ईव्हीएम विरोधात सध्या जनआंदोलन तीव्र स्वरूप धारण करीत आहे. मात्र आजपर्यंत ईव्हीएम मशीनचे संरक्षण करण्याचे काम VVPAT मार्फत निवडणूक आयोग करत होता. मात्र आता VVPAT च्या मागे काळ्या काचेच्या मागे कसे पेपर स्लिपची चोरी होऊ शकते याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक राईट टू रिकॉल पार्टीचे संस्थापक आणि अध्यक्ष राहुल चिमनभाई मेहता यांनी दाखवल्याने हा चोरीचा प्रकार आणखीन उघड झाला आहे. आयआयटी अभियंता राहुल मेहता यांनी शोधलेल्या ईव्हीएम मशीनचे बहुचर्चित डेमो मॉडेल प्रदर्शित करण्यात आले. मेहता यांनी बनवलेल्या डेमो ईव्हीएम मशीन आणि ल्याच्या सोबतचा VVPAT मध्ये इलेक्ट्रॉनिक आणि कागदी वोटची कशी चोरी होऊ शकते हे थेट जाहीरपणे प्रात्यक्षिकासह दाखवले. त्यामुळे येणाऱ्या काळात इव्हीएम विरोधी आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. आज VVPAT बाबतही संशय निर्माण झाला आहे अशा स्थितीमध्ये मुक्त आणि प्रामाणिक निवडणुका होऊ शकत नाही.त्यामुळे केंद्रीय सूचना आयोग आणि सरकारने येत्या लोकसभा 2024 च्या निवडणुकांमध्ये बॅलेट पेपर विकल्प म्हणून प्रत्येक मतदान कक्षामध्ये ठेवला पाहिजे, अशी मागणी मेहता यांनी केली.
मुंबईतील प्रेस क्लब, येथे ईव्हीएम हटाओ सेनेतर्फे आयोजित कार्यक्रमात. ईव्हीएमच्या डेमो मशीनमध्ये पवन ज्युरी यांना अनुक्रमे सफरचंद, केळी आणि टरबूज या चिन्हांसाठी 22 मते मिळाली आणि व्हीव्हीपीएटी उघडल्यानंतर त्यात अनुक्रमे सफरचंदाच्या 4 स्लिप आणि केळी आणि टरबूजच्या 1 स्लिप दाखवल्या. हे पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला. व्हीव्हीपॊटद्वारे मतांचा कशी चोरी होते हे यामधून मेहता यांनी सिद्ध केले. ईव्हीएममध्ये बसविलेल्या काळ्या काचेतून कागदी मतांची चोरी कशी शक्य आहे हे दाखवण्यात आले.
- 1. राइट टू रिकॉल पार्टी
- 2. अमन समाज पार्टी
- 3. राष्ट्रीय शोषित समाज पार्टी
- 4. भारतीय हिंदू सेना
- 5. भारतीय राष्ट्रीय जनसत्ता
- 6. राष्ट्रीय भाईचारा विकास पार्टी
- 7. लिराजा पार्टी
- 8. पनी जनतांत्रिक पार्टी
- 9. भरत पीपल्स सेना
- 10. जपहिंद कांग्रेस पार्टी
- 11. भागीदारी पार्टी
- 12 भारतीय नवजवान इंकलाब पार्टी
- 13. समाजवादी आंदोलन पार्टी
- 14. स्वाभिमान पार्टी
- 15. आमजन नीति पार्टी
- 16. भारतीय जन सम्मान पार्टी
- 17. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) रेड स्टार
- 18. नकी भारतीय एकता पार्टी
- 19. राष्ट्र समर्पण पार्टी
- 20. आदि भारत पार्टी
- 21. स्वराज हिताय पार्टी
- 22. जनतावादी कांग्रेस पार्टी
- 23. सुभाषवादी भारतीय समाजवादी पार्टी
- 24. लोकतांत्रिक सामाजिक न्याय पार्टी
- 25. नेशनल सोशलिस्ट पार्टी यूनाइटेड
- 26. गांधीवादी पीपल्स पार्टी
- 27. जन सत्यापथ पार्टी
- 28. स्वाधीन स्वराज्य पार्टी
- 29. भारतीय उदय निर्माण पार्टी
- 30. अखिल भारतीय मानवता पक्ष
- 31. जनहित लोकशाही पार्टी
- 32. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कांबले)
- 33. न्याय एवं विकास पार्टी
- 34. बहुजन सुरक्षा दल
- 35. राष्ट्रीय मराठा पार्टी
- 36. अल्पसंख्यक लोकतांत्रिक पार्टी
- 37. बहुजन भारत पार्टी
- 38. भारतीय प्रजा सुराज्य पक्ष
- 39. नवभारत निर्माण सेवा पार्टी
- 40. स्वराज पार्टी
- 41. नागरिक विकास पार्टी
- 42. अल हिंद पार्टी
- 43. भारतीय राष्ट्रीय मोर्चा....... भारतात ईव्हीएमवर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी या सर्व पक्षांनी मागणी केली आहे.
0 टिप्पण्या