Top Post Ad

 _'भारत जोडो न्याय यात्रे'दरम्यान राहुल गा॔धी, ठाणे-मुंबई मुक्कामी विविध लहानमोठ्या संघटनांच्या-पक्षांच्या प्रतिनिधींना भेटले...मात्र, ठाण्यातील काही नतद्रष्ट राजकारण्यांच्या कारस्थानी-कलुषित वृत्तीमुळे राहुल गांधींची आणि माझी ठरवूनही प्रत्यक्षात भेट होऊ शकली नाही. तरीही, त्यांच्यापर्यंत खालीलप्रमाणे असलेलं, आपलं महत्त्वपूर्ण 'निवेदन' पोहोचवण्यात आलेलं आहे. केवळ, एक नवजात छोटेखानी पक्षप्रमुख म्हणून नव्हे; तर, चार दशकांहून अधिककाळ कार्यरत असलेल्या जातिवंत-जाज्वल्य अशा कामगार-पुढार्‍यालाच जर नजिकच्या भविष्यातला भारताच्या 'पंतप्रधानपदा'चा प्रबळ दावेदार असलेल्या राहुल गांधींसारख्या राष्ट्रीय-नेत्याची ओझरती देखील भेट मिळू शकत नसेल; तर, त्याचा सरळ अर्थ हा की, या देशातल्या कामगाराला, रस्त्यावरचं कुणी 'काळं कुत्रं'देखील विचारायला आज तयार नाही!_

_...कारण अगदी उघड आहे, कामगार स्वतःहून कधि उत्तम दर्जाचा, समर्पितवृत्तीचा राजकीय-कार्यकर्ता तर नसतोच (जसे, शेतकरी असतात किंवा तळागाळातला अन्य वर्ग असतो); पण ओठातल्या घासासाठी, कुटुंबाच्या पोटासाठी तसेच, आपल्या सन्मान-सुरक्षेसाठी म्हणून देखील 'मतदान' करताना, निखळ 'कामगारधर्म' पाळणारा 'मतदार'ही सहसा तो नसतो...हे आजच्या राजकीय-व्यवस्थेनं अचूक ओळखलेलं आहे (ज्याला, आम्ही 'Vampire-State System' किंवा 'रक्तपिपासू-निर्मम-शोषक व्यवस्था' म्हणतो) आणि म्हणूनच, उंदाराला मांजराने खेळवावे, तसे ती 'भांडवली-मांडवली व्यवस्था', बिनदिक्कत कामगार-कर्मचारीवर्गाच्या जगण्याचा क्रूर खेळ मांडत असते, असो!_

_...लक्षात घ्या की, जेव्हा जेव्हा, व्यवस्थेकरवी हेतूतः अपमान किंवा हेतूतः दुर्लक्ष होत असतं...तेव्हा, तेव्हा तो अपमान किंवा ते दुर्लक्ष, केवळ, राजन राजेसारख्या 'कामगार नेत्या'चंच नसतं...तर, समस्त कामगार-कर्मचारीवर्गाचं असतं. 'भाजपा', हा राजकीय पक्ष म्हणून, सरळ सरळ गुजराथी-भाषिक तथा सिंधी, पंजाबी भांडवलदारवर्गाचं निर्घृण-हिणकस प्रतिनिधित्व करत असतो! त्या मुठभर भांडवलदारांचेच 'आर्थिक हितसंबंध' जपण्यासाठी मोदी-शहा या 'गुजराथी-द्वयी'ला (गुजराथी-लाॅबी) हाताशी धरुन, कुठल्याही थराला जाणारा *भाजपा व त्यांची मातृसंस्था म्हणजे RSS (ज्यांनी, ४ काळ्या कामगार-कायद्यांच्या 'काळी कामगार-संहिते'ची गुलामगिरी देशातल्या कामगार-कर्मचारीवर्गावर लादलीय)...हे दोन्ही, देशातल्या कामगार-कर्मचारीवर्गाचा शत्रू क्रमांक एक आहेत...आणि, 'भाजपा' राजकीय पक्ष म्हणून मतपेटीतून कामगार-कर्मचारीवर्गाने संपवला नाही; तर, कामगार म्हणून तुमचं अस्तित्व संपेल व अस्तित्व उरेल ते फक्त, एक 'आधुनिक गुलाम' म्हणून!*_

_मित्रहो, वाचकांची तशी खरोखरीच मागणी आल्यास, राहुल गांधींना सादर केलेल्या मूळ इंग्रजी निवेदनाचा मुक्त-प्रवाही मराठी अनुवाद, जरुर सादर केला जाईल...कामगारांची 'यथायोग्य-सनदशीर इच्छा', हा 'धर्मराज्य'साठी 'आदेश'च असतो...म्हणूनच, आपली इच्छा असल्यास निवेदनाचा मराठी-अनुवाद, त्याअर्थाने 'कामगार' म्हणून तुमचा हक्कच बनेल...धन्यवाद!_


_...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)_

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com