The Buddhists society of India या संस्थेचे पदाधिकारी कोणत्याही गटासोबत काम करणार नाहीत असे सिध्दार्थ बुद्ध विहार ठाणे येथे संस्थेच्या सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य शाखेचे व मुंबई विभागीय शाखेचे पदाधिकारी तसेच जिल्हा शाखेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच या सभेस वरिष्ठ पदाधिकारी म्हणून संस्थेचे ट्रस्टी चेअरमन हरीश रावलीया, राष्ट्रीय कमिटीचे पदाधिकारी एस के भंडारे हे भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या आदेशाने उपस्थित होते तसेच प्रमुख मार्गदर्शक संजय सपकाळ सुद्धा उपस्थित होते . संस्थेचे माजी ट्रस्टी चेअरमन डॉ. पी . जी . ज्योतिकर यांच्या निधनानंतर सर्व सम्मतीने राष्ट्रीय सभेत डॉ . हरिश रावलीया यांना ट्रस्टी चेअरमन पदाची जवाबदारी देण्यात आली व संस्थेचे विविध गटाचे एकत्रीकरण करण्याच्या प्रक्रियेची अंतर्गत चर्चा सुरु झाली . एकीकरण प्रकियेमध्ये डॉ . हरिश रावलीया, चंद्रबोधी पाटिल. सुभाष जी जोंजाले. भीमराव जी आंबेडकर यांचा सहभाग होता . सदर एकीकरण प्रक्रियेच्या चर्चेतुन अचानक माघार घेत चंद्रबोधी पाटिल यांनी २६ फेब. २०२४ रोजी विशाखापटनम येथे जुन्या कार्यकर्त्यांना डावलुन काही नविन लोकांना सोबत घेत सभा घेवून आपला गट बनविला या सर्व घड़ामोंडी सन्दर्भात महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सभेमध्ये चर्चा करण्यात येऊन, सदर सभेत काही ठराव संमत करण्यात आले.
ठराव क्रमांक एक - महाराष्ट्र राज्यातील संस्थेचे पदाधिकारी व सभासद कोणत्याही गटाबरोबर काम करणार नाहीत मूळ संस्थेबरोबरच काम करतील- ठराव क्रमांक दोन - संस्थेच्या विविध गट एकत्रिकरण हे समाजाच्या व संस्थेच्या हिता चे असून याकरीता सुरु असलेल्या प्रयत्नाना सहकार्य करने
- ठराव क्रमांक तीन - मूळ संस्थेची एकीकरणाची प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत धीरज जाधव हेच संस्थेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी राहतील.
या सभेसाठी उपस्थित असणारे हरीश रावलीया, संजय सपकाळ, एस.के.भंडारे व आबासाहेब चासकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले एस के भंडारे यांनी सर्व कार्यकर्त्यांना आव्हान केले की कोणतेही गट तट न ठेवता एक दिलाने काम करावे लागेल ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल अशा ठिकाणी एकमेकांना हेवे दावे बाजूला ठेवून धम्मकार्याला मदत करावी सदर सभेच्या अध्यक्षीय भाषणानंतर राज्याचे महासचिव आयु अमित जी कांबळे यांनी आभार मानले .
हे पण वाचा....click here 👉 भारतीय बौद्ध महासभा ... घोळ विश्वस्तांचा कि धर्मादाय आयुक्तांचा... |
0 टिप्पण्या