Top Post Ad

मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाला काही काळ स्थगिती दयावी


   



 सध्या मराठा समाजाला सरसकट नोकरी शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने जाहीर केला असले तरी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. परंतु सध्या दहावी ,बारावी या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लक्षात घेता या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला धोका निर्माण होऊ नये, म्हणून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण करण्याचा निर्णय मागे घ्यावा ,अशी विनंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र मराठा आघाडी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी केली आहे. 
        मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका रिपब्लिकन पक्षाची पूर्वीपासूनची मागणी आहे. परंतु राज्य सरकारकडून मागणी करून ही मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. मराठा समाजाला एक आरक्षण देताना सरकारने स्वतंत्र दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्याचा शासकीय निर्णय जाहीर केला आहे. परंतु हे आरक्षण कोर्टात टिकणार की नाही? हा प्रश्नच आहे. त्यामध्ये मूळ मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी एडवोकेट गुणवरते सजावते यांनी केले जात हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. ही याचिका फेटाळून लावण्यासाठी राज्य सरकारने योग्य तीच आपली बाजू मांडून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची भूमिका सरकार कडून किती उपयुक्त आहे ,असा युक्तिवाद न्यायालयात करून हे आरक्षण टिकवून ठेवलं पाहिजे. या आरक्षणला न्यायालयाच्या कचाट्यातून मराठा समाजाला कसा न्याय मिळेल? अशी भूमिका घेतली पाहिजे, मराठा समाज मागास आहे ,त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे. त्यासाठी सरकारने कोर्टात आपली बाजू भक्कमपणे मांडली पाहिजे. असे मराठा समाजाचे नेते व रिपाई मराठा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी सरकारकडे मागणी केल्याचं सांगितले आहे.
 गेल्या काही वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या भूमिकेसाठी मराठा आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब मिरजे म्हणाले की जरांगे पाटील हे मराठा आरक्षण लढा लढत आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची केलेली तरतूद योग्य असून त्याची काटेकर पणे अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशी ठाम भूमिका घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा नागरी सत्कार घाटकोपर आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणाऱ्या माता रमाबाई कॉलनी शहीद स्मारक सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागरी नागरिक जाहीर सत्कार केला जाणार आहे, अशी माहिती रिपाई मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. मराठा आरक्षण न्यायालयात टिकून ठेवण्यासाठी आमच्या परीनेही आम्ही युद्ध पातळीवर प्रयत्न करणार असून मराठा समाजाचे नेते मनोज रंगे पाटील यांच्या विरोधात स्थापन झालेले एसआयटी रद्द करण्यात यावी अशी मागणी बाळासाहेब मिरजे यांनी मुंबई पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

  पत्रकार... महादु पवार 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com