धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्ताने,शनिवार दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी बुद्धविहार आंबेडकर रोड येथे, मुक्त पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, ठाणे जिल्हा शाखा आयोजित, आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन कल्याण, सिद्धिविनायक हॉस्पिटल कल्याण, आणि तनुबाई कांबळे चारिटेबल ट्रस्ट कल्याण, यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉक्टर जितेंद्र पाटील यांच्या सहकार्याने मोफत महा आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया शिबिराचं कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमास आपल्या ठाण्यातील एन के टी कॉलेज चारीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष, व्यापारी संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय दानशूर शेठ नानजी भाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला.जिल्हाध्यक्ष तथा संघटक लोकाधिकार समिती चे सन्माननीय धनाजी सुरसे, शिवसेनेचे ठाणे शहर समन्वयक व माजी नगरसेवक ठा. म. पा. सन्माननीय संजय (दादा)वामन तरे, ऊर्जा फाउंडेशनचे संचालक सन्माननीय मुरलीधर चांदवडेकर तसेच मुक्त पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष महेश खडे तसेच मुक्त पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य सचिव रमेश देवरुखकर, ठाणे जिल्हा सचिव आयोजक सन्माननीय सचिन अधिकारी आणि इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी रहिवाशांनी चांगला प्रतिसाद दिला सर्व नागरिकांनी याचा उत्कृष्टरित्या लाभ घेतला तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मोफत महाआरोग्य तपासणी औषधोपचार व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाला.
0 टिप्पण्या