कल्याण भिवंडी टिटवाळा,तसेच ठाणे जिल्ह्यात दलित मागासवर्गीय आदिवासी* समाजावर अत्याचार झालेले आहेत. अन्याय झालेला आहे, त्यांचे खून पाडण्यात आलेले आहेत. या विरोधात नेते पुढारी आणि मंत्री यांनी त्या विरोधात एक शब्दही काढला नाही. उलट हे लोक *अत्याचार* करणार्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न ज्या नेते, पुढारी आणि मंत्री आपल्यातीलच त्यांचे भडवे दलाल यांच्याकडून *विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साठी पाच पैसेही निधी घेण्यात येऊ नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आल्याबरोबर काही आमच्यातीलच *दलाल सक्रिय* झालेले आहेत. या बाबतीत आम्ही अशा लोकांपासून जागृत सावध राहिले पाहिजे. त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे नाही.
आपणास कल्पना असेल की या ठाणे जिल्ह्यातील *मुख्यमंत्री* असताना या जिल्ह्यात कल्याण भिवंडी मुरबाड या ठिकाणी तरुण मुलं, वयोवृद्ध व्यक्ती तसेच महिलांवर अत्याचार झालेले आहेत. याबाबतीत ठाणे जिल्ह्यातील नेते पुढारी मंत्री यांनी अत्याचारा विरोधात कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. तसेच त्या बाबतीत एक शब्दही उच्चारलेला नाही.अशा लोकांकडून *डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला पाच पैशाचाही निधी घेणे हा आंबेडकरी द्रोह आहे*. म्हणून अशा लोकांकडून सावध राहून तसेच त्यांच्या दलालांपासून सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे.
आपणास कल्पना असेल कल्याण मध्ये *मोहित गायकवाड* या सोळा वर्षाच्या मुलावर झालेल्या अत्याचाराचा प्रकार अतिशय भयानक होता.त्याची भर दिवसा धिंड काढून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच नुकताच *कबीर मोहन जाधव* टिटवाळा या अल्पवयीन मुलाला भिवंडीतील देवाग्रुप ने उचलून पडघा जंगलात नेऊन त्याचे हात पाय तोडण्यात आले, त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारच्या घटना आपण सातत्याने पाहत आहोत. कल्याण शहराला लागून असलेल्या भिवंडीत सोळा वर्षाचा कॉलेज तरुण *संकेत भोसले* याचा उचलून नेण्यात येऊन त्याचा निघृन खून करण्यात आला. तसेच एका अपराधी महिलेने विकृत कृत्य केले. तसेच भिवंडी शहरात यापूर्वी चार खून झालेले आहेत. असे असताना याबाबत या ठाणे जिल्ह्यातील असलेल्या मुख्यमंत्री/ मंत्री यांनी खंबीर भूमिका घेतलेली नाही. तसेच येथील मंत्री आमदार नेते पुढारी यांनीही मागासवर्गीयाच्या बाबतीत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. तसेच *मुरबाड मधील आदिवासी ७२ वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तीवर* अग्नीवर चालण्याचा घृणास्पद प्रकार करून त्याला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
*खून, बलात्कार, उचलून नेने, किडनॅप करणे, असे प्रकार दलित- आदिवासी* लोकांवर केले जातात. तरीही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणे कडून केला जातो.त्यांना पाठिंबा दिला जातो. तसेच या विरोधात भूमिका घेणाऱ्या *कार्यकर्त्यांना ठार मारण्याच्या* धमक्यां येतात. असे होत असेल तर अन्याया विरोधात लढण्यासाठी कोणीही पुढे येऊन पुढाकार घेणार नाही. आंबेडकर जयंतीला सुरुवात होतानाच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेले आहेत अशा वेळी *आमचेच काही दलाल सक्रिय झालेले आहेत*. त्यांना नेते पुढारी मंत्री संत्री यांच्याकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नावाने प्रचंड निधी जमा करायचा आहे. आणि आपले हात ओले करून घ्यायचे आहेत. आपण जर अशा लोकांकडून पैसे घेतले निधी घेतला याचा अर्थ आम्ही लाचार झालेलो आहोत.आणि आम्ही एक प्रकारे *आंबेडकर विचारांशी द्रोह* करीत आहोत.*आमच्या विध्यात्याची विक्री करीत आहोत.याची लाज वाटली पाहिजे. म्हणून मित्रांनो कुठल्याही परिस्थितीत या लोकांकडून एक छद्माही घेण्यात येऊ नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साध्या प्रकारे झाला तरी चालेल परंतु *अन्याय अत्याचाराच्या विरोधात भव्य अशी मिरवणूक ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शहरांमध्ये झाली पाहिजे*.
*ठाणे जिल्हा हा अत्याचार ग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करण्यात यावा अशा प्रकारची मागणी सर्व आंबेडकर अनुयायांनी केली पाहिजे*. तरी याबाबतीत सामान्य कार्यकर्ते यांनी आहे यांनी जागृत राहिले पाहिजे.तसेच ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शहरातील *सरकारी कर्मचारी, अधिकारी, आणि व्यापारी यांना विनंती करण्यात येत आहे की आपण आमच्या पाठीशी खंबीरपणे आर्थिक मदत घेऊन उभे राहावे*. आम्ही आपल्याला विश्वास देतो की आपल्या कडून मिळालेला निधीचा योग्य उपयोग करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आबाधीत राहण्यासाठी, *संविधान* वाचवण्यासाठी व अन्याय अत्याचाराच्या घटना घडू नयेत त्यासाठी जनजागृती संदर्भात आपल्याकडून मिळालेला निधीचा वापर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीच्या माध्यमातून करण्यात येईल.
2024 *या वर्षीची मिरवणूक हे अन्याय अत्याचार विरोधात निषेध व्यक्त करणारी राहील*. तसेच या मिरवणुकीला सर्व सामान्य लोकांनी मध्यमवर्ग यांनी व ज्यांच्याकडे सध्या समृद्धी आलेली आहे अशांनी या आंबेडकर जयंतीत सामील होऊन सहकार्य करावे व एकजूट दाखवावी.*ऐकीची एकच भव्य मिरवणूक हेच आपल हत्यार आहे. अन्याय अत्याचार विरोधात लढणार हे एकमेव हत्यार आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे. म्हणून आपणास कळकळीची विनंती आहे की या जयंती मध्ये *जयंतीच्या मिरवणुकीत आपण सक्रियपणे कुटुंबासहित सामील व्हावं* अशी आपणास नम्र विनंती करतो.
पत्रकार बाबा रामटेके 8097540506
0 टिप्पण्या