'गुजराथी-लाॅबी'कडून चालवल्या जाणाऱ्या 'हिंदुत्वा'च्या राजकीय-फॅक्टरीतून बाहेर पडणारा तयार-माल म्हणजे... *"असत्य, अन्याय, अत्याचार आणि अमानुष शोषण"!ही 'गुजराथी-लाॅबी', हिंदुत्वाच्या नावाखाली प्रथमतः मुसलमान, मग शेतकरी, नंतर लष्करी सेवेत जाऊ पहाणारे नवतरुण आणि आता कामगार, अशी सर्वांवरच हल्लाबोल करतेय... यांना तळागाळातील सगळ्यांचाच तिरस्कार आहे. मोजक्या लोकांच्याच हातात सत्ता-संपत्ती ठेवायची, वर्णवर्चस्ववादी-शोषक मानसिकता त्यामागे आहे!...चुकलेल्याला, गुन्हेगाराला शासन करणं, सजा देणं वेगळं आणि एखाददुसरा गुन्हेगार, दहशतवादी सापडला म्हणून त्यांच्या संपूर्ण जातधर्म-समाजाचाच तिरस्कार करणं वेगळं! जातधर्मीय दंगल घडवणारा कुणीही असो, हिंदू असो वा मुसलमान वा अन्य कुणी...कुठल्याही दंगेखोराचा, निःशस्त्र व निष्पाप नागरिकांवर उगारलेला शस्त्रधारी हात, खाली येण्यापूर्वीच त्याच्या छातीचा वेध पोलिसांच्या किंवा लष्कराच्या हातातील बंदुकीच्या गोळीने घेतलाच पाहिजे...शिवछत्रपतींच्या नीतिनुसार त्यात कुणालाही दयामाया दाखवण्याचा, भेदाभेद करण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो? तेव्हा, *"प्रतिकार वेगळा आणि तिरस्कार वेगळा..."
"जो एकाचा तिरस्कार करतो, तो सगळ्यांचाच तिरस्कार करत असतो आणि जो एकावर निरपेक्ष प्रेम करतो; तो अवघ्या मानवतेवर प्रेम करत असतो",* हे लक्षात ठेवा! 'सत्यवचनी राम' काय सांगतो? कृष्ण काय शिकवतो गीतेत...व्यक्तिवर की, प्रवृत्तीवर लक्ष केंद्रित करायला? मोदी-शहा...अंबानी-अदानीसारख्यांनी, आपल्या *'कर लो दुनिया मुठ्ठी में'* अशा बकासुरी स्वार्थापोटी चालवलेली, हिंदुधर्माला 'बदनाम' करणारी, ही बनावट हिंदुत्वाची 'फॅक्टरी' आहे! भारतीय-अध्यात्माचा पायाच मुळी *'सत्यमेव जयते'* आहे...सुर्याच्या हिरण्यगर्भासारखं प्रखर-तेजस्वी असलेलं *'सत्य', हे भारतीय-अध्यात्मात सदैव, 'परमेश्वरस्वरुप' मानलेलं असताना...* 'असत्या'चा आधार घेत, सतत घृणास्पद राजकारण करणारे तथाकथित 'हिंदुत्ववादी', स्वतःला हिंदूदेखील म्हणवून घेण्याच्या देखील लायकीचे नाहीत! या बनावट हिंदुत्ववाद्यांनी कधि राजा हरिश्चंद्राची"* परंपरा, ओझरती तरी पाळलीय? *सत्यवचनी रामाचं* मंदिर बांधता, *स्वप्नात दिलेलं वचन पाळणारा राजा हरिश्चंद्र* आमचा म्हणता...आणि, तुमची एवढी वाईट अवस्था की, तुम्हाला साधं खरं बोलणं, सत्य सांगणं... अशक्यप्राय व्हावं? रोज रोज नवीन थापा, नवनवीन जुमले. प्रेमळ-वत्सल-न्यायी व प्रजेप्रति नको तेवढा* अतिसंवेदनशील असलेल्या रामाला रागीट, उग्र, क्रुद्ध 'श्रीराम' बनवता तुम्ही? ही रामाची सरळ सरळ बदनामी नव्हे तर काय??
"एकीकडे 'गोमाता' म्हणणार आणि *"गाय हा फक्त, एक उपयुक्त पशू आहे",* हे सावरकरांचं वचन, त्यांच्या अनेक 'माफीनाम्यां'सारखंच दडवून ठेवणार; शिवाय, दुसरीकडे 'गोमांस' (Beaf) विकणाऱ्या कंपन्यांकडून आणि पाकिस्तानच्या 'हब-पाॅवर' (HubPower) कंपनीकडून करोडोंचे इलेक्टोरल-बाॅण्ड्स् स्विकारणार" आणि वरुन, कुठल्या तोंडाने हे स्वतःला 'हिंदुत्ववादी' म्हणवणार?...कसल्या हिंदुत्वाच्या गप्पा मारतायत हे, थापेबाज? अयोध्येत राममंदिर बांधलं यांनी; पण बेरोजगारी, महागाई, नोकरीच्या ठिकाणी 'कंपनी-दहशतवाद' (Corporate-Terrorism), हुकूमशाहीतली 'सरकारी-दहशत', अमानुष आर्थिक-विषमता, नोटबंदी-इलेक्टोरल बाॅण्ड्स्, 'PMCare' फंडासारखे या शतकातले सगळ्यात मोठे घोटाळे याद्वारे, *तुमच्याआमच्या जगण्यातला त्यांनी 'राम' हिरावून घेतलाय... ILOच्या म्हणण्यानुसार, भारतात ३० वर्षांखालील ८३% नवतरुण बेकार आहेत...
अगदी, IITसारख्या सर्वोच्च तंत्रज्ञान-संस्थांमधून बाहेर पडणारे इंजिनिअर्सही आज मोठ्याप्रमाणावर बेरोजगार म्हणून फिरतायत; कारण, यांच्या गेल्या १०वर्षांच्या सत्ताकाळात *'जाॅबलेस-ग्रोथ ते जाॅब-लाॅस ग्रोथ'* अशी, रोजगारनिर्मिती क्षेत्राची प्रचंड घसरण झालीय; म्हणजेच, जेवढी जेवढी म्हणून मोजक्या महाकाय कंपन्यांची प्रगती होत जाते, तेवढे तेवढे अधिकाधिक रोजगार, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने व घृणास्पद व्यवस्थापकीय डावपेचांनी नष्ट होत जातात. गेल्या १०वर्षांत खाण्याचं तेल तिप्पट, गाड्यांचं इंधन-तेल दुप्पट; तर, स्वयंपाकाचा गॅस अडीचपट महागला. महामार्गांची रुंदी वाढली; पण, कामगार-कर्मचारीवर्गाच्या पगाराच्या पाकिटांची जाडी पूर्ण खंगली...अगदी चिप्पाडं झाली त्यांची. उड्डणपुलांचं-महामार्गाचं काँक्रीटचं जाळं वाढलं; पण, आपल्या व पुढच्या पिढ्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर उभे केले यांनी. जनतेची क्रयशक्ति (खरेदी-शक्ति) घटली, बचत-क्षमता संपुष्टात येऊन कर्ज घेण्याचं प्रमाण बेसुमार वाढलं...गेल्या दोन वर्षात, घरची लक्ष्मी म्हणजेच, घरातलं सोनं गहाण ठेऊन कर्ज घेण्याचं प्रमाण २००० कोटींवरुन मारुतिसारखं कोटीच्या कोटी उड्डाण घेत २६,००० कोटींपर्यंत पोहोचलं!
आपली अवस्था, त्या उंदरासारखी त्यांना करुन टाकायचीय, जो एकदा का पिंजऱ्यात कोंडला गेला की, बाहेर पडणं अशक्यच! २०२४ची लोकसभा-निवडणूक, हा तो 'पिंजरा' आहे...सावध राहून मतदान केलंत, तर त्या पिंजऱ्यातून वाचाल; *नाहीतर, तुमच्यातला 'माणूस' हळूहळू मरुन जाईल... त्याची जागा एक 'गुलाम' घेईल!* तुम्हाला ते उपाशी मारणार नाहीत; तुम्हाला ते निश्चितच तगवतील... *१२ तासाला दरमहा १२ हजार पगार देऊन किंवा आज देतात, तसं ८० कोटी लोकांना दरमहा ५ किलो मोफत धान्य देऊन* (मात्र, ती किरकोळ मदत, मोदी-शहा सरकारने दिलेली असल्याने, त्याला 'रेवडी' म्हणायला 'बंदी'च); पण, सन्मानाने जगवणार मात्र, नाहीत! ...दावणीला बांधलेल्या, गोठ्यात कोंडलेल्या गुराढोरांसारखं, पुढ्यात टाकलेल्या दर महिन्याच्या ५ किलो चाऱ्यावर गपगुमान गुजराण करायची वेळ आपल्यावर येईल आणि ही भाजपाई-संघीय 'गुजराथी-लाॅबी' तुमच्या छाताडावर थयथया नाचेल!
सत्यवचनी राम, स्वप्नात दिलेलं वचन पाळणारा राजा हरिश्चंद्र... ही भारतीय-अध्यात्माची मूर्तिमंत प्रतिकं...तर, हे उठताबसता फेकाफेक करणारे राजरोस 'फेकू' आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख टाकणारे, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या निर्माण करणारे महानिर्लज्ज 'जुमलेबाज'! ...तेव्हा, लक्षात ठेवा, 'जुमले'वाल्यांचं सरकार आलं की, 'जुलूम' सहन करण्याशिवाय पर्याय रहात नाही... त्यांनी लाथा घातल्या तरी, 'काय छान मालिश केलंत', शिव्या घातल्या तर, 'काय छान ओव्या म्हटल्यात' आणि तोंडावर हे जुमलेबाज थुंकले तरी, 'काय छान आंघोळ घातलीत', असं बोलायची नामुष्की आपल्यावर येईल... तुमच्या त्या 'शिंदे-पवार' गटाचं दुसरं काय चाललंय भाजपवाल्यांपुढे? आणि जे, ईडी/आयटी/सीबीआयच्या धाडी पडायला नकोत...म्हणून अगोदरच ढुंगणाला पाय लावून भाजपाच्या दिशेने पळालेत...त्यांचंही वेगळं काय चाललंय? जगायचंय तुम्हाला असलं 'गुलामी'चं जीण?? नसेल जगायचं...तर आजचं विचार करुन ठेवा आणि 'इंडिया-आघाडी'ला साध्या नव्हे; प्रचंड बहुमताने विजयी करा; कारण, त्या EVMच्या किमान काही टक्क्यांच्या हेराफेरीला ओलांडून, आपल्याला ही लोकसभा-निवडणूक जिंकण्याखेरीज दुसरातिसरा कुठलाही इतर पर्याय नाही...
.राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)*_
0 टिप्पण्या