ठाणे मुलुंड दरम्यान नवीन होणाऱ्या रेल्वे स्थानकाचे काम मार्गी लागल्यास स्थानकातील प्रवाश्यांचा अतिरिक्त पडणारा भार कमी होऊ शकेल. यासाठी ठाणे मुलुंड दरम्यान होणाऱ्या नवीन रेल्वे स्थानकातील सुरू झालेल्या नवीन स्टेशन परिचलन क्षेत्रातील विकास कामांची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. त्यामध्ये स्टेशनकडे जाणारे ३ मार्ग विकसित करण्याचे काम सुरु आहे. पहिला मार्ग ज्ञानसाधना कॉलेजकडून स्टेशनकडे जाणारा, दुसरा मार्ग धर्मवीर नगराकडून स्टेशनकडे जाणारा, तिसरा मार्ग मुलुंड चेकनाका मॉडेला मिल कडून स्टेशनकडे जाणारा. या तीन मार्गिकांचे काम सुरु असून स्टेशन डेक, पार्किंग, व कंपाऊंड वॉल चे काम देखील तितक्याच गतीने सुरु आहे. ३०% काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
रेल्वे स्टेशनकरीत लागणारी स्टेशन बिल्डिंग व फलाटे रेल्वे रूळ इत्यादी ४ एकर जागेवरील कामे रेल्वे प्रशासन करणार आहे. यासाठी १८४ कोटी खर्च होणार आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून सदर जागा अद्याप रेल्वे विभागाला हस्तांतरित न झाल्याने ही कामे सुरु होण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या ठिकाणी काही सहकारी गृहनिर्माण संस्था एस आर ए प्रकल्पास परवानगी मिळण्याकरिता हायकोर्टात गेले असता मा. उच्च न्यायालयाने निकाल देत असताना अतिक्रमण झालेल्या झोपड्यांचे पुनर्वसन एस आर ए योजनेमार्फत ठाणे महापालिकेने तात्काळ करून घेण्याचे आदेश दिले आहेत. परंतु या संदर्भात दिरंगाई होत असल्याने या कामाला गती प्राप्त होत नाही. खासदार राजन विचारे यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी चर्चा करून त्यांचे पुनर्वसन लवकर मार्गी लावा अशी विनंती केली आहे
0 टिप्पण्या