"सुजलाम् सुफलाम् मलयज शितलाम्; शस्य शामलाम् मातरम्, वन्दे मातरम् !" असे सकाळचे मंगल सूर आज हरवले आहे असे वाटते. एकेकाळी रेडिओ हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग मानला जात होता. कारण माहिती, संवाद आणि गाण्यांच्या माध्यमातून मनोरंजनाचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून रेडिओचा उपयोग केला जात होता. मात्र, आज सर्वत्र नवनवीन माध्यमे आली आणि रेडिओचा वाापर कमी झाला. दरवर्षी १३ फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक रेडिओ दिवस' म्हणून साजरा केला जातो. परंतु टेलिव्हिजन आणि मोबाईलचा शोध लागल्यानंतर रेडिओचा वापर कमी झाला. मात्र, आजूनही रेडिओचे महत्त्व कमी झालेले नाही. जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्ताने त्यासंदर्भातील संकलित माहिती कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी सादर करत आहेत... संपादक.
जगभरातील लोकांना शिक्षित करण्याबरोबरच आजपर्यंत माहितीची देवाणघेवाण आणि रेडिओने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तसेच रेडिओ हे पत्रकारांसाठीसुद्धा एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. रेडिओ हे माहिती पसरविण्याचे सर्वात शक्तिशाली साधन आहे. १३ फेब्रुवारी १९४५ रोजी संयुक्त राष्ट्र संघात रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण झाले. त्यामुळे हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. पहिला जागतिक रेडिओ दिन औपचारिकपणे २०१२मध्ये साजरा करण्यात आला होता. जागतिक रेडिओ दिन २०२२ची थीम ''एवोलूशन- द वर्ल्ड इज ऑलवेज चेंजिंग" होती. म्हणजेच विकासाबरोबर जगाचाही विकास होत आहे. थीम रेडिओची लवचिकता आणि टिकाऊपणा दर्शवते. याचा अर्थ जग जसजसे बदलत आहे, तसे रेडिओमध्येही नावीन्यता येत आहे. तरी आजही तो काळ आठवतो जेव्हा आपण रेडिओ ऐकून आनंदीत व्हायचो.
जागतिक रेडिओ दिवस दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिवशी दरवर्षी युनेस्को जगातील सर्व प्रसारक, संस्था आणि समुदायांच्या सहकार्याने विविध कार्यक्रम आयोजित करीत असतो. संवादाचे माध्यम म्हणून रेडिओच्या भूमिकेवर चर्चा करून लोकांना त्याबद्दल जागरूक केले जाते. रेडिओ ही जगभरातील माहितीची देवाणघेवाण करणारी सेवा आहे. आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीत रेडिओचे महत्त्व वाढते. अशा परिस्थितीत जगभरातील तरुणांना रेडिओची गरज आणि महत्त्वाची जाणीव करून देणे, हा जागतिक रेडिओ दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. माहितीचा प्रसार करण्यासाठी रेडिओ हे सर्वात शक्तिशाली आणि स्वस्त माध्यम म्हणून ओळखले जाते. रेडिओ हे युगानुयुगे असले तरी त्याचा वापर संवादासाठी केला जात आहे. जागतिक रेडिओ दिवस कधी आणि का सुरू झाला? सन २०११ साली जागतिक रेडिओ दिनाची सुरुवात झाली. सन २०१०मध्ये स्पॅनिश रेडिओ अकादमीने प्रथमच १३ फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. युनेस्कोच्या सदस्य देशांनी सन २०११मध्ये हा प्रस्ताव स्वीकारला आणि हा जागतिक रेडिओ दिवस म्हणून घोषित केला. नंतर सन २०१२मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनेही ते स्वीकारले. त्यानंतर त्याच वर्षी १३ फेब्रुवारी रोजी युनेस्कोने प्रथमच जागतिक रेडिओ दिवस साजरा केला. याच दिवशी जागतिक रेडिओ दिन साजरा करण्याचे एक खास कारण आहे. वास्तविक, संयुक्त राष्ट्र रेडिओ १३ फेब्रुवारी १९४६ रोजी सुरू झाला. संयुक्त राष्ट्र रेडिओच्या वर्धापनदिनानिमित्त जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जाऊ लागला.
रेडिओ म्हणजे काय? रेडिओ म्हणजे एक असे यंत्र, जे विजेचा वापर करून इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगे तयार करते, ज्यांच्या द्वारे संदेशाची देवाणघेवाण केली जाते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पाठवणाऱ्या रेडिओला ट्रान्समीटर तर तरंगे म्हणजेच वेव्ह स्वीकारून त्याचे रूपांतर आवाजात करणाऱ्या रेडिओला रिसीव्हर असे म्हटले जाते. रेडिओ ३०० एचझेड इतक्या क्षमतेने इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार करू शकते. जगातला पहिला रोडिओ इटलीचे शास्त्रज्ञ मार्कोनी यांनी बनवला. सन १८९५मध्ये त्यांनी रेडिओचा शोध लावला आणि त्याचे पेटंटही मिळवले. मार्कोनीला फादर ऑफ रेडिओ असेही म्हणतात. इंग्रजांनी आणि अनेक युरोपीयन देशांनी हे तंत्रज्ञान आपापल्या वसाहतीत नेले. याच माध्यमातून अमेरिका, आफ्रिका, आशिया खंड आणि ऑस्ट्रेलिया असा रेडिओचा प्रसार झाला. त्या काळी हे माध्यम प्रामुख्याने कम्युनिकेशनसाठी वापरले जात होते. विशेषतः युद्धकाळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, अनेक खेळांच्या कॉमेंट्रीसाठी रेडिओचा वापर होऊ लागला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातही ब्रिटिशांनीच रेडिओ आणाला. दि.२३ जुलै १९२७ रोजी मुंबई आणि कलकत्ता येथे ऑल इंडिया रेडिओ नावाची दोन केंद्रे सुरू झाली. त्यानंतर सन १९३२मध्ये भारत सरकारने भारतीय प्रसारण सेवा नावाचा एक विभाग सुरू केला. सन १९३६मध्ये त्याचे नाव ऑल इंडिया रेडिओ- एआईआर असे ठेवण्यात आले. दरम्यान, सन १९२०चे दशक येता येता रेडिओला व्यावसायिक स्वरुप प्राप्त झाले. तसेच सन १९५०पर्यंत रेडिओ लोकप्रिय झाला होता. भारतातही रेडिओची सुरुवात सन १९२०च्या दशकात झाली. दि.२३ जुलै १९२७ रोजी मुंबईतून रेडिओ प्रसारण सेवा सुरू झाली. तसेच इंडियन ब्रॉडकास्टींग कंपनी लिमिटेडने मुंबई आणि कोलकता येथे रेडिओ स्टेशन सुरू केले. परंतु सन १९३०मध्ये ही कंपनी बंद पडली. त्यानंतर सरकारने ही कंपनी आपल्या ताब्यात घेत त्याला इंडियन स्टेट ब्रॉडकास्टींग सर्विस असे नाव दिले. त्यानंतर दि.८ जून सन १९३६मध्ये त्यांचे ऑल इंडीया रेडीओ असे नामकरण करण्यात आले. तसेच सन १९५६मध्ये पुन्हा याचे नाव बदलत आकाशवाणी करण्यात आले. हळूहळू आकाशवाणीचे जाळे देशभर पसरू लागले. आज २३ भाषांमध्ये ४१५ रेडिओ स्टेशनसह ऑल इंडीया रेडीओ ही जगातल्या सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण सेवेपैकी एक बनली आहे. तसेच सन २००१मध्ये भारतात खासगी रेडिओ स्टेशनलासुद्धा सुरुवात झाली होती.
रेडिओ हे सर्वात जुने माध्यम असले तरी, संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. सन १९४५मध्ये आजच्याच दिवशी संयुक्त राष्ट्र संघात रेडिओचे पहिले प्रसारण झाले होते. त्यामुळे हा दिवस 'जागतिक रेडिओ दिवस' म्हणून साजरा केला जातो. स्पेन रेडिओ अकादमीने सन २०१०मध्ये 'जागतिक रेडिओ दिवस' साजरा करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर युनेस्कोच्या ६७व्या सत्रात १३ फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक रेडिओ दिवस' म्हणून घोषित करण्यात आला. युनेस्कोच्या या निर्णयाला संयुक्त राष्ट्रसंघाने दि.१४ जानेवारी २०१३ रोजी मान्यता दिली. दरवर्षी युनेस्कोद्वारे जगभरातील रेडिओ प्रसारक आणि संघटनांनाच्या मदतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच संवादाचे माध्यम म्हणून रेडिओच्या भूमिकेवरसुद्धा चर्चा केली जाते. यावर्षी जागतिक रेडिओ दिवसाला 'रेडिओ आणि विविधता' ही थीम देण्यात आली आहे. तसेच विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संपर्क असे सबथीम सुद्धा देण्यात आले आहे.
!! समस्त श्रोत्यांना जागतिक रेडिओ दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
- संकलन व शब्दांकन -
- कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
- गडचिरोली 7775041080.
0 टिप्पण्या