धारावीकरांच्या न्याय्य हक्काचे हे आंदोलन लढण्यासाठी एक लाख धारावीकर हवेत. धारावीची एक इंच जमीन देणार नाही, असे मेसेज सोशल मीडियावर टाका. मतभेद विसरून एकत्र आले तर कुणीही तुमच्यासमोर टिकणार नाहीत. स्वातंत्र्यसैनिकांनी लढली, तशी लढाई धारावीकरांना लढावी लागेल. मुळावर घाव घालावा लागेल. यासाठी संपूर्ण ताकदीनिशी भीम आर्मी धारावीकरांना मदत करेल, असे आश्वासन भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी धारावीकरांना दिले. भिमआर्मी व धारावी बचाव आंदोलन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. २ जानेवारी रोजी धारावी मेन रोड, धारावी येथे महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेत आझाद यांनी आपले विचार मांडले.
धारावीचा पुनर्विकासाच्या निविदा प्रक्रियेत राज्य सरकारने अदानी रिअल्टी वगळता इतर कंपन्यांना सहभागीच होता येणार नाही, अशी प्रक्रिया राबवली. ही फिक्सिंग मॅचच होती. विशेष हेतू कंपनीच्या भाग भांडवलात अदानी रिअल्टीला ८० टक्के व शासनाचा २० टक्के हिस्सा ही तरतूद म्हणजे 'अदानी'ला एकतर्फी निर्णय घेण्याचा परवानाच बहाल करण्यात आल्याचा आरोपही आझाद यांनी केला.
यावेळी भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड, द.म. मुंबईचे जिल्हाध्यक्ष जाहिद अली शेख, आरीफ खान, धारावी बचाव आंदोलन समन्वयक संजय भालेराव, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, नसरुल हक्क, वंचित आघाडीचे इकबाल मनियार, संजीवन जैसवार, एमएमआयचे सयद अनवर, शिवसेनेचे हालीम भाई, शेतकरी कामगार पक्षाच्या साम्या कोरडे, तसेच धारावी बचाव समितीचे समन्वयक अनिल शिवराम कासारे आणि धारावीत कार्यरत असणारे बहुतांश राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध नियोजन सहकारी गृहनिर्माण संस्था चाळ कमिट्या, रहिवाशी संघटना, औद्यागिक संस्था / संघटना, क्रिडा / शैक्षणिक / सांस्कृतीक संघनाना-मंडळे, धारावी बिझनेस मेन असोशिएन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी असोशिएशन इत्यादी सर्व समाजघटकांची यावेळी उपस्थित होती.
- १) विविध विकास प्रकल्पांच्या माध्यमातून धारावीतील झोपडीधारकांना धारावीच्या बाहेर हुसकावून लावण्याचे धोरण बंद करा. यापुर्वी विवीध विकास प्रकल्पांकरिता धारावीबाहेर विस्थापित करण्यात आलेल्या झोपडीधारकांच्या यादी जाहीर करून यांचे धारावीतच पुनर्वसन करण्यात येईल, याची ग्वाही द्या...
- २) धारावीतील सर्व झोपडीधारकांची नव्याने सर्वेक्षण करून सर्वेक्षणाची शेवची तारीख हात पात्रता दिनांक ठरवून सर्व निवासी व अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवा, यासर्व पात्र निवासी व अ निवासी झोपडीधाराकांची यादी जाहीर करा व तदनंतरच पुनविर्कासाचे काम सुरू करा.
- ३) सर्व निवासी झोपडीधारकांना ५०० स्वेअर फुटाचे घर मोफत घर द्या.
- ४) मनपा मालमत्ता विभागाच्या चाळी व इमारतीती रहीवाशांना ७५० स्वेअर फुटाचे घर मोफत घर द्या.
- ५) अनिवासी/औद्योगिक व्यापारी वापराच्या गाळे धारकांना/गोदाम मालकांना वापरत असलेल्या आकाराचे अनिवासी पुनर्वसन गाळे मोफत द्या.
- ६) प्रकल्पाचे नियोजन समजणेकामी सुटसुटीत मास्टर प्लान जाहीर करा.
- ७) धारावीतील झोपडीधारकांच्या भविष्यातील देखभाल खर्चाकरिता प्रती पुनर्वसन गाळा रुप. २५ लाखांची तरतूद करा.
- ८) धारावीत नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व व्यावसायिक / औद्योगिक / शैक्षणिक / संस्था - आस्थापनात उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यामध्ये धारावीतील बेरोजगार तरूणांना ८० टक्के आरक्षणाची तरतूद करा.
- ९) सेन्ट्रल रेल्वे, हार्बर रेल्वे, व मध्य रेल्वे लगत असलेल्या झोपडपट्यांना रेल्वेने डिआरपीकडे किंवा जिल्हाधीकारी ह्यांना त्यांचा सर्व्हे करण्यासाठी ना हरकत द्यावी जेणे करून त्या झोपडीधारकांनासुद्धा प्रकल्पात समाविष्ठ करण्यात येईल.
0 टिप्पण्या