- १) बहुजन समाज पार्टी
- २) भारिप-बहुजन महासंघ (वंचित बहुजन आघाड़ी)
- ३) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)
- ४) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)
- ५) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोरीपा)
- ६) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)
- ७) रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉर्मिस्ट)
- ८) रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (सोशल)
- ९) रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए)
- १०) रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे)
- ११) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (दिलीप गायकवाड)
- १२) युथ रिपब्लिकन (भाई संगारे )
- १३) पिपल्स रिपब्लीकन पार्टी (कवाडे)
- १४) रिपब्लीकन प्रेसिडीयम पार्टी ऑफ इंडिया
- १५) रिपब्लीकन बहुजन सेना
- १६) रिपब्लीकन सेना
- १७) संविधानवादी रिपब्लिकन पक्ष
- १८) पँथरस रिपब्लीकन पार्टी
- १९) प्रबुध्द रिपब्लीकन पार्टी
- २१) रिपब्लिकन जनशक्ति पक्ष
- २२) डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी
- २३) बहुजन रिपब्लीकन एकता पक्ष
- २४) बहुजन रिपब्लीकन सोशालिष्ट पार्टी
- २५) भारतीय रिपब्लीकन पक्ष
- २६) आंबेडकरवादी रिपब्लीकन पार्टी
- २७) स्वाभीमानी रिपब्लीकन पक्ष (मनोज नि ससारे)
- २८) डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया
- २९) डेमोक्रेटीक सेक्युलर पार्टी
- ३०) नवभारत डेमोक्रेटीक पार्टी
- ३१) नवबहुजन समाजपरिवर्तन पार्टी
- ३२) प्रबुध्द भारत प्रजासत्ताक पार्टी
- ३३) बहुजन महासंघ पक्ष
- ३४) बहुजन विकास आघाडी
- ३५) भारतीय बहुजन क्रांती दल
- ३६) आजाद समाज पार्टी
- ३७) पी पी आई
- ३८) बहुजन वॉलिटीयर फोर्स
- ३९) अ.भा. रेव्होल्युशनरी शोषित कि समाजसंघ, लातूर
- ४०) बहुजन मुक्ती पार्टी
- ४१) ब्लॅक पँथर
- ४२) आंबेडकरी पार्टी ऑफ इंडिया
- ४३) अम्बेडकराईट्स पार्टी ऑफ इंडिया ( विजय मानकर )
- ४४) भारतीय दलीत कोब्रा
- ४५) भीम टायगर युवा सेना...
- ४६) भीमसेना
- ४७) भीम टाइगर सेना
- ४८) भीम आर्मी
ज्या समाजात इतके गट आहेत तो समाज कधीच सत्तेत येऊ शकत नाही ! त्यामुळे यावर विचार करणे महत्वाचे आहे. अन्यथा आपण फक्त सत्तेचे स्वप्न बघु शकतो सत्तेत येऊ शकत नाही. यातले काही पक्ष तर फक्त आपल्याच लोकांवर टीका टिप्पणी साठी बनलेत. समजून घ्या आपली लढाई बाहेरच्यांशी नसून आपापल्या मध्येच लागलीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पहिलं स्वप्न बऱ्यापैकी पूर्ण होत, ते म्हणजे शिक्षण घ्या. पण दुसरं स्वप्न अजून अपूर्णच आहे. बाबासाहेब म्हणाले होते शासनकर्ती जमात बना, पण आपली जमात आपल्यातच लढते आहे, ही एक शोकांतिका आहे. एकाच समाजात इतके गट आहेत तो समाज कसा सत्तेत येईल ? हा एक विचार करण्याजोगा प्रश्न आहे. कारण कितीही कठीण वाटणारी गोष्ट असो ती एकीने सोपी होत असते. हे अगदी लहान मुले ही हे जाणतात. मग एकी का नको ? हा प्रश्न प्रत्येकाला ही तितकाच भेडसावणारा असला पाहिजे. त्यातूनच एकीची भावना निर्माण होऊन त्यासाठी पर्यंत होतील आणि तेच महत्वाचे ठरू शकेल.
सुरुवातीचे दोन पक्ष सोडले तर सध्या कोणत्याच पक्षाला या निवडणुकीत काही स्थान आहे असे दिसत नाही. प्रत्येक जण कोणाच्या ना कोणाच्या वळचणीला जाऊन आपली पोळी भाजण्याची धडपड करत आहे. अशा वेळी ऐक्याची हाक देणारे नेहमीचे प्यादे या सर्व गटा-तटांना आपली स्वतंत्र आघाडी निर्माण करण्यासाठी का प्रवृत्त करीत नाही हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहात नाही. लोकसभा २०२४च्या निवडणुकीत आंबेडकरी समूहाला अद्यापही वेशीवरच ठेवण्यात आले आहे. निवडणुका जाहीर झाल्या आणि ओबीसीचे राजकारण सुरु झाले आहे. या निवडणुकीत आतापर्यंत सुमारे ५ ते ६ ओबीसी आघाड्यां निर्माण झाल्या आहेत. प्रत्येकजण महाराष्ट्रात सर्वच्या सर्व जागा लढवणार असल्याचे जाहिर करीत आहे. एकेकाळी निवडणूक आली की रिपब्लिकनचा बोलबाला असायचा. प्रत्येक पक्ष रिपब्लिकनचा निळा झेंडा आपल्या प्रचारात कसा दिसेल याकडे लक्ष ठेवून असायचा. पण आज तसे काही दिसून येत नाही. याच्या मागचे कारण काय असेल ते असेल पण आज रिपब्लिकन जनतेने आपल्या एवढ्या पक्षांना, संस्था-संघटनांना एकत्र करून एखादी रिपब्लिकन आघाडी केली तरी निश्चितच दोन-चार जण आपण निवडून आणू शकतो.
- अरुणा गायकवाड
- पारनेर, अहमदनगर,
0 टिप्पण्या