Top Post Ad

मुंबईचे अर्ध्याहून अधिक रस्ते गायब. महापालिकेचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष

मुंबईत वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे.  रस्ते व इतर बांधकामात प्रचंड दिरंगाई सुरू आहे खराब रस्ते वाढ़ती वाहने यामुळे मुंबईतील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. परिणामी मुंबईची जागतिक पातळीवरील मेट्रोसिटी अशी ओळख लयाला चालली आहे.  वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर वाहनातून सुटणारा धूर ज्यामुळे नागरिकांच्या श्वसनप्रक्रियेवर  प्रचंड  परिणाम होत आहे. परिणामी त्यांचे सरासरी आयुष्य दिवसेंदिवस कमी कमी होत आहे, मुंबईतील वाहतूक समस्येचे तात्काळ निराकरण व्हावे,  प्रलबिंत नियोजित रस्ते कामांची तातडीने सुरु करण्याची गरज असल्याचे मत मुंबई मार्च संस्थेचे प्रमुख सदस्य गोपाल झवेरी यांनी केले व्यक्त केले. 

वाहतूक कोंडीच्या समस्येचे  निराकरण होत नसल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्प मुंबईऐवजी देशातील इतर भागात स्थापित होत आहेत,  १९६७ सालापासून मुंबईच्या नियोजित रस्ता प्रकल्पाचे काम सातत्याने रखडत आहेत. मुंबईकराना भेडसावणाऱ्या समस्या पाहता रस्त्यांचे बांधकाम तातडीने सुरू व्हायलाच हवे. मुंबई मार्च हे नागरिकाच्या सहभागाने उदयास आलेली संस्था आहे.  मुंबईत मूलभूत सोयी सुविधांचा विकारा व्हावा, हा मुंबई मार्च संस्थेचा मुख्य हेतू आहे. सदर रस्त्यांचे बांधकाम मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित येते, पालिकेकडून हे काम तातडीने सुरूच व्हायला हवे. मुंबईत प्रवास करताना खासगी वाहनाने किंवा बसने प्रवास केला तरी  दिवसातर असतोच पण रात्री अपरात्रीही वाहतुक कोंडीचा सामना सहन करावा लागतो. मुंबईला सर्व दिशेहून जोडणाऱ्या नियोजित रस्ते प्रकल्पाच्या दिरंगाईमुळे आर्थिक नुकसानालाही सामोरे जावे लागत आहे, अशी तक्रार 'मुंबई मार्च चे प्रमुख सदस्य  बजरंग अग्रवाल यांनी केली. 

मुंबई महानगर पालिकेला हा प्रकल्प व्यवस्थित हाताळता येत नसल्याचा मुद्दा सेवानिवृत्त कर्नल चंद्र शेखर उत्री यांनी  मांडला. मुंबईतील नियोजित रस्ता प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी मुंबई महानगरपालिकेकडे येते. यात केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतील इतर संस्थांचाही समावेश होतो. त्यांच्यासोबत हा महत्वकांक्षी प्रकल्प राबवण्पात पालिका प्रशासन कमी पडले, असा थेय आरोपही उन्नी यांनी केला. संरक्षण खाते, भारतीय विमानतळ प्राधिकरण, भारतीय खाद्य निगम, वनविभाग पांच्णाकতুৰ पालिकेता अद्यापही आवश्यक परवानगी मिळालेल्या नाही सासगी मालमत्तेवरीत जागा हस्तांतीकरण तसेच झोपडपट्टी पुनर्वसन कार्यक्रमात पालिकेचे प्रयन सपशेल अपयशी ठरले, अशी टीकाही त्यांनी केली 

आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार, मुंबईत रस्त्यावरीत ट्राफिकवर वाहने व्यसनतास अडकल्याने ४१ इंधनाचे नुकसान होते. तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेल्या इतर कोणत्याही शहराला भेट द्या या शहरात किमान ३० किलोमीटर पर्यंतचे अंतर वासाभरात कापता येते. मुंबईत सात किलोमीटर पर्यंतचे अंतर कापताना एक तास लागतो, या मुद्यावर उपस्थित सर्व सदस्यांनी प्रकाश शकता. या समस्येचे निराकरण व्हायलाच हवे. ३० टक्के हवेची गुणवत्ता केवळ वाहतुकीकोंडीमुळे खराब झाली आहे.  हवेतील ऑक्सिजनचा दर्जा ढासळल्याने मुंबईकरांना वर्षभर सर्दी, खोकल्याचा जास होतोय. लहान मुले आणि वृद्धांची श्वसनाची तक्रार. तसेच  सतत वाहतूक कोंडीत अडकल्याने मुंबईकरांमध्ये चिडचिड वाढत आहे. सतत तणावाचे आयुष्य जगावे लागत आहे.  बराच काळ वाहतुक कोंडीमध्ये अडकल्याने शाब्दिक चकमक होते त्याचे पर्यावसन मोठ्या भांडणात नंतर हाणामारीत होते असल्याने यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी मुंबई मार्चच्या वतीने करण्यात आली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com