Top Post Ad

ECAMच्या शताब्दीवर्षानिमित्त २७ ते २९ फेब्रुवारी भव्य कार्यक्रमाचे आयोजन


 इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ही संस्था यंदा शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. हा भारतीय विद्युत क्षेत्रासाठी ऐतिहासिक सोहळा असणार आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला हा ऐतिहासिक सोहळा अनुभवायची संधी मिळणार आहे. दिमाखदार अशा उदघाटन सोहळ्याने या शताब्दीपूर्ती कार्यक्रमाची सुरुवात मुंबईत करण्याचा मानस असून २७ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत हा भव्य कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती सतीश सिन्नरकर यांनी दिली.  सदर कार्यक्रमाची माहिती देण्याकरिता आज मुंबई पत्रकार संघात इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संस्थेच्या वतीने पत्रकारांशी संवाद सांधण्यात आला. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष वामन भुरे यांच्यासह उमेश रेखे, देवांग ठाकूर, रावसाहेब रकीबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.   

आयईसिटी हे संस्थेचे मासिक मुखपत्र असून कॅम्पेन मास्टर्स या कंपनीतर्फे ते प्रकाशित होते. या मासिकात विद्युत क्षेत्रातील सर्व विभागाबद्दल बातम्या, लेख व मुलाखती प्रसिद्ध होतात. तसेच संस्थेच्या वतीने नियमितपणे प्रदर्शने भरविण्यात येतात, हे वर्ष शताब्दीवर्ष असल्याने त्यानिमिन 'इकेमेक्स' हे प्रदर्शन २७ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी २०२४ मध्ये मुंबईत भरविण्यात येणार आहे. हा शताब्दी कार्यक्रम पूर्ण वर्षभर साजरा करण्याचा आमचा मानस आहे त्यानिमित्ताने आम्ही वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले आहे. जसे की विविध बैठका, सेमिनार्सचे आयोजन तसेच कारखान्यास भेटी देणे, अद्ययावत तंत्रज्ञान समजून घेण्याकरता विविध कार्यशाळा आयोजित करणे असेही सिन्नरकर म्हणाले. 

संस्थेविषयी माहिती देतांना ते म्हणाले,  महाराष्ट्र विद्युत कंत्राटदार संघटनेची स्थापना १० जानेवारी १९२५ रोजी मुंबईतील आघाडीच्या विद्युत कंत्राटदारांमार्फत करण्यात आली. या क्षेत्रातील सर्व भागीदार व गुंतवणूकदार यानी एक संस्था स्थापन करण्याचे ठरविले. कुशल कारागिरांना शोधून त्यांच्यातील कौशल्याला योग्य तो वाव मिळवून देणे व उच्च व्यावसायिक मूल्ये प्रस्थापित करून कारागिरांना चागल्या प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या संस्थेचे उदिष्ट आहे. सुरुवातीला केलेल्या सांघिक कामामुळे आणि घेतलेल्या कष्टांमुळेच आज ही संस्था नावारूपाला आली आहे.

संस्थेला अखिल भारतीय स्तरावरची अपेक्स बॉडी बनविण्याचे ध्येय्य असून देशातील सर्व इलेक्ट्रीकल कॉन्ट्रैक्टर्सच्या संस्था एकत्र करण्याचा प्रयत्न देखील करण्यात येणार आहे.  अधिकृत कॉन्ट्रेक्टरकडूनच कामे करून घ्या, त्यातच सुरक्षितता आहे याबाबत जनजागृती करणे. ठेकेदार सदस्यांची क्षमता वाढवणे. वीज बचत करण्यासाठी प्रयत्न करणे. वीज सुरक्षिततेचे महत्व लक्षात ठेसून मानवसेवा करणे. गेल्या काही वर्षात विद्युत सुरक्षा (इलेक्ट्रिक सेफ्टी) आणि ऊर्जेची बचत या दोन विषयांबाचत जनजागृती करण्यासाठी आम्ही राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय स्तरावर काही कार्यक्रम करण्याचे ठरवले असल्याची माहितीही सिन्नरकर यांनी दिली. 

इकॅममध्ये विद्युत ठेकेदार, विद्युत व्यापारी, विद्युत उत्पादक, इंजिनियर्स, सल्लागार आणि इतर सेवा देणारे यांचा समावेश असून त्याचे कार्यालय मुंबईत असून पुणे, नाशिक, नगर, समावेश आहे. इकॅमचे मुख्य जळगाव, धुळे-नंदुरबार, ठाणे, कोकण व पश्चिम महाराष्ट्र अशी इकॅमची क्षेत्रीय कार्यालये आहेत. इकॅमचे आज ३००० हुन अधिक सक्रिय सदस्य असून त्यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात विद्युत उपकरणांची स्थापना, देखभाल, दुरुस्ती आणि इतर सर्व सेवा दिल्या जातात, आज इस ही महाराष्ट्रातील समस्त विद्युत ठेकेदारांची प्रमुख संघटना बनली आहे. इकॅमतर्फे सेमिनार, परिषदा, चर्चासत्रे, कार्यशाळा घेतल्या जातात, महावितरण, टाटा, अदानी या विद्युत निर्मिती कंपन्या, संशोधन संस्था, मानक संस्था यांना इकॅम आपले सहकार्य करीत आहे. आम्ही करत असलेल्या शताब्दीपूर्तीच्या सोहळ्याच्या तयारीत आपण आपले मोलाचे सहकार्य आणि आम्हाला पाठिंबा द्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने यावेळी करण्यात आले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com