Top Post Ad

सरकारने कामगारांनाच नाही तर शेतकऱ्यांनाही देशोथडीला लावले

 


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लोककल्याणासाठी अनेक कायदे केले. कामगार आणि महिलांना समान अधिकार दिला. भाजपच्या मोदी सरकारने कामगारांनाच नाही तर शेतकरयांनाही देशोथडीला लावले. आम्ही सत्तेत शेतकऱ्यांसाठी आलो नाही आणि त्यांचे कर्ज माफ करू असे कधीच म्हटले नाही. असे वक्तव्य करून मोदींनी शेतकऱ्यांचा अपमान केला असल्याचा आरोप रिपब्लिकन आघाडीचे निमंत्रक राजाराम खरात यांनी केला. असंघटित कामगार संघटना आणि रिपब्लिकन अलायन्स ऑफ महाराष्ट्रच्या वतीने सोलापूरला कामगार सभेत जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी भाजपच्या मोदी सरकारवर सडकून टीका केली्

महिलांसाठी पुरेशी प्रसूती रजा, तसेच पेन्शन प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युईटी, 12 तासांची ड्युटी आठ तासांवर आणली, कामगारांना त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार दिला गेला, पण सध्याचे मोदी सरकार कामगारांना दिलेले अधिकार नष्ट करत असुन करोडो लोकांना बेरोजगार करत आहे आणि उद्योगपतींचे लाखो कोटींचे कर्ज माफ करत आहे.असे खरात म्हणाले्कोरोना महामारी खरोखरच जीवघेणी होती की नाही. याबाबत संभ्रम आहे, मात्र कोरोनाच्या भीतीने हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.कोरोनाच्या भीतीने मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारने 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी देखील राजाराम खरात यांनी यावेळी केली.

आगामी निवडणुकीत भाजपच्या मोदी सरकारचा पराभव करण्याचे आवाहन यावेळी कट्टरपंथीयांनी भारतीय नागरिकांना केले आहे.  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अधिवक्ता गजानन लासुरे यांनी मोदी सरकारचे कामगार विरोधी धोरण व कामगारांचे होणारे नुकसान याबाबत सविस्तर विवेचन केले. एड. किशोर कांबळे यांनी रिपब्लिकन आघाडीच्या गरजेवर भर दिला. सतीश गायकवाड, ऍड. कृष्णा दुबे, मनोज एकमल्ले, भरतकुमार मोरे, नामदेव खोब्रागडे प्रतिभाताई एकमल्ले यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे आयोजक वर्कर्स युनियनचे मनोज एकमल्ले व प्रतिभाताई एकमल्ले व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमाला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com