गल्लीतला दादा वसुली करतो. चहा वाल्याकडून करतो, भाजीवाल्याकडून करतो. हा मारामाऱ्या करेल म्हणून घाबरून लोक त्याला वसुली देतात. देशाचा पंतप्रधान हा गल्लीतल्या दादाच्या बरोबरचा झाला आहे हे लक्षात घ्या. ज्या ज्या कंपन्यांनी बॉण्ड खरेदी केलेत त्यांना पहिलं धमकवलं, नोटीस पाठवली, धाड घालतो म्हणून सांगितलं, कारखाने बंद करतो म्हणून सांगितलेलं. ह्या देशाचा पंतप्रधान हा हप्ता बहाद्दूर आहे हे आपण लक्षात घ्या अशी खरमरीत टीका चंद्रपुरात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली. VBA अधिकृत उमेदवार राजेश बोले... चिन्ह- रोड रोलर' यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते..
चंद्रपूरात येऊन मोदी बोलतात आम्हीं ३७० हटवलं. एखादं कलम हटवलं म्हणजे सत्ता राबवणं म्हणतात का, मोदी तुमच्या बुद्धीची आम्हांला कीव करावीशी वाटते, एखादा सरपंच सुद्धा हे वाक्य बोलणार नाही. .ह्या देशातला सनातन हिंदू जो आहे , जो मोदी मोदी करत बसलाय त्याला मला विचारायचं आहे की, तुम्हांला एवढा बुद्धू पंतप्रधान कधीपासून लागायला लागला.? १० वर्षे झाली इतिहासात रेंगाळत बसलाय, आरे १० वर्षांत तू काय केलं ते तर सांग.. १० वर्षांत चोऱ्या-माऱ्यांशीवाय काहीच केलं नाही हे आपण लक्षात घ्या.. सगळ्यात मोठा डाकू इलेक्टोरल बॉण्ड मार्फत नरेंद्र मोदी निर्माण झालाय.. जे रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स मोदी-मोदी करत होते हे आता गेल्या ३ महिन्यांपासून मोदीच्या सीमा धोरणाविरोधात बोलत आहेत. एकीकडून चायना तर दुसरीकडून पाकिस्तान घुसतो आहे. आणि ह्याची ५६ इंचाची छाती १४ इंचाची झाली आहे..
४०० पारच्या जागा म्हणजे ही मोदीची भीती बोलतीये हे आपण लक्षात घ्या, हा विश्वास बोलत नाहीये.. काँग्रेसवाल्यांनी आस्तणीतले निखारे स्वपक्षात सांभाळून ठेवलेत. भाजपाचे एजंट जे आहेत त्यांना पहिल्यांदा ओळखून बाहेर काढा अन्यथा ह्या लढाईत तुम्हीं तग धरू शकत नाही.. सनातनवादी आणि rssवाल्यांना मी सांगतोय "आपलं भांडण हे चालू राहील. आम्हीं तुम्हांला सोडणार नाही आणि तुम्हीं आम्हांला सोडणार नाहीत. पण हे मानगुटीवर बसलेलं मोदी नावाचं भूत हे देशाला घातक आहे. त्याला उतरवण्यासाठी आधी प्रयत्न करा.. असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.
0 टिप्पण्या