Top Post Ad

इच्छुक उमेदवारांची निवडणुकीपूर्वी पोलिग्राफ टेस्ट करण्याची मागणी

 


निवडणुकीपूर्वी इच्छुक उमेदवारांची पोलिग्राफ टेस्ट करा - एड राकेश राऊळ यांची  मागणी 

 .भारतात सध्या सुरू असलेल्या राम राज्यात निवडणुकांचे जोरदार वारे वाहू लागले आहेत.मात्र राम राज्यात होणाऱ्या सर्व प्रकारच्या निवडणुकांपूर्वी प्रत्येक उमेदवाराने आपली पॉलिग्रफ टेस्ट देऊन आपण भ्रष्टाचारी ,खुनी  _.बलात्कारी नाही. असे  सिध्द करावे .या मागणीसाठी  ऍड श्री राकेश राऊळ हे गेल्या चाळीस दिवसांपासून मुंबईतल्या आझाद मैदानात अमरण उपोषणास बसले आहेत.

..इच्छुक.उमेदवारांची अशा प्रकारे चाचणी केली तर एक स्वच्छ चारित्र्याचा नेता  उदयास  येईल .तसेच राजकीय  आणि सामाजिक . आभिसरणात एक आदर्श शासनकर्ता प्रजाहितदक्ष कल्याणकारी उत्तम प्रशासन लाभलेली परंपरा  निर्माण होऊन राज्य कारभारात  पारदर्शकता येईल .त्याच लाभ तळागाळातील समाजापर्यंत होईल असेही त्यांनी म्हटले आहे.  अडरच्या आहावलानुसार सध्याच्या लोकसभेत अर्थात संसदेत ५४३ पैकी २३३(४३टक्के) तर.राज्यसभेत २२६ पैकी ७१(३१ टक्के) खासदारांवर (लोकप्रतिनिधींवर) हत्या , खुन  खुनाचा प्रयत्न बलात्कार ,अपहरण.,,सामजिक शांतता भंग करणे,दंगल  माजवने अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

एन सी आर.बी  च्यां २०१९चां नोंदी आणि अहवालानुसार अनेक नेत्यांच्या विरोधात  ९४२७ पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद न्यायालयात आहे.त्यातील ४०२९ खटले हे भ्रष्टाचार संबंधित आहेत.५०००पेक्षा जास्त केसेस ह्या आजी माजी आमदार तथा लोकप्रतिनिधींवर आहेत. २०२४. च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत असे चारित्र्यहीन उमेदवार असू नयेत.म्हणून प्रत्येक उमेदवाराची पोलिग्राफ टेस्ट घेणेच उचित ठरेल .प्रत्येक लोकप्रिनिधीं हा चारित्र्यवान असायला हवा .५४३ खासदारांसाठी.१४० कोटी जनतेने आपले.भविष्य पणाला.का लावावे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे..शासन ,प्रशासन आणि देशातील सर्व सामान्य माणूस यांच्यात एक पारदर्शक सलोखा निर्माण होऊन भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी मुक्त यंत्रणा उभी राहील. त्यातून .देशाचा विकास साधला   जाईल .यासंदर्भात राऊळ यांनी   सर्वोच्च स्थानी असलेल्या   नेतेमंडळी बरोबर पत्र व्यवहार केला पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.असा दावा   ऍड श्री राकेश राऊळ यांनी केला आहे.  देशातील लोकशाही व्यवस्था कायम  टिकवून ठेवण्यासाठी आणि सध्याच्या हुकूमशाही पासून वाचविण्यासाठी   भारताच्या संविधानाचे रक्षण करणे साठी  प्रत्येक उमेदवाराची पॉलिग्राफ टेस्ट होणे. अनिवार्य आहे.बंधनकारक आहे.असे मत त्यांनी शेवटी  मंडलेआहे  .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com