? हा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला व चळवळीतील अनेक सहकान्यांनी हा प्रश्न सरकार ला विचारला. एकीकडे सरकार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता फेलोशिप साठी पैसा नाही म्हणत आहे व दुसरीकडे हा राखीव निधी असा खर्च करत आहे
विधानसभेत आमदार सतेज पाटील यांनी विद्याथ्यांना फेलोशिप मिळत नाही हा प्रश्न विचारला तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी करुण काय दिवे लावणार असा उलट प्रश्न केला हयातून या प्रस्थापित वर्गाला विद्यार्थ्यांच्या ह्या सर्व प्रश्नांचं काही देणे घेणे नाही हे स्पष्ट झाले. आपल्या आंबेडकरी जनतेने सरकार कडे मागणी केली की आमच्या जनतेला सरकारच भीमा कोरेगाव येथे जेवण नको विद्यार्थ्यांची थकवलेली फेलोशिप दद्या व विद्यार्थ्यांसाठी नव्या योजना अमलात आणा असे निवेदन व आग्रहाची मागणी पुणे जिल्हाधिकारी व बार्टी कडे केली ही गोष्ट खूप महत्वाची आहे. काही वर्षापूर्वी मी स्वतः देखील अश्या प्रकारची मागणी राज्य सरकारकडे केली होली की मागास समाजाचा जो विकास निधी आहे तो मागासवर्गीयांवरच खर्च करावा इतर ठिकाणी तो वर्ग करण्यात येवू नये परंतु या कडे फारसे कुणी गांभीर्याने पाहत न्हवते
२६ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देश संविधान दिवस म्हणून पाळते परंतु राज्य सरकार हा दिवस साजरा करत असताना सामाजिक न्याय विभागाचा विकास निधी या कार्यक्रमाकरिता वापरते तसेच बार्टी देखील संविधान दिनाचे कार्यक्रम आयोजित करून लाखो रुपयांचा चुराडा करते, यासंदर्भात मी अशी मागणी केली होती की संविधान दिवस हा दिवस साजरा करत असताना याचा खर्च १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवस साजरा करताना जो निधी वापरला जातो त्या निधीतून साजरा करण्यात यावा तसेच संविधान दिनाचे परिपत्रक हे सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात यावे व सर्वाना हा दिवस साजरा करण्यासाठी निर्देश द्यावेत मात्र अजून ही सरकार सामाजिक न्याय विभागाचेच पत्र काढत आहे व आमजिक न्याय विभागाचाच निधी संविधान दिनाच्या कार्यक्रमाला वापरला जातो हे योग्य नाही
संविधान दिवस हा राष्ट्राचा विषय आहे फक्त सामाजिक न्याय विभागाचा नाही संविधान सर्वांसाठी आहे फक्त मागासवर्गीय समाजासाठी नाही याची जाणीव सरकारने लक्षात घेणे गरजेचे आहे त्यामुळे आंबेडकरी समाजाने आता सामाजिक न्याय विभाग तसेच बार्टी संस्थेच्या कारभारावर लक्ष ठेवले पाहिजे व अनुसूचित जाती जमातीचा विकास निधी हा या समाजासाठीच खर्च होतो की अन्यत्र तो वळवला जातो ह्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे किंवा तशी चळवळ उभी करावी लागेल. कर्नाटक व मध्य प्रदेश सरकारने जसा हा निधी फक्त मागासवर्गीयांच्या विकासाकरिताच वापरावा विद्याथ्यर्थ्यांसाठी वापरावा असा जो कायदा केला आहे त्या धर्तीवर महाराष्ट्रात तसा कायदा करावा अशी आग्रही मागणी करावी लागेल कारण हा सर्व पैसा मागासवर्गीयांच्या नावे आहे मात्र ठेकेदार पद्धतीत हा करोडो रुपयांचा निधी हे ठेकेदार पळवत आहेत हे आता थांबवलं पाहिजे या साठी भीमा कारेगाव च्या लढाईत जसे महार सैनिक आपल्या न्याय मागण्यासाठी पेशवाईच्या विरोधात लढले व इतिहास घडविला तसा ह्या साठी आपण लढू व आपल्या समस्त समाजाचे भविष्य घडविन्यासाठी योगदान देवू
डॉ. विजय मोरे
.
0 टिप्पण्या