Top Post Ad

भूमिगत गटार सफाई करतांना कामगार कायद्याचे उल्लंघन आणि कंत्राटी कामगारांचे शोषण


ठाणे महानगरपालिका प्रशासनाने शहरातील नाले सफाई करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून सफाई सेवकांचे शोषण होत असल्याचे आज दि. १७ मे २०२४ रोजी दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये भूमिगत गटारे साफ करताना प्रत्यक्षात. दिसुन आले आहे  नाल्यात उतरून काम करणारे सफाई कामगारांना कोणतेही सुरक्षा साहित्य दिलेले नाही.गटारात सांडपाण्यातून कचरा बाहेर काढताना कर्मचारी संपूर्णपणे सांडपाणी अंगावर सांडले असताना त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे यावरुन स्पष्ट होते आहे. मुख्यमंत्र्यांचे ठाणे शहरात ही ठेकेदारांना कामगारांच्या लूटीचे खुले परवाने ठाणे महानगरपालिका प्रशासनाने दिले आहेत का? असा प्रश्न पडतो आहे.

सदरचे कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार सदर कामगारांना फक्त चारशे रुपये रोज या दराने वेतन अदा केले जाते. वास्तविक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कंत्राटी कामगारांना मूळ वेतन ११,५०० + विशेष भत्ता ८,३६० असे एकूण मासिक किमान वेतन रू. १९८६० इतके आहे. म्हणजे प्रतिदिन रू. सातशे चौसष्ट देणे आवश्यक आहे. ठेकेदार निम्या पगारावर कामगारांना राबवून घेत आहे. बंद गटारात माणसाला उतरवण्यासाठी कायद्यानुसार बंदी घातली असताना ठाणे महापालिका प्रशासन The Prohibition of Employment as Manual Scavengers and Their Rehabilitation Act 2013 च्या तरतुदींचे सर्रासपणे उल्लंघन करत आहे.    सदरचे प्रकार ताबडतोब बंद करण्याचे आदेश संबंधित ठेकेदार यांना द्यावे. तसेच सदर कामगारांना किमान वेतन अधिनियम १९४८नुसार ठाणे महानगरपालिका कंत्राटी कामगारांना लागू किमान वेतन प्रमाणे कामगारांना वेतन व भत्ते आणि सुरक्षिततेसाठी साधने उपलब्ध करून देण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी ठाणे महापालिकेकडे पत्राद्वारे केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com