Top Post Ad

समाजकार्याचा मोठा आदर्श निर्माण करणारे जगदीश नगरकर यांना भावपूर्ण आदरांजली.....


   आज आपण सर्वजण या ठिकाणी दुःखद अंतकरणाने जगदीश नगरकर साहेबांच्या तिसऱ्या स्मृतिदिनाला उपस्थित आहे, माझा आणि त्यांचा अतिशय जवळचा संबंध होता. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी जे मुंबईला शिकायला येत होते, त्यांना एक हक्काचा माणूस, मदत करणारा व्यक्ती म्हणून नगरकर साहेब होते. माणसांना जोडणारी ते एक बहुआयामी व्यक्ती होती. मला आठवतंय की दररोज किंवा आठवड्यातनं असा एकही दिवस गेला नाही की आमची आणि त्यांची भेट झाली नाही. मलाच नव्हे त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ह्या अशाच स्वरूपाच्या भावना असतील. आमच्या कुटुंबाशी त्यांच्या कुटुंबाचा एकमेकांशी चांगला संबंध होता, मुंबईतून ते खारघरला आले आम्हालाही त्यांनी इकडं येण्यासाठी सांगितलं किंवा आम्ही इकडे खारघरला येण्यामध्ये ते इथे राहत असल्याने आम्ही आलो. त्यांच्या स्मृतिदिनाला आल्यानंतर त्यांच्या फोटोकडे पाहिल्यानंतर निरागस चेहऱ्याचा व्यक्ती व तेजस्वी असणारा माणूस फोटोत पाहिल्यानंतर जुन्या आठवणी तर आल्या आणि डोळे  पानवले आणि त्यांनी केलेलं जे काम आहे ते काम सगळं डोळ्यासमोर आलं. अशी भावपूर्ण आदरांजली प्रविण मोरे यांनी आज जगदीश नगरकर यांच्या  तिसऱ्या स्मृतिदिनी अभिवादन करतांना व्यक्त केली. 

२३ एप्रिल रोजी पंचशील बुद्धविहार, सेक्टर १५, घरकुल संकुल, खारघर नवी मुंबई येथे अभिवादन करताना प्रविण मोरे पुढे म्हणाले, मुंबईत आल्यानंतर माझे पहिले मार्गदर्शन आणि मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणारे, माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना आधार व मार्गदर्शन करणारे, समाजकार्याचा मोठा आदर्श निर्माण करणारे जगदीश नगरकर यांना अभिवादन करताना त्यांच्या तेजस्वी निरागस चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर डोळे आपोआपच पाणवले आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला. त्यांची मुलं आता थोडी मोठी झाल्यानंतर कॉलेज शिकत आहेत व त्यांच्या वडिलांनी आखून दिलेल्या प्रगतीच्या मार्गावर नगरकर साहेबांना अभिप्रेत काम करत आहेत.

आजही दादरला आंबेडकर भवन, चैत्यभूमी, राजगृह, महानगरपालिका मुख्य कार्यालय, आझाद मैदान, दादर स्टेशन, कोरबा मीठागर,वडाळा स्टेशन, इराणी हॉटेल, खारघर स्टेशन, घरकुल वसाहत, पंचशील बुद्ध विहार इत्यादी ठराविक ठिकाणी गेल्यानंतर नगरकर साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कुठून तरी हातात पिशवी त्यामध्ये पुस्तकं किंवा अडकवलेली सॅग / बॅग घेऊन नगरकर तिथे येतील व आपल्याला दिसतील आणि 'जय भीम प्रवीण जी' असे हाक देतील, अस आजही वाटतं. ते आपल्यातून गेलेलेच नाहीत ही भावना सारखी समोर येते. आज शरीराने जरी ते आपल्यासोबत नसतील मात्र त्यांनी दिलेल्या विचारानं व त्यांनी दिलेल्या सहवासाने, मार्गदर्शनाने ते कायम आपल्या सोबत असतील असंच मला सातत्याने वाटतं.

आज वर नमूद ठिकाणावर गेल्यानंतर आजूबाजूला नजर नगरकर साहेबांना शोधत असते व प्रमोद सावंत, कमलाकर शिंदे, सतीश निकाळजे, मूलनिवासी माला, सुबोध मोरे,  काशिनाथ निकाळजे, प्रकाश, भारत काळे, एडवोकेट लासुरे, थोरात, डॉ डोंगरगावकर,उज्वला रोकडे, बंधुराज लोणे विद्या तोरणे, आरती वारे भेटल्यानंतर जगदीश नगरकरांच्या बद्दल विचारपूस आणि त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी घालून दिलेले अनेक कार्यक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो, पण नगरकर साहेबांसारखं आजही काम आम्हाला जमत नाही. 

दिवंगत जगदीश नगरकर हे मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी असूनही ते आयुष्यभर विद्यार्थी राहिले, शिक्षणच नव्हे, परंतु समाजातील सर्व गोष्टी सातत्याने शिकण्याचा त्यांचा पिंड होता आणि त्यांची शिकण्याची प्रक्रिया सातत्याने चालू होती, त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, पुढे वकिलीचे शिक्षण घेतले, त्यांनी त्यांची बदली गोंवडीच्या स्मशानभूमी त्या ठिकाणी करून घेतली, रात्रपाळी घ्यायचे, कारण त्यांना अभ्यास करता येईल, तिथे निवांतपणा असेल आणि दिवसभर आंबेडकरी चळवळीचे काम करता येईल या भावनेने हा माणूस कार्यरत राहिला. 

कोणत्याही एका पक्षीय प्रक्रियेला बांधील न राहता फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या आणि अगदी डाव्या व कम्युनिस्ट या सर्वच पुरोगामी विचाराच्या विचारसरणीची ते बांधील आणि संबंधित असायचे. हातामध्ये असलेली विविध प्रश्नांची व संघटनांच्या लेटरहेडवरची निवेदने, रोजची वर्तमानपत्र, विविध कार्यक्रमांची माहिती त्यांच्या पिशवी मध्ये असायची तसेच पुस्तक भेट देण्याचा त्यांचा छंद तो आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने पुस्तकप्रेमी असणारा व वाचनाची आवड असणारा अभ्यासू माणूस आणि त्यांचा आदर्श घेऊन चळवळीची पुस्तक वाटावी असे वाटते.  फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे काम करणारा मित्र हरपलेला आहे, त्यास अभिवादन करताना आज त्यांच्या या सगळ्या आठवणी चित्रपटासारख्या डोळ्यासमोरून जात आहेत आणि खरोखरच त्या आठवणी बरोबर दुःख दाटूनही येत आहे आज जगदीश आपल्यामध्ये असायला हवा होता ही भावना ज्यांना ज्यांना त्यांचा सहवास लाभला त्या सर्वांनाच जवळजवळ सगळ्यांच्या मनात येत असतील. 

आजच्या या धावपळीच्या जगात सेल्फ सेंटर/  स्वयं केंद्रित असणारी संस्कृती उदयास येत आहे आणि त्यामध्ये जगदीश नगरकर यांच्या रूपाने दुसऱ्याला मदत करण्याची, सहकार्य करण्याची, अडचणीतल्या माणसासाठी धावणाऱ्या, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणारे एखाद्या त्यांना सहकार्याबद्दल करूणेची भावना असणारे, गरीब माणसासाठी निधी संकलन करणारा, पुस्तके जमा करून अभ्यासाला विद्यार्थ्यांना देणारा  परोपकारी, मदत करणारा माणूस आज आपण हरवून तीन वर्ष होत आहेत. त्यांच्या स्मृतिदिनाला आपण या ठिकाणी जमलेलो असताना व आज ज्या ज्या ठिकाणी जगदीश नगरकर यांच्या सहवासात आलेल्या लोकांनी त्यांना निश्चितपणाने मनापासून मनापासून अभिवादन केल असावे. त्यांना सविनय जय भीम करावा असं मनापासून आज वाटत आहे. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com