मुंबई प्रभादेवी येथे असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भक्त मंडळी येत असतात. मात्र मंदिरात पैसे आकारत देवाचं VVIP दर्शन देणाऱ्यांचं रॅकेट असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे चार चार तास रांगेत उभे असणारे सर्वसामान्य भक्त संतापले आहेत. मंदिरात मुखदर्शन, गाभाऱ्यातील दर्शन रांग तिथं गेलं असता नजरेस पडते. याच मंदिरात व्हीव्हीआयपी दर्शन रांग, गणपतीच्या पूजेच्या नावानं एक बनावट वेबसाईट तयार करण्यात आली असून, त्या माध्यमातून बड्या श्रीमंताकडून ज्यांना झटपट देवाचं दर्शन हवं आहे. त्यांच्याकडून प्रचंड लूट करण्यात येत आहे. लवकरात लवकर देवदर्शनाकरिता देखील असा प्रकार करण्यात येत होता. या प्रकारात मंदीरातील काही कर्मचारी आणि पुजारीवर्ग तसेच यांचा सहभाग असलेल्याची माहिती मिळत आहे. वेबसाईटच्या माध्यमातून दर्शनाच्या नावाखाली दलालांकडून हजार ते तीन हजार रुपये घेत व्हीव्हीआयपी रांगेतून दर्शन करुन दिलं जात होतं. ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा ही बाब समोर आली आणि त्यानंतर मंदिर समितीकडून अंतर्गत चौकशी सुरु करण्यात आली. सदर प्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून आता या रॅकेटमध्ये किती जणांचा सहभाग आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी 'रामलला'ची स्थापना होणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्या राममंदिर ट्रस्टने VVIPना निमंत्रणे पाठवली आहेत. ज्यामध्ये भारताचे दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली, सचिन तेंडुलकर, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह सुमारे सात हजार VVIPचा समावेश आहे. यात मनोरंजन विश्वातील केवळ ५ कलाकारांची नावे आहेत. 'रामायणा'तील राम-सीता म्हणजेच अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया, अक्षय कुमार आणि दिग्गज गायिका आशा भोसले यांना राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. अयोध्येतील या भव्यदिव्य राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी ११ वाजताच मुहूर्त निश्चित करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या उद्घाटनाचा हा कार्यक्रम जवळपास ३ तास सुरू राहणार आहे.
0 टिप्पण्या