ईडी, सीबीआय व इनकम टॅक्स विभाग आपले काम करत असते तर आम्हाला काही आपत्ती नव्हती. मात्र त्यांनी लक्षात ठेवावे की, एक दिवस हे सरकार बदलेल. त्यावेळी अशी कारवाई होईल की, पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही. ही माझी गँरेंटी आहे. असा इशारा राहूल गांधी यांनी दिला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आयकर विभागाची नोटीस मिळाली आहे. यावर राहुल गांधींनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोशल मीडिया प्लेटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करत राहुल गांधी यांनी म्हटले की, भाजपला लक्षात ठेवले पाहिजे की, जेव्हा सरकार बदलेल, तेव्हा अशा लोकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल ज्यांनी लोकशाहीचे चीरहरण केले आहे. फेब्रुवारी महिन्यात काँग्रेसने म्हटले होते की, आयकरात खोट दाखवून पक्षाचे बँक खाते गोठवले होते. पार्टीला १३० कोटी कर देण्याबाबत नोटीसही बजावली होती. त्यांना आयकर विभागाची नोटीस मिळाली असून त्यामध्ये १,८२३.०८ कोटी रुपये जमा करण्यास सांगितले आहे. भाजप आयकर कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
आयकर विभागाने भारतीय जनता पार्टीबाबत आपले डोळे बंद केले आहेत. भाजपवर ४६०० कोटी रुपयांचा दंड लावला पाहिजे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक्स वर पोस्ट केली की, भाजपकडून ४२ कोटी रुपये जमा करण्यासाठी ४,६०० कोटी रुपयांच्या दंडाकडे कानाडोळा केला गेला. तर काँग्रेसचे आमदार व खासदारांद्वारे १४ लाखांची रोकड जमा करण्यासाठी १३५ कोटी रुपयांच्या दंडाची मागणी केली आहे. भाजप लोकसभा निवडणुकीत 'मोदीची गँरंटी' मोहीम चालवत आहे. जे पंतप्रधान मोदींनी मागील निवडणूक आश्वासने पूर्ण केल्याची वचनपूर्वी दाखवते. माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या मागील व्हिडिओला टॅग करताना आपल्या पोस्टसोबत हॅशटॅग #बीजेपीटॅक्सटेररिज्म चा वापर केला होता. आयकर विभागाने १,८०० कोटी रुपये जमा करण्याची नोटीस बजावली आहे. या नोटिसीला गंभीर म्हणत काँग्रेसने भाजपवर "टॅक्स टेररिज्म" चा आरोप केला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, काँग्रेसला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आम्ही घाबरणार नाही. काँग्रेसने आयकर विभागाच्या या नोटिशीविरोधात देशव्यापी निर्देशने करण्याचा निर्णय घेतला आहे.
0 टिप्पण्या