रिपब्लिकन चळवळीत कार्यरत राहून समाजातील शिक्षण आणि अर्थकरण व्यापक झाले पाहिजे, या ध्येय भावनेतून काम करणारे चंद्रकांत जगताप यांची ओळख आता नवीन नाही. ग्रामीण भागातून मुंबईसारख्या शहरात वास्तव्य करून शिक्षण तिथून पत्रकार आणि उद्योजक घडून थेट लंडनचा प्रवास करून पुन्हा भारतात बहुजन समाजातील उद्योजक घडविणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व चंद्रकांत जगताप यांच्याकडे पाहिले जाते. कसा झाला त्यांचा प्रवास आणि कशी विभिन्न परिस्थितीत संघर्ष करीत त्यांनी यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. यामागे त्यांचे प्रेरणास्थान प्रामुख्याने भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबांनी त्यांना दिलेली साथ ही बहुमोलाची म्हणावी लागेल. अशा अनेक बाबींवर त्यांच्याशी चर्चा करण्याचा त्यांच्या कार्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे पत्रकार महादू पवार यांनी...
आपली शैक्षणिक सुरुवात कशी झाली
मुंबईतील वडाळ्यातील बीपीटी गव्हर्मेंट मधून राहायला गेल्यानंतर मुन्सिपल स्कूल वडाळा बीपीटी नाडकर्णी पार्क येथील शाळेतून त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बोरीबंदर येथील सिद्धार्थ महाविद्यालय आर्ट्स कॉमर्स सायन्स मधून त्यांनी महाविद्यालय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आज दिनांक, वृत्त मानस लोकप्रभा, महानगर या वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. मुंबईतील गाजलेल्या सारा समय या खाजगी वृत्तवाहिनीवर ही त्यांनी पत्रकारिता केली आहे. एम्प्लॉयमेंट मधून नोकऱ्या तरुणांसाठी मिळाव्यात यासाठी उभारलेल्या आंदोलनात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी एम्प्लॉयमेंट कार्यालयाची तोडफोड केल्याने त्यांना अटक झाली होती. तरुणांना नोकऱ्या मिळालाच पाहिजेत ,यासाठी त्यांच्यावरही पहिली चांगल्या कामासाठी केस झाली होती. क्त्यांनंतर ती मागे घेतली गेली. आंदोलन केल्याचा अभिमान आहे.
पुढे सहकार क्षेत्रामध्ये कसे आलात
महाराष्ट्रात सहकार क्षेत्र व्यापक आहे. सहकार मधून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. असा आशावाद निर्माण झाल्याने परिवर्तन बेरोजगार सहकारी संस्था याची बांधणी केली. त्यासाठी माजी आमदार मधु चव्हाण यांच्या सहकार्याने वरळी येथील बीडीडी चाळीत सहकारी संस्थेचे कार्यालय उभे केले. तिथून मग सहकारातून रोजगाराची विविध संधी तरुणांना उपलब्ध करून देण्यास सहकार्य मिळाले. सहकारी संस्थेच्या माध्यमातून घरपोच लोकांना किराणा वस्तू आम्ही स्वतः पोच करून बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला. भेटीगाठी मधून व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विविध कंपन्या स्थापन करून रोजगार देण्यात आम्हाला यश आले. मुंबई महानगरपालिकेत हैदराबाद पॅटर्न अंतर्गत सफाईची कामे करताना आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून क्लीन अप करण्याचे ट्रेनिंग प्रात्यक्षिके करून दाखवल्यानंतर आम्हाला ही कामे मिळाली. हे काम मिळताना आमची कसोटीच लागली होती. त्यामधून आम्ही यशस्वी ठरलो. त्या वेळचा आनंद ओरच होता.
सामाजिक चळवळीत काम करत असतानाच आर्थिक क्षेत्रात कसा जम बसवला
सिद्धार्थ कॉलेजच्या बुद्ध भवन मध्ये शिकत असतानाच सामाजिक चळवळीकडे आकर्षित झालो. परंतु चळवळीबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी आर्थिक गणित जुळवली पाहिजेत. या भावनेतून सन 2002 ते 2012 या कालावधीमध्ये प्रगतिशील मोबाईल स्टार क्रॉस सब बिजनेस प्रिंटर्स आधीची कंत्राटी घेतली गेली. त्यातून कंपनी स्थापन करून व्यवसायाला सुरुवात झाली. त्यानंतर लंडनला जाण्याची संधी मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सेंटर मध्ये लंडनला राहण्याची सुविधा मिळाली. त्यानंतर उद्योजक गौतम चक्रवती यांना भेटलो. त्यावेळी उद्योजक गौतम चक्रवर्ती त्यांच्या घरी गेलो असता ते साध्या कपड्यांमध्ये साधारण त्यांचे 75 वर्ष असावे. त्यावेळी ते हातात खुरपे घेऊन गार्डनमध्ये काम करत होते. त्यावेळी मी त्यांना विचारले गौतम चक्रवर्ती साहेब भेटतील का ? तेव्हा ते स्वतः म्हणाले, मीच चक्रवर्ती आहे. काय काम आहे ? एवढी मोठी व्यक्ती साधी राहणी पाहून मला त्यांचा हेवा वाटला. नंतर त्यांचे आणि माझे कौटुंबिक नात्याचे संबंध जोडले गेले. सन 2003 वर्षी महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यात खैरलांजी हत्याकांड घडलं होते. या हत्याकांडाची माहिती लंडनमधील प्रवीण भाले, साहित्यिक ज्योती लांजेवार यांच्या सहकार्यातून इंडियन ॲम्बुलन्स मधून ही माहिती जगभरात पोचली. त्याचे जगभरात तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे त्याचा भारत सरकारवर दबाव आला होता. ही महत्वपूर्ण कामगिरी करण्यात मला यश आल्याने त्याचे समाधान वाटते.
सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची आपली लंडनमध्ये भेट झाली होती.
खर आहे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब यांची माझी ही लंडन मधली अविस्मरणीय अशी आठवणीतली भेट आहे. लंडनच्या इंडियन दूतावास कार्यालयात भीम जयंतीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात रामदास आठवले साहेब भेटले आणि त्यांचे व्यक्तिमत्व जवळून अनुभवता आले. त्यावेळी त्यांनी मला भारतात परतल्यानंतर रिपब्लिकन पक्षाची जबाबदारी घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. सन 2011 12 रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र रोजगार आघाडीचे अध्यक्षपद मला मिळाले. आणि इथून पुढे राजकीय वाटचालीला सुरुवात झाली.
रोजगार आघाडीच्या मार्फत आपले सामाजिक विविध उपक्रम सांगाल का
चंद्रकांत जगताप, बहुजन समाजातील वंचित घटकाला उद्योग क्षेत्रामध्ये तसेच रोजगाराची संधी मिळावी. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रोग्रॅम कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आले. अन्नपूर्णा अल्पोहर केंद्रात मार्फत दीडशेपेक्षा अधिक स्टॉल उपलब्ध करून देण्यात आम्हाला यश आले. रोजगार हक्क परिषद घेण्यात आल्या. सर्व जिल्ह्यांमध्ये रोजगार आघाडी मार्फत नवे कार्यकर्ते घडवण्यात आम्हाला यश आले. अनेकांना साहित्यिक कवी विचारवंत यांना पुरस्कार दिला पाहिजे ,अशी भावना पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी माझ्याकडे व्यक्त केली होती. त्यानुसार समाजातील नामवंतांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. स्पंदन प्रकाशन संस्थेमार्फत अनेक नव्या साहित्यिकांना त्यांची पुस्तके प्रकाशित करून त्यांना घडवले आहे. मानखुर्द मध्ये दिव्यांग शाळा सुरू करण्यात आली आहे. तिला महापालिकेचेही मान्यता मिळाली आहे. स्पोर्ट्सनिर्मित क्रिकेट अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. नाट्य क्षेत्रात ही खैरलांजी,अस्वस्थ मनाचा फ्लॅशबॅक ही नाटके रंगभूमीवर आणण्यात निर्माता म्हणून आम्हाला यश आले आहे. राजेश कोळंबकर यांचे बायकांनाही कान आहेत, बी पॉझिटिव्ह या नाटक निर्मितीचे म्हणूनही मी काम पाहत आहे.
गेली सोळा वर्ष समाजात काम करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्कार दिला जात आहे, त्यामुळे लोकांमध्ये अशा असाधारण व्यक्तिमत्त्वांना कशी प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल, याचं काम पाहत आहे. गरीब वंचित घटकातील मुलांना त्यांना शैक्षणिक शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांचा शिक्षणाचा भार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती मार्फत उचलला जातो.
आपण निवडणुकही लढवली होती.
चंद्रकांत जगताप, सन 2014 वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेतून वार्ड मधून निवडणूक लढवली होती. परंतु निवडणुकीत फारसे यश आले नाही. ही बाब निराशा जनक असली तरी आपण अपयशी कदापि नाही. अपयशातून यश कसे मिळवणे हे आतापर्यंत अनुभवातून शिकल्यामुळे मी निराश होत नाही. महाराष्ट्रात रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त नोकऱ्या रोजगार कसे उपलब्ध होतील, त्यासाठी आपण काम करीत महाराष्ट्रातील 40 ते 50 हजार तरुणांना रोजगाराची साधने उभी करून देण्यात आली आहेत, याचा मला अभिमान वाटतो,
सामाजिक चळवळीचा कार्यभार पुढे कसा ठेवावा त्यातून समाजाला काय संदेश द्याल
चंद्रकांत जगताप, सामाजिक चळवळीत विशेषता आंबेडकरी चळवळीचा प्रचार, प्रसार कसा करता येईल, यावर अधिक भर दिला जाणार आहे. शैक्षणिक संस्था सांस्कृतिक संस्था उभ्या करणे हे काम केले जात आहे. एमआयडीसी औद्योगिक विकास केंद्र यामध्ये वंचित घटकांना कशा जमिनी देऊन रोजगार निर्मितीला चालना देता येईल , त्यावर ती भर दिला जात आहे. समान जमीन वाटप करून शैक्षणिक धोरण सर्वानसकट समान नागरी कायदा कसा मिळेल, त्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या समाज हिताच्या भूमिकेसाठी जनतेने आमच्याशी सहकार्याची भावना ठेवून या लढाईत आम्हाला साथ द्यावी, असेच जनतेला नम्र विनंती करतो.
पत्रकार महादू पवार- Mob, 9867906135
0 टिप्पण्या