लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची तिसरी यादीत महाराष्ट्रातील एकमेव उमेदवाराचं नाव आहे.ते म्हणजे अमरावतीमधून नवनीत राणा. आरक्षणविरोधी कंगना राणौतला तिकीट दिल्यानंतर भाजपने नवनीत राणा यांना तिकीट दिले आहे. बनावट अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बनवून नवनीत राणा महाराष्ट्राच्या अमरावती मतदारसंघातून खासदारकी उपभोगली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांच्या विरोधात निकाल देत त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले आणि त्यांना 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला. असे असूनही अनु. जातीचा हक्क सांगणाऱ्या नवनीत राणा यांना भाजपने तिकीट दिले आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना पराभूत करत अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा बराचसा फायदा झाला होता. कारण त्यावेळी राष्ट्रवादीने तिथे उमेदवार दिला नव्हता. ज्याचा थेट फायदा हा राणांना झालेला. मात्र, निवडून आल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे भाजपच्या बाजूने झुकले. मात्र, यामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचं तिकीट महायुतीत कापलं गेल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण या जागेसाठी आनंदराव अडसूळ हे खूप आग्रही होते. पण भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी देत आनंदराव अडसूळ यांचा पत्ता कट केला आहे. जो शिंदे गटासाठी देखील एक मोठा धक्का मानला जात आहे.
आम्ही नवनीत राणा यांचा प्रचार अजिबात करणार नाही. 100 टक्के याची खात्री देतो. नवनीत राणा यांना ही निवडणूक अजिबात सोपी जाणार नाही. निकाला तुम्हाला 100 टक्के दिसेल, नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार द्यायचा की नाही याचा लवकर निर्णय घेऊ नवनीत राणा यांचा विजय होणार नाही याची खात्री करु. 100 टक्के त्यांना पाडणार, त्यांचा पराभव कसा करायचा हे आम्ही ठरवू विरोधात प्रचार करताना आम्हाला महायुतीत ठेवायचं की नाही याचा निर्णय ते घेतील. काम सरो, वैद्य मरो अशी आपली अवस्था आज झाली आहे. मला वाटतं सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. रवी राणा यांनी भाजपचं कार्यालय फोडलं. कार्यालयात घुसून राणा यांनी भाजपचे पोस्टर्स फाडले.आता ज्यांनी पक्षाचे कार्यालय फोडले, त्यांचाच झेंडा हातात घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना राणा यांचा प्रचार करावा लागणार आहे. मला वाटतं एवढी लाचारी अन्य कोणत्याही पक्षावर येत नसेल.आम्ही बोललो तर त्यांना राग येतो. आमची स्वत:ची पानटपरी (स्वत:चा पक्ष) आहे. आमच्यावर कोणीही दबाव टाकू शकत नाही. आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न विचारात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने निवडणूक लढू. आम्ही या जागेवर चांगला उमेदवार देऊ किंवा सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊ. सध्या आम्हाला कोणताही सक्षम उमेदवार वाटलेला नसून ४ तारखेपर्यंत त्याचा शोध घेऊ. सर्वांनी एकत्र येऊन झुंडशाही लोकशाहीचे पतन करणाऱ्या उमेदवारांना पाडण्याची जबाबदारी घ्यावी. नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे भाजपच्या पालकमंत्र्यांना बालकमंत्री म्हणाले होते. मोदींच्या नावाने जी गुंडशाही सुरू आहे ती थांबली पाहिजे. प्रभू रामचंद्रचं नाव घ्यावं आणि बगलेत सुरी ठेवायची हे चालणार नाही, , . - बच्चू कडू
. ही राजकीय आत्महत्या असल्याची टीका त्यांनी केली आहे. हे निर्लज्ज असल्याने कोणतंही विधान करतात. आम्ही आमची लाज, शरम विकलेली नाही. स्वाभिमान विकलेला नाही. आमच्या जीवावर आम्ही निवडणूक लढू शकतो आणि लढणार. मीच विरोधात उभा राहणार आहे, भाजपाने ही उमेदवारीची घोषणा केली असून, महायुतीची घोषणा नाही. ज्याप्रमाणे आढळराव-पाटील यांच्या उमेदवाराची तिन्ही पक्षांमध्ये आधी चर्चा झाली आणि नंतर राष्ट्रवादीत प्रवेश झाला. तसं इथे काही झालं नाही. मीच त्यांच्याविरोधात आता निवडणुकीला उभा राहणार - आनंद अडसूळ
0 टिप्पण्या