थोर क्रांतिकारी लेखक व चिंतक बाबुराव बागूल यांच्या स्मृतिनिमिताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएन महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने विविध मान्यवर व्यक्तींना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दि. ४ मे रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या ठिकाणी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात डॉ. म. ना. वानखेडे स्मृती पुरस्कार डॉ.प्रा. भाऊ लोखंडे, (मरणोत्तर) नागपुर यांना देण्यात येणार आहे तर प्राचार्य. म. भि. चिटणिस स्मृती पुरस्कार क्रांतीवीर नागनाथ आण्णा नायकवडी (मरणोत्तर) तसेच बाबुराव बागूल स्मृती पुरस्कार :- रमेश शिंदे, मुंबई यांना देण्यात येणार आहे कामगार नेते अॅड.एम.ए. पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय रत्नपारखी, प्रा. रामप्रसाद तौर, प्रा. कुसुम त्रिपाठी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेखक शिवा इंगोले आहेत. सदर कार्यक्रमास बाबुराव बागुल प्रेमी मंडळी तसेच साहित्यिक व मित्र परिवाराने आवर्जून उपस्थित रहावे अशी विनंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशन महाराष्ट्र या संस्थेचे सचिव तसेच कार्यक्रमाचे आयोजक अॅड नाना आहिरे 9820855101 यांनी केली आहे.
0 टिप्पण्या